पहाडी आवाजात प्रथम मानकरी : शिवशाहीर बाबासाहेब देशमुख.
पहाडी आवाजात प्रथम मानकरी : शिवशाहीर बाबासाहेब देशमुख.
- दत्तात्रय मानगुडे
………….. भाग पहिला……..।
.. लेखक दत्तात्रय पांडुरंग मानुगडे.
…………….. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कलाकाराची भूमि आहे साहित्यिकांची भूमी आहे आणि शाहिरांची भूमी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कला ही फूल बाजारात विकत मिळत नाही अनुवंशिक असावी लागते आज वरच्या कलाकारांनी महाराष्ट्र मध्ये भरपूर नाव कमवून महाराष्ट्राचे नाव प्रगतीपथावर आणले आहे. म्हणून च कलेचे माहेर घर असे संबोधले जाते. या कला क्षेत्रामध्ये अनेक तमासगीर शाहीर जन्माला येऊन तो तो काळ फार मोठ्या प्रमाणात गाजविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अज्ञानदास हे एक शाहीर होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा. अफजलखानाचा वध हा पोवाडा त्यावेळी गायला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी व आई जिजाबाई यांनी या अज्ञानदास शाहिराला सोन्याचे कडे व एक घोडा बक्षीस दिला होता. ही शायरी कला पुढे चालू करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगले प्रयत्न केले होते म्हणूनच ही कला आज अखेर टिकून आहे. त्यानंतर शाहीर अमर शेख अण्णाभाऊ साठे यांची पिढी शायरी क्षेत्रात दिसू लागली. यांच्यानंतर पिराजी सरनाईक श्रीपतराव लोखंडे भेदिक शाहीर हैदर बापूसाहेब विभुते रमजान बागणीकर शाहीर साबळे किसनराव हिं गे शाहीर निवृत्ती शाहीर रंगनाथ मेथे उपळावी कर शाहीर आनंदराव सूर्यवंशी व याच वेळी मालेवाडी चे शिवशाहीर पहाडी आवाजाचे प्रथम मानकरी बाबासाहेब देशमुख ही मोठी वल्ली जन्माला आली….।
.. पूर्वीच्या शाहिरां ची माझ्या माहितीप्रमाणे अज्ञानदास याचे मूळ नाव आगीन दास असे होते त्यांच्या अगोदर शाहीर यमाजी शाहीर तुळशीदास यांची नावे पुढे येतात. त्याचप्रमाणे कराडचे मानवत शिवलिंग रंगनाथ मेथे यांचीही नावे पुढे येतात. पूर्वीच्या शाहिरी बाजा मध्ये गायनाचा प्लॅटफॉर्म वेगळा होता पुढे पुढे या शायरी कलेला वेगळा बाज मिळाला. त्यापैकी पूर्वीचे राम शाहीर तुपारी कर शाहीर निकम कुंडल ही मंडळी फार पूर्वी नावाजलेली होती. हल्ली सांगली जिल्ह्यामध्ये बजरंग आंबी मोहन यादव अनंत साळुंखे शाहीर नंदकुमार माळी प्रसाद विभुते शाहीर गुलाब मुल्ला रामचंद्र जाधव अवधूत विभुते आ दम बागणीकर ही मंडळी दिसून येते. मंडळी शाहिरी कला अतिशय अवघड आहे वर लिहिल्याप्रमाणे शाहिरी बास हा अनुवंशिक असला पाहिजे एवढे मात्र निश्चित. हल्ली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाहीर यांची संख्या वाढत आहे यात आनंदच आहे पण ही कला टिकली पाहिजे असा विचार या मंडळींनी केला पाहिजे. शाहीर बाबासाहेब देशमुख यांची जन्म कथा आणि यशोगाथा एका लेख हे लेखन होत नाही कारण शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा स्वतंत्र प्लॉट फॉर्म आहे. इतर शाहीर पेक्षा हे शाहीर वेगळे आहेत आई सोनाबाई वडील पांडुरंग जाधव यांच्या पोटी 13 मार्च 1938 ला मालेवाडी या खेड्यामध्ये झाला. या शाहिरांचा जल्म धार्मिक असाच आहे ते ज्या वेळी आईच्या पोटामध्ये होते त्यावेळी त्यांची आई पंढरपूर वारीला गे लि असता त्यांना अडबंगीनाथ यांनी केले ले भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी वयाच्या नवव्या वर्षी दैवी साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी गृहत्याग केला. व पंढरपूर वाळवंटात जाऊन बसले मंडळी या व्यक्तीचे मुळ नाव पश्चिम नाथ हे वाळवंटात असताना त्यांना श्री संत गाडगे बाबा भेटले. गाडगेबाबांनी या पश्चिम नाथाला पाहिले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात काठीचा प्रसाद दिला…।
… नंतर गाडगेबाबांनी ह. भ. प. स्वामी नामानंद महाराजांच्या स्वाधीन केले. त्यांच्या कृपा आशीर्वादाने भोळ्या पश्चिमा नाथाचा भोलेनाथ झाला वयाच्या 14 व्या वर्षी त्यांच्या भजन कीर्त नावर खुश होऊन पब्लिक त्यांना चांगले नाव जू लागले. एके दिवशी कार्यक्रम करीत करीत ते येवला जिल्हा नाशिक येथे कीर्तनाचा कार्यक्रम करीत असताना हा त्यांचा कार्यक्रम मो ती लाल परदेशी यांना फार आवडला म्हणून मोतीलाल परदेशी व त्यांच्या मातोश्री यांनी चार चाकी गाडी बक्षीस म्हणून दिली. संत ज्ञानेश्वरांच्या आदेशाप्रमाणे बाबासाहेब देशमुख स्वतः गीते येऊ लागले यांना शाळेचा वारसा नसताना ते स्वतंत्रपणे काव्य रचना करू लाग ले. आम्ही गाऊ कीर्ती चे पोवाडे कीर्तना कडून त्यांनी शाहीर इकडे प्रवास सुरू केला त्यावेळी मराठा शाहिरी परिषदेचे अध्यक्ष शाहीर किसनराव हिं गे यांच्या स वे बिंदुमाधव जोशी यांनी पुण्यामध्ये 1981 सा लि त्यांची प्रगल्भ मुलाखत घेतली होती..
…………….. भाग दुसरा……।
…. या मुलाखतीनंतर शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे नाव महाराष्ट्र भर झाले. बाबासाहेबांना फार आनंद झाला केलेल्या कामाचे कौतुक झाले असं त्यांच्या मनाला वाटू लागलं. त्यांना गर्ल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेपुढे आणायचा होता तो ही स्वतः लिहिलेल्या कवनातून. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला घरोघरी पोहोचवायचा आहे इतकच नव्हे तर सातासमुद्रापार आगळ्या वेगळ्या ढंगात पोचवायचे स्वप्न बाबासाहेबांची होतं. आणि ते स्वप्न त्यांनी खरे केल आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते बाबासाहेब यांनी खेडोपाडी ग्रामीण भागात इतकंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र एकेकाळी पिंजून पिंजून काढला होता. त्यांना पहाडी आवाजाची देणगी जन्मता परमेश्वराने दिली होती शिवाय त्यांच्या कुटुंबातील सारी माणसं सात्विक असल्यामुळे ही कला त्यांना परमेश्वराने दिली आहे. त्यांच्या गौरव तर पुष्कळ झालेच पण त्यांच्या पार्टीमध्ये जाणारी माणसं ही आज रोजी कार्यक्रमातून आढळतात व म्हणतात मी बाबासाहेबांचा शिष्य आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे शिष्य आज रोजी महाराष्ट्रभर कार्यक्रम करत आहेत हा किती मोठा बाबासाहेबांचा मान आहे. यांची कॅसेट महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत शिवजयंतीला बाबासाहेब देशमुख यांचे लावली जातात. छत्रपती शिवरायांना त्रिवार जय जय कार हे गीत ऐकले की अंगावर शहारे येतात. तसेच मालेगाव सहकारी साखर कारखान्यावर याचे फलित म्हणून माननीय राष्ट्रपती डॉक्टर नि झेल सिंग यांच्या हस्ते. चांदीची तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता तसेच शूरवीरांचे थोरा मोठ्यांचे गुणगान गाताना त्यांची वाणी कधीही सोडली नाही…।
.. अशिक्षित असूनही नो समाजाला घडवण्यासाठी अहोरात्र बाबासाहेबांनी स्वतःचा देह झिजवला. त्याचप्रमाणे दूरदर्शन मुंबईवर यांनी गायलेला तानाजीचा पोवाडा फार गाजला होता. यशवंती पाठीमागे फि र कडा कपारी चिरणारा तो पहाडी बुलंद आवाज मरगळलेली मने पुनर रुपी चेतवून उठवीत आहेत. गड आला पण सिंह गेला क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय जवा नानी बांगलादेशात केलेल्या पराक्रमाची गाथा भगतसिंग पासून भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पर्यंत. त्यांच्या विचारायचे पोवाड्याच्या माध्यमातून अमर साहित्य जनमानसात चिरस्मरणीय भिनले आहे. ही रात्र शाहिरांची ही रात्र वैऱ्याची महाराष्ट्र दर्शन असे असंख्य कार्यक्रम त्यांनी समाजापुढे ठेवून एक चांगला इतिहास बाबासाहेबांनी घडविला आह.. तसेच बाबासाहेबांनी पंढरपूर येथे शिव आश्रम स्थापन करून एक चांगलं कार्य त्यांनी केल आहे. बाबासाहेब देशमुख हे शाहीर कधीच लक्षा तून जाणार नाहीत इतक त्यांचं नाव फार मोठे झाले आहे अशी कलाकार मंडळी पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही हे तर आम जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. बाबासाहेबांनी सारे आयुष्य कलेसाठी घाल विल आणि देशमुख घराण्याच नाव फार मोठे केलं हे नाकारता येत नाही. मी बाबासाहेबांचे पुष्कळ कार्यक्रम पाहिले आहेत त्यांनी शाहिरी साज अंगावर चढवला की मला शाहू महाराजांची आठवण येते एवढे मात्र निश्चित. असा हा राजबिंडा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2003 रोजी आपला देह ठेवून अनंतात विलीन झाला. तरीही बाबासाहेब आपल्या जवळ आहेत असा भास होतो त्यांचा आवाज अमर आहे आणि याच आवाजात बाबासाहेब देशमुख आम जनतेला भेटतात हे खोटे नाही. यांचा पोवाडा चालू असला म्हणजे त्यांच्या तोंडातून सांगली जिल्हा वाळवा तालुक्याला…. मुक्कामी मी मालेवाडी ला. पूर्ण चढ उनी शाहिरी सा जा ला.
शाहीर देशमुख गातो पोवाड्याला. जी. जी. ही त्यांची ओळ आज रोजी अजरामर आहे अशा महान कलाकाराला पहाडी आवाजाच्या गुण व्यक्तीला माझा मानाचा मुजरा धन्यवाद मंडळी..।