Category: 2020

Poems Of Mai Van Phan (Vietnam)

Intro :Vietnamese poet Mai Văn Phấn was born 1955 in Ninh Bình, Red River Delta in North Vietnam. Currently, he is living and writing poems in Hải Phòng city. He has published 19 books in Vietnam and 34 books abroad, including poetry collections, books of criticism and essays, and translated books. Poems of Mai Văn Phấn […]

कृष्णेचा जलप्रपात :फिलिप मेडोज टेलर

(फिलिप मिडोज टेलर या ब्रिटिश लेखकाने सुलताना चाँदबीबी या नगरच्या राणीवर तीन भागात ‘अ नोबल क्वीन’ नावाची कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद करायची परवानगी ‘साहित्याक्षर‘ प्रकाशनाला मिळाली असून ‘साहित्याक्षर’च्या वतीने कामार्गावचे इतिहास अभ्यासक श्री. सतीश सोनवणे करत आहेत. त्या कादंबरीचा हा पहिला भाग. वाचक आणि रसिकांनी वाचून सूचना कराव्यात.) फिलिप मेडोज टेलर : […]

डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या ग्रंथाचे परीक्षण

डॉ.प्रल्हाद लुलेकर लिखित नवा ग्रंथ                            बहुजन संस्कृतीचे सारसूत्र लेखक,समीक्षक,कवी, विचारवंत,वक्ते आणि प्रशासक प्रल्हाद जी.लुलेकर यांनी हयातभर लेखणी,वाणी आणि प्रशासनातून सम्यक परिवर्तनाची विद्रोही भूमिका मांडली.फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा घेऊन अविरत लोकजागृती घडवत साहित्यालाही नवी दृष्टी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.प्रामुख्याने शोषितांचे प्रश्न आणि साहित्य हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू राहिला आहे.त्यांनी सामाजिक समतेसाठी विद्रोही तत्वज्ञानशास्राची मांडणी प्रभावीपणे केली आहे.‘आले ढग…गेले ढग ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे.‘मोगडा’ आणि ‘दलितेतरांसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर’या त्यांच्या वैचारिक लेखनाने मराठी विचारविश्वात मोलाची भर टाकलेली आहे.‘बलुतेदार’, ‘गावगाड्याचे शिल्पकार’व ‘बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे’हे त्यांचे ग्रंथ गावगाड्याच्या समाजशास्रीय, संस्कृतीशास्रीय आणि भाषाशास्रीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.‘वेदनांचा प्रदेश’,‘प्रतिभेचे प्रदेश’,‘पंचधारांचा प्रदेश’,‘साहित्याचे वर्तन आणि वर्तमान’,‘भंजनाचे भजन’,साठोत्तरी साहित्य प्रवाह’आदी ग्रंथांतून त्यांनी परिवर्तनवादी दृष्टीकोनातून केलेली साहित्य समीक्षा आणि केलेले चिकित्सक संशोधन दिशादर्शक व मूलभूत स्वरूपाचे आहे.  दलित आत्मकथने,साठोत्तरी साहित्य प्रवाह, मराठवाड्यातील साहित्य,बारा बलुतेदार आणि गावगाडा,परिवर्तनवादी चळवळी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अवकाशात त्यांनी केलेला अभ्यास मराठी साहित्यात महत्त्वाचा मानला जातो.जवळपास पंचविस ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचे साहित्य आणि समाजचिंतन वाचकांसमोर आलेले आहे.या संबंध लेखनाच्या केंद्रस्थानी वंचित समुहांचा विचार राहिलेला आहे.समाजप्रश्नांच्या बद्दल भारतीय संविधानातील तत्त्वांचा अंगिकार करत त्यांनी केलेला साहित्यिक हस्तक्षेप लोकशाहीवादी समाजनिर्माणासाठी आवश्यक आहे.नुकताच त्यांचा‘बहुजन संस्कृतीचे जनक:महात्मा जोतीराव फुले’हा ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.हा ग्रंथही मानवी मूल्यांसाठी आग्रही असणार्या आणि समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पाहणार्या जोतीराव गोविंदराव फुले या माहात्म्याच्या कार्याचे सर्वव्यापीत्त्व विशद करणारा आहे.महात्मा फुले यांनी बहुजन समूहांच्या आयुष्यात घडवून आणलेली क्रांती आणि त्यांच्या संस्कृती निर्माणासाठी घेतलेल्या भूमिकांचा वस्तुनिष्ठ परामर्श प्रल्हाद लुलेकर यांनी प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.महात्मा फुले यांच्या कार्याचे बहुजनवादी दृष्टीकोनातून मांडलेले हे आकलन ‘फुलेविचार’समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.या ग्रंथातून बहुजन संस्कृतीचे सारसूत्र विशद झाले आहे.म्हणून या ग्रंथाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे.          महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि पर्यायी संस्कृतीचा कृतिकार्यक्रम देणारे,शोषणमुक्त समाजरचनेचे स्वप्न पाहणारे दृष्टे विचारवंत आहेत.कृती व लेखनातून बहुजनवादी परंपरेची पुनर्मांडणी करणारे समाजसुधारक आणि लेखक आहेत.त्यांनी सामाजिक समतेचा आग्रह धरत आणि बहुजनांसाठी न्यायाची भूमिका घेत लोकशाही व्यवस्थेचा पाया घातला.शूद्र,अतिशूद्र आणि स्रीयांच्या मुक्तीसाठी हयातभर कार्य करत बहुजन संस्कृतीला आकार दिला.शेती,पाणी,शिक्षण,उद्योग, अर्थ,धर्म, जात,इतिहास,स्री प्रश्न आदीसंबंधाने त्यांनी केलेले कार्य आणि व्यक्त केलेले विचार हे बहुजनकेंद्री आधुनिक भारताच्या घडणीला दिशा देणारे आहे.समकालीन वास्तव आणि इतिहासाची चिकित्सा करत त्यांनी लिहिलेले साहित्य हे आधुनिक मूल्यविचार प्रकट करणारे आणि बहुजनांच्या हक्काची भाषा बोलणारे मूलभूत सृजन आहे.सामाजिक न्याय हे मूल्य त्यांच्या संपूर्ण बहुजनवादी कार्याच्या केंद्रव्रती आहे.या मूल्यांचा आग्रह धरत त्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली.            याच कार्यसूत्राला केंद्रव्रती ठेवत प्रल्हाद जी.लुलेकर यांनी सदर ग्रंथाची मांडणी केलेली आहे.आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक; तसेच बहुजन समाजाच्या सर्वकष परिवर्तनाचे नायक म्हणून महात्मा फुले यांच्या कार्याची यथोचित मांडणी या ग्रंथातून झालेली आहे.          पाच दीर्घ लेखाच्या माध्यमातून हा दोनशे अठ्ठेचाळीस पृष्ठांचा ग्रंथ सिध्द झालेला आहे.‘जोतिराव फुले यांचे पहिले चरित्र’हा या ग्रंथातील पहिला लेख.तो पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी १९२७ साली लिहिलेल्या ‘महात्मा जोतीराव फुले’या चरित्राचा वेध घेणारा आहे.या लेखातून फुले चरित्रलेखनाच्या प्रयत्नाचा आढावा घेत पंढरीनाथ पाटील यांनी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या पहिल्या विस्तृत चरित्राच्या सामर्थ्यस्थळांची चिकित्सक मीमांसा केलेली आहे.पाटील यांची कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्वाचाही परिचय यानिमित्ताने करून दिलेला आहे.चरित्रलेखनाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करून मूल्यमापन केल्याने हा लेख या चरित्राचे महत्त्व विशद करणारा आहे.बहुजनांचे नायक म्हणून पंढरीनाथ पाटील यांनी रेखाटलेले फुलेचरित्र हा सत्यशोधक चळवळीचा अनमोल दस्तऐवज असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण लुलेकर यांनी नोंदवलेले आहे.महात्मा फुले यांनी बहुजन संस्कृतीला कशारीतीने आकार दिला याचेही सूचन या लेखातून होते.त्यामुळे सदर ग्रंथातील हा पहिलाच लेख महात्मा फुले बहुजन संस्कृतीचे जनक कसे आहेत,याचे अधोरेखन करणारा आहे.           ‘बहुजन संस्कृतीचे जनक’हा एक्क्याऐंशी पृष्ठांचा दुसरा दीर्घलेख या ग्रंथातील बीजलेख आहे.बहुजन संस्कृतीच्या जनकत्त्वाची मूलगामी चर्चा या लेखातून झालेली आहे.‘बहुजन’हा शब्द महाराष्ट्रात फारच ढोबळपणाने वापरला जातो.त्याची व्याख्या-व्याप्ती सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला;परंतु त्यातून नेमकेपणाने ही संकल्पना स्पष्ट होऊ शकलेली नाही.या संकल्पनेचा सर्वसमावेशक व अचूक अर्थ प्रथमच या लेखातून विशद झालेला आहे.‘शोषण’हाच बहुजनवादाचा मूलाधार असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.शोषित समूहांच्या मुक्तीसाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची नोंद करून ते बहुजनवादाचे आद्यप्रवर्तक कसे ठरतात,याचे साधार विवेचन या लेखातून आलेले आहे.समता,बंधुता, मानवता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या स्वीकारासह शोषणमुक्त झालेल्या बहुजनांची ती‘बहुजन संस्कृती’असे सांगून ही संस्कृती महात्मा फुले यांनी कशाप्रकारे घडवलेली आहे,याचे विस्ताराने विवेचन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.‘बहुजन’ संकल्पनेचे केलेले विश्लेषण आणि त्याधारे महात्मा फुले यांच्या बहुजनवादी कार्यदृष्टीची केलेली मांडणी मराठी वैचारिक लेखनाला नवा विचारगर्भ आशय देणारी आहे.                  महात्मा फुले यांच्या लेखनातील १८८३ साली प्रसिध्द झालेला‘शेतकर्याचा असूड’हा अक्षरग्रंथ आहे.या ग्रंथाच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय शेतकर्यांच्या दु:खाचा विराट पट प्रकट झालेला आहे.या देशातील शेतकरी हा बहुजन संस्कृती निर्माणातील अविभाज्य घटक आहे.या समूहाच्या शोषणाची पोटतिडकीने मीमांसा महात्मा फुले यांनी केलेली आहे.याच मीमांसेचा अन्वयार्थ प्रल्हाद लुलेकर यांनी बहुजनवादी दृष्टीतून आणि वर्तमान शेतीवास्तवाचे परिप्रेक्ष्य स्वीकारून‘एवढे अनर्थ एका अविद्येने…’या लेखातून लावलेला आहे.हा अन्वयार्थ आजच्या शेतीच्या दु:स्थितीची कारणमीमांसा करणारा आणि शेतीविषयक चिंतनात नवी भर टाकणारा आहे.महात्मा फुले यांनी बहुजनांना सत्य आणि नितीवर आधारलेल्या नव्या सार्वजनिक सत्यधर्माचे तत्त्वज्ञान सांगितले.हे त्यांचे तत्त्वज्ञान त्यांच्या महानिर्वाणानंतर प्रकाशित झालेल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’(१८९१) या ग्रंथात उपलब्ध आहे.या ग्रंथाचे अंतरंग ‘सत्य आणि नीती हाच धर्म’या लेखाधारे प्रल्हाद लुलेकर यांनी मूल्य चिकित्सा करत स्पष्ट केले आहे.हे तत्त्वज्ञान वैश्विक असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. […]

राजन गवस नावाचा माणूस : एकनाथ पाटील

   संवेदनशील लेखक, हाडाचा शिक्षक आणि आस्थेचा परिघ विस्तारणारा माणूस.        कसलाही गाजावाजा नाही, भपका नाही, बडेजाव नाही, हारतुरे नाहीत, शाली नाहीत की  कौतुकाची भाषणं नाहीत आणि अत्यंत साधेपणाने ‘गवस गुरुजी’  सेवानिवृत्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या माणसाची ही अशी सेवानिवृत्ती कदाचित अनेकांना आश्चर्यकारक वाटली असेल. पण त्यांना खरेच जवळून जे ओळखतात त्यांना कदाचित […]

निडो तानियाम्स आणि नॉर्थ इस्ट : दगडू लोमटे

निडो तानियाम्स याची हत्याआणि नॉर्थ इस्ट :काही अनुभव … गेल्या २०१३ या वर्षात मार्च व एप्रिल या महिन्यात मी आणि माझे ३२ सहकारी अनिल हेब्बर  याच्या नेतृत्व खाली नॉर्थ इस्टच्या दोऱ्यात होतो. अरुणाचल ते शांतीनिकेतन अशी ही “भारत जोडो मैत्री यात्रा” होती. या यात्रेचा मूख्य उद्येश हा याभागातील परस्थिती आणि त्यावर काय करता येईल का? असा विचार […]

‘हुमान’अस्वस्थ जाणिवांची कविता -किशोर कवठे

हुमान : मुखपृष्ठ मानवी जाणिवा अस्वस्थ व्हायला लागल्या की त्यातून मूक संवेदनेची अभिव्यक्ती होत असते. प्रत्येक कलावंत स्वतःची जाणीव, अनुभव आणि निरीक्षणाच्या मदतीने समृद्ध करीत जातो. शब्द वैभव प्रत्येकाच्या ठायी वास करीत असते. किंबहुना ते परंपरेने रक्तात भिनलेले असते. ज्यांना जगण्याचा सूर गवसला त्यांचे शब्द जीवनगाणे होत असतात. स्त्रिची जाणीव संसाराच्या रहाटगाड्यात अस्वस्थ झालेली असते. […]

“जू ” :अस्वस्थ करणारं आत्मकथन

ऐश्वर्य पाटेकर यांचे “जू “ हे आत्मकथन वाचले. खूप दिवसांपासून वाचण्याची इच्छा होती. पण मिळत नव्हते. अक्षरपेरणीचे संपादक बाळासाहेब घोंगडे यांनी पुण्याहून पाठवून दिले.  एका मनस्वी लेखकाने त्याचे अत्यंत वादळी आणि वेदनामय बालपण यात शब्दबद्ध केले आहे. बालवयात सोसावे लागलेले चटके, पडणारे प्रश्न, त्याची न मिळणारी उत्तरे, बोली भाषेत अतिशय समर्पकपणे मांडलेली आहेत. यातील मायलेकरांचा, […]

जेजुरी नंतरची कविता महाद्वार :देवा झिंजाड

डॉक्टर बाळासाहेब लबडे लिखित “महाद्वार” हा कविता संग्रह विजय प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे.महाव्दार ही भारतीय अध्यात्मातील व्यापक कल्पना आहे.महाद्वार हे मुक्तीचे द्वार आहे.जन्ममरणाच्या फेर्यात अडकलेल्या माणसांना वैकुंठाचा रस्ता जेथून सापडतो.अशा प्रवेशाचे द्वार अशी पारंपरिक मानसिकता या मागे आहेे.या सगळ्या पार्श्वभुमीवर अध्यात्मातील सध्यकालीन वास्तव या कवितासंग्रहाने मांडले आहे. माणसास सतत परात्म शक्तीची भिती वाटत आलेली त्यातून […]

गोडी वाचनाची .. :सौ.सुरेखा बोऱ्हाडे

आठवण पुस्तकाची..गोडी वाचनाची…-सौ.सुरेखा बोऱ्हाडे        मी सहावीत होते तेव्हा लोकमान्य टिळकांवरचे ४० पानी पुस्तक ग्रंथालयातून वाचायला मिळाले. मला खूप आवडले ते.मी वाचनात रंगले पण वाचन झाल्यावर हे पुस्तक परत करायला लागणार म्हणून मी ते लिहून ठेवले. त्यावेळी ते काम चिमुकल्या हातांना कठीण होते. पण पुस्तक प्रेमाने ते सहज झाले.खेडेगाव होते माझे त्यामुळे अगदी […]

रुमणपेच :

ग्रामीण समाजाचे वास्तव मांडणाऱ्या कथा. मागच्या दोन ते तीन दशकातील सामाजिक चालीरीती श्रध्दा आणि अंधश्रद्धा यात आडकलेल्या समाजातील खरं रूप मांडणाऱ्या वास्तव कथा. सामाजिक अर्थशास्त्राची बिघडलेली घडी, ग्रामीण कुटुंबांस सोसावे लागलेले हाल अपेष्टाचं विव्हळतं अन् दुखरं रुप म्हणजे प्रा.सु.द.घाटे यांचा रुमणपेच कथासंग्रह.. नव्या पिढीला जुन्या जगण्याचं कोडं पडावं येवढं भावनात्मक करणारं प्रश्नमय गुढ म्हणजेच रुमणपेच. […]