Category: मे

बुद्धपूर्व इतिहास, भारताचा : वा.वि. मिराशी

बुद्धपूर्व इतिहास, भारताचा :___________________________________________ – मिराशी, वा. वि. भारताचा अगदी आरंभापासून ते गौतम बुद्धाच्या जन्मापर्यंतचा (इ. स. पू. सु. ६२३) इतिहासयेथे विवक्षित आहे. या काळाच्या इतिहासाचे मुख्य साधन पुराणांत नमूद केलेल्या परंपरा हे आहे. या परंपरा सूतांनी मुखोद्‌गत करून राखल्या होत्या. वैदिक काळातही इतिहासपुराण हा अध्ययनाचा विषय होता. हे उपनिषदातील (छांदोग्य उपनिषद् अ ७—खं. १) […]

आई समजून घेताना दोन पिढ्यांची होरपळ- डॉ.सुधाकर शेलार

उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक मराठी साहित्यातील एक वेगळा प्रयोग ठरावा असे आहे. यापूर्वीही असाच एक वेगळा प्रयोग डॉ.नरेंद्र जाधव यांनी ‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाच्या रूपाने केलेला होता. हे दोन्हीही प्रयोग दलित साहित्याशी निगडित अशा स्वरूपाचे आहेत, हे विशेष. या दोन पुस्तकांमुळे दलित आत्मकथनांमध्ये निर्माण झालेले आवर्त वर्तुळाबाहेर जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत असे म्हणता […]

सोशल मिडिया आणि ‘ती’ – संदीप नाझरे

‘बघ ना, तुझ्यासाठी गजरा आणलाय !’“अय्या खरंच?” म्हणत ती मोबाईल टेबलवर ठेवून गजरा केसात माळायला कपाटाच्या आरशासमोर जाते. इतक्यात तिच्या मोबाईलवर मेसेंजरची टिकटिक सुरू होते. शर्टाची बटने काढता काढता नवरा तिचा मोबाईल घेऊन मेसेंजर उघडतो.‘हाय’,  ‘डिअर’, ‘बोल ना’, ‘ऑनलाइन तर दिसतेयस्’ ‘फिलींग अलोन डिअर’ ‘आपण भेटूया का?’ ‘तुला कधी वेळ असतो?’हे अनोळखी व्यक्तीचे मेसेज बघून […]

चिंतनशील कवितेचे आकाश’- गीतेश शिंदे

’चिंतनशील कवितेचे आकाश’               १९८२ मध्ये ‘प्राक्तनाचे संदर्भ’ आणि २००१ सालातील ‘बरेच काही उगवून आलेले’ या दोन संग्रहांनंतर मौज प्रकाशनाकडूनच ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्करांचा २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘भरून आलेले आकाश’ हा तिसरा कवितासंग्रह. निसर्गातील प्रतिमांच्या, प्रतिकांच्या सहाय्याने संग्रहातील ७६ कवितांतून भेटत राहतं ते धामणस्करांनी चितारलेलं व्यापक आकाश. ह्या […]

डाकीण : हिंदू व बौद्ध – डॉ. अशोक राणा, यवतमाळ

डाकीण : हिंदू व बौद्ध           ________________________            डॉ.अशोक राणा,यवतमाळ. मोठाले डोळे व त्यांची बाहेर आलेली बुबुळं, विस्फारलेले केस व फेंदारलेलं नाक, दाताचे टोकदार सुळे व अणकुचीदार वाढलेली लांब नखं, अशी काळाकुट्ट चेहरा असलेली डाकीण झाडावर राहाते व झाडाखाली गेलेल्या लहान मुलांना खाऊन टाकते, अशी खेड्यापाड्यांतून राहाणाऱ्या लोकांमध्ये […]

बुद्धमूर्ति : पु.वि.बापट

प्रस्तावना गौतमबुद्धाचे जीवितकार्य, बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान व संप्रदाय यांप्रमाणेच बुद्धमूर्ती हाही अभ्यासकांच्या संशोधनाचा व व्यासंगाचा महत्त्वाचा विषय ठरला आहे. बौद्ध धर्मातील प्रतीके व मूर्तिपूजा यांची परंपरा आद्य बुद्धमूर्ती, बुद्धमूर्तीच्या स्थल-काल-वंश-संप्रदाय-सापेक्ष वेगवेगळ्या शैली, बौद्ध प्रतिमाविद्या यांसारख्या अनेक दृष्टींनी हा अभ्यास केला जातो.बुद्धमूर्तींचा उगम बौद्ध धर्माप्रमाणे भारतात झाला. बुद्धोत्तर सु.बाराशे ते पंधराशे वर्षांच्या काळात ही मूर्ती पश्चिम […]

युद्धशाळा . डॉ. राजेंद्र मुंढे ,वर्धा

: परिचय :  ० नाव : राजेंद्र दुर्योधन मुंढे  ० जन्मदिनांक : १० डिसेंबर १९६२   ० शैक्षणिक पात्रता : एम. ए. मराठी प्रथम श्रेणी १९९१ , बी. एड , सेट (मराठी ), पीएच. डी.   ० पत्ता : आर्वी नाक्यामागे , ज्ञानेश्वर नगर , वार्ड ९ , वर्धा . ४४२००१. मो ९४२२१००४९   ० […]

बदलत्या गावाचा वेध घेणारी गझल : शंकर घोरसे, नागपूर

गाव गावात गाव माझे आता मला दिसेनामाझेच गाव आहे विश्वास हा बसेना आपापल्या जगी हे सारेच कैद झालेकोणी कुशल कुणाचे कोणासही पुसेना हाकीत लोक होते जेथून गावगाडापारावरी सुन्या त्या कोणी कसे जमेना जातीत वाटलेला नव्हता समाज तेंव्हाजातीनिहाय आता झाल्यात येथ सेना शोधावयास चारा पिल्ले उडून गेलीघरटे उदास झाले त्याला कुणी बघेना कोणाकडेच कोणी का येत […]

विश्वाचे मूळ : सौ. सुरेखा बोऱ्हाडे,नाशिक

विश्वाचे मूळ        गप्पा सुरु झाल्या की मग हळूहळू त्या प्रवाहात बोलण्याच्या विषयाला धरुन किंवा मग त्या विषयाच्या  अनुषंगाने , दुस-या अनेक मनातल्या गोष्टी प्रवाहीत होतात.कौटुंबिक गप्पात त्यातही बहिणी आणि मैत्रिणीमध्ये तर मी कायम हसत म्हणत असते ,”मी जन्मापासून वीस वर्षे आईला आणि लग्नानंतर नव-याला सोडून एक दिवसही कुठे राहिले नाही. अगदी दिवाळीला […]