सातारा जिल्ह्यातील कामशिल्पे असणारी मंदिरे
मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञानाची मूक साक्षीदार असलेली ही मंदिरे आपल्या समृद्ध कलेइतिहासाचा वारसा असून, यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. […]