2020 एप्रिल

आत्महत्येशी जरा बोलू या – डॉ. महेंद्र कदम

सा हि त्या क्ष र 

सुशांत, एका यशोशिखरावर असताना आपली जीवनयात्रा संपवून सगळ्यांना धक्का देतो। अशाच अनेक तरुण #शेतकऱ्यांनी मधेच आपल्या जीवनयात्रा संपवल्या आहेत। हे सगळे तरुण आहेत। सुशांतच्या आत्महत्येने संवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येनं नैतिकतेच्या प्रश्नावर बोट ठेवले आहे। म्हणजे तो कर्जबाजारी झाला आणि फेडायचे नव्हते, शासनाची मदत मिळवायची म्हणून तो आत्महत्या करतो, असे आपण काही बाही बोलत राहतो। अशा आत्महत्या झाल्या की आपण एक दिवस हळहळतो आणि पुन्हा सगळे विसरून जातो।

मागे ना. धो. महानोर यांनी “काळोखाचा मार्ग तुझा नाही” असे आवाहन करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता। आताही सुशांतच्या निमित्ताने आपण विसंवादाबद्दल बोलू लागलो आहोत। मुळात आपल्यातला संवाद का कमी झाला, या मूळ प्रश्नाकडे आपण पहायला तयार नाही। प्रत्येक गोष्ट सोपी करून टाकली आहे। पटत नाही, घटस्फोट घे। पटत नाही ,घर सोड। पटत नाही, बोलणे बंद कर। पटत नाही मौनात जा। या न पटण्यात बाप, आई, मुलगा, नवरा बायको, मित्र, मैत्रीण सगळे आले। प्रत्येकाचे एक स्वतंत्र बेत झालेय। बेटाचा हा रोग महानगरापासून वाड्या वस्त्यापर्यंत पसरला आहे। कुणी कुणाचे ऐकायला तयार नाही। कुणी कुणाला समजून घ्यायला तयार नाही। कुणी कुणासाठी खर्ची व्हायला तयार नाही। प्रत्येकजण आपल्या एकटेपणात मश्गुल आहे। आणि ही खरी समस्या आहे।

एकूण जागतिकीकरण नावाच्या आजच्या अजगराने अख्खे माणूसपण गिळंकृत करून टाकले आहे। माणसाला तंत्राच्या साहाय्याने एकटे पाडून त्याच्याजवळ जे जे काही आहे ते काढून घेण्याची एक जीवघेणी स्पर्धा लागली आहे। त्यात शेतकरी, कामगार आणि चंदेरी दुनिया काहीही अपवाद राहिला नाही। तुमच्यातील समूहभाव संपला की तुम्हाला काहीही करता येते, हा आजच्या तंत्राचा फंडा आहे। हा फंडा वेगाने यशस्वी होतोय। त्यात अनेकजण बळी पडत आहेत।
या मोठ्या विस्ताराचा एक तुकडा म्हणजे #सुशांतचे जाणे आहे। त्याच्या जाण्याची कारणे शोधण्यात काही हशील नाही। त्याला शेवटच्या क्षणी कुणाशी बोलावे वाटले नाही, किंवा शेअर करावे वाटले नाही, #असेकाझाले ? हा खरा प्रश्न आहे। #छिछोरेच्या निमित्ताने आत्महत्या हा आपला मार्ग नाही असे सांगणारा सुशांत असे का वागतो, याचे उत्तर मिळत नाही। मधल्या सुट्टीत त्याचे बरेच सिनेमे पाहिले होते। त्याचा अभिनय मला भावून गेला होता।

आत्महत्येचा हा प्रश्न केवळ पैसा, प्रसिद्धी अथवा यश याच्याशी बांधलेला नाही। या वाटेवर जाऊन मीही परत आलो आहे। सुशांत सारखा मीही लहानपणीच आईला पोरका झालेलो आहे। माझ्यातही तो एक भावनिक ओलेपणाचा भाग कोरडाच राहून गेल्याने ती वाट मीही पाहिली होती। पण तिथून परतलो आहे। परतीच्या या मार्गावर केवळ संवाद हाच एकमेव मार्ग आहे, हे माझ्या खूप पूर्वी लक्षात आले आहे। आणि तोच आपल्यात राहिला नाही। काहीही झाले तरी प्रत्येक प्रश्नाला #संवाद हा उतारा आहे। भलेही आपल्या आतल्या नेणिवेचे मित्रांनी भांडवल केले तरी चालेल, तुम्हाला कोणी दुबळा म्हटले तरी चालेल। तुमच्या या सगळ्याचे कोणी भांडवल केले तरी चालेल। पण मित्रानो संवाद तुटता कामा नये। तो तुटला की सगळे प्रश्न मेंदूत रुतून बसतात आणि मग आपला लोचा होऊन जातो। हा लोचा कळून येईपर्यंत आपल्या हातातले सगळे पत्ते संपलेले असतात। तेव्हा कुणाला तरी आपला मित्र मानायला हवे।

कितीही खाजगी जग असले तरी ते कोंडून ठेवून चालत नाही। त्याला वाट करून द्यावी। बोलावे, लिहावे, वाचावे, भंकस करावी, सिनेमे पाहावे, भटकावे, रानामाळात रमावे, निसर्गात हुंदडावे, मैत्र जपावे, आईवडलांशी मोकळे बोलावे, फोटो काढत फिरावे। पम आपल्या आत गुंतून पडू नये अशा वेळी। #समूहभाव, #समंजसपणा, #स्वीकारशीलता ही मूल्ये महत्त्वाची आहेत आपल्या जगण्यात।

ती मूल्ये घेऊन मित्रांनो संवादाचा पूल बांधायला हवा !!
उद्या कोणी नवा सुशांत जन्मू नये।
शेतकऱ्यानेही ती वाट निवडू नये।
त्यासाठी आपला हात पुढे करू या!
मैत्र वाढवून जगणे सोपे करु या!
संवादाचा पूल बळकट करू या !!
— प्रा.डॉ.महेंद्र कदम

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment