2020 एप्रिल

सिग्मंड फ्रॉइड : (६ मे १८५६ – २३ स प्टें बर १९३९ )

सा हि त्या क्ष र 

सिग्मंड फ्रॉइड : (६ मे १८५६ – २३ स प्टें बर १९३९ ).

प्रख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ , वैद्य व मनोविश् ‍ लेषणाचे प्रणेते . त्यांचा जन्म सध्याच्या चेकोस्लोव्हाकियातील पर्झीबॉर ( पूर्वीच्या ऑ स्ट्रि यातील फ्रायबर्ग , मोरेव्हिया ) येथे एका ज्यू कुटुंबात झाला . त्यांचे वडील व्हिएन्ना येथे येऊन स्थायिक झाले होते . व्हिएन्ना येथेच सिग्मंड फ्रॉइड यांचे शिक्षण झाले . १८८१ मध्ये फ्रॉइड यांनी व्हिएन्ना विद्यापीठातून एम् . डी . ही पदवी घेतली आणि तेथेच ते १८८३ पासून अध्यापन करू लागले . १८८२ मध्ये ते त्यांच्या बहिणीची हँबर्ग येथील मैत्रीण मार्था बेर्नाइस हिच्या प्रमात पडले पण अपुऱ्‍या उत्पन्नामुळे १८८७ पर्यंत ते तिच्याशी विवाहबद्ध होऊ शकले नाहीत . ह्या दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या प्रेयसीला लिहिलेल्या व पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेल्या सु . ९०० पत्रांतून त्यांच्या व्यक्तिमत्वावर चांगला प्रकाश पडतो . १८८७ ते ९५ ह्या काळांत त्यांना तीन मुलगे व तीन मुली झाल्या . त्यांपैकी सर्वात धाकटी ॲना फ्रॉइड ही असून तिनेही मनोविश् ‍ लेषणज्ञ म्हणून कीर्ती संपादन केली . १९०२ मध्ये त्यांनी व्हिएन्ना येथे केलेल्या संशोधनास मान्यता मिळाली आणि त्यांची व्हिएन्ना विद्यापीठात तंत्रिकाचिकित्सा ( न्यूरॉलॉजी ) विभागाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली . १९३८ पर्यंत त्यांनी याच जागेवर काम केले . १८८४ मध्ये त्यांनी ब्रॉ इअरसमवेत उन्माद झालेल्या रोग्यांवर संमोहन निद्रेच्या साह्याने उपचार केले . १८८५ – ८६ मध्ये त्यांनी फ्रेंच तंत्रिकातंत्रविशारद ⇨ झां मार्‌तँ शार्को (१८२५ – ९३ ) यांच्या समवेत पॅरिस येथे तसेच नॅन्सी येथे बर्नहाईम यांच्या समवेत काम केले व १८८६ मध्ये व्हिएन्ना येथे परत येऊन तंत्रकाविकृतितज्ञ ( न्यूरोपॅथॉलॉजिस्ट ) म्हणून स्वतंत्र व्य वसाय सुरू केला १८९५ मध्ये त्यांनी ब्रॉइअर मिळून स्टडीज इन हिस्टेरिआ हा ग्रंथ प्रसिद्ध केला . उपचारासाठी संमोहन निद्रेची पद्धत फ्रॉइड यांना पुढेपुढे समाधान कारक वाटली नाही म्हणून १८९० मध्ये त्यांनी ती सोडून दिली आणि तिच्याऐवजी मुक्त साहचर्याची ( मनात जे येईल ते रोग्यास अनिर्बंधपणे बोलावयास लावण्याची ) म्हणजे भावविरेचनाची ( कॅ थर्सिस ) पद्धती अवलंबिली .

उन्माद झालेल्या रोग्यांचे भावविरेचन घडवून आणताना वारंवार येणारे अडथळे किंवा विस्मृती यांच्या अवलोकावरून फ्रॉइड यांनी निरो ध न सिद्धांत मांडला आणि त्यातूनच त्यांनी मनोविश् ‍ लेषणाचे तंत्र विकसित केले. रुग्णाची ⇨ स्वप्ने तसेच त्याला होणाऱ्‍या तात्पुरत्या विस्मृती , त्याच्याकडून अभावितपणे होणाऱ्‍या लिहिण्याबोलण्यातील चुका आणि हावभाव इत्यादींचा उपयोग त्यांनी निरोधित केलेल्या किंवा दडपलेल्या सुप्त इच्छांना ⇨ अबोध मनातून बोध मनात आणणे व वाट मोकळी करून देणे यांसाठी करून घेतला . त्यांच्या मते लहानपणी दडपल्या गेलेल्या लैगिंक इच्छांमध्ये मज्जाविकृतींचे मूळ असते . लहानपणी सामाजिक निषेधनि र्बधां मुळे लैंगिक इच्छांना व अनुभवांना मोकळी अभिव्यक्ती मिळत नाही त्यामुळे त्या इच्छा अबोध मनात दडपल्या जातात तेथून त्या प्रतीकरुपाने पुन पुन्हा आपल्या बोधजीवनात अवतीर्ण होण्याच्या यत्न करतात आणि त्यामुळेच अनेक ⇨ मज्जाविकृती निर्माण होतात . मनोविश् ‍ लेषणाचे तंत्र वापरून , अशा प्रकारच्या ⇨ निरोधना ने निर्माण झालेले ⇨ गंड व विकृती बऱ्‍या होऊ शकतात , असे त्यांनी अनेक मज्जाविकृत रोग्यांना बरे करून दाखवून दिले . या तंत्रास बुद्धिगम्य स्वरूप देण्यासाठी फ्रॉइड यांनी अनेक संकल्पना , संज्ञा , उपपत्ती यांची विस्तारपूर्वक मांडणी केली व आपली मनोविश् ‍ लेषण उपपत्ती प्रतिपादिली . या उपपत्ती चे अखेरपर्यंत विविध संकल्पना व सिद्धांत प्रतिपादन करून तसेच नवीन ग्रंथरचना करून ते विवेचन कर त होते . मनोविश् ‍ लेषणास सुसंगत स्वरूप देण्यात आणि मानवी मनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले .

त्यांनी व त्यांच्या सहका ऱ्‍यां नी १९०८ मध्ये मनोविश् ‍ लेषणाची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली . १९१० मध्ये त्यांनी अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठात मनोविश् ‍ लेषणावर एक व्याख्यानमालाही गुंफली . या मालेत त्यांनी दिलेली व्याख्याने पुढे इन्ट्रोडक्टरी लेक्चर्स ऑन सायकोॲनॅलिसिस नावाने प्रसिद्ध झाली . (१९१७ ). १९१० नंतर फ्रॉइडप्रणी त मनोविश् ‍ लेषणाकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले . सुरुवातीस फ्रॉइडच्या उपपत्तीला जरी वैद्यकातील गतानुगतिक व्यक्तींकडून कडवा विरोध झाला , तरी त्यां तील काही सिद्धांतांचा अनेक मान्यवर मानसशा स्त्रज्ञांकडून आणि मानसोपचारज्ञांकडून फार मोठ्या प्रमाणावर स्वी कार करण्यात आला

रुग्णालयात प्रत्यक्ष काम करताना त्यांनी ‘ कोकेन ’ या स्थानी य वेदनाहारक गुणधर्म असलेल्या औषधाबाबत एक माहितीपूर्ण निबंध प्रसिद्ध केला . काही मित्रांनाही त्यांनी डोळ्यां वरील इलाजासाठी कोकेन हे औषध सुचविले . त्यां पैकी कार्ल कोलर यांनी ते वापरून त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली . त्यामुळे कोलर यांनाच कोकेन शोधण्याचे श्रे य दिले जाते .

फ्रॉइड यांच्या ⇨ ॲल्फ्रेड ॲड्लर आणि ⇨ कार्ल युंग ह्या दोन प्रमुख सहका ऱ्‍यां नी १९११ मध्ये फ्रॉइडप्रणीत मनोविश् ‍ लेषण सं प्रदाय सोडून दिला . फ्रॉइड म्हणतात तसे प्रत्येक प्रेरणेकडे लैंगिक संकल्पनेतून पाहणे योग्य नाही , असे त्यांचे मत होते . पुढे ॲड्लर यांनी ⇨ व्यक्तीमानसशास्त्र आणि युंग यांनी ⇨ विश् ‍ लेषणात्मक मानसशास्त्र अशा दोन स्वतंत्र प्रणाली प्रवर्तित केल्या .

शास्त्रीय प्रयोगां द्वारे स्वतःची उपपत्ती व सिद्धांत पडताळून पाहण्याचा प्रयत्न फ्रॉइड यांनी कधीच केला नाही . असे असले , तरी त्यांनी मज्जा विकृतीच्या उपचारतंत्रात आणि मानसशास्त्रात आपल्या मनोविश् ‍ लेषणाद्वारे फार मोलाची भर घातली हे निर्विवाद आहे . शेवटी शेवटी फ्रॉइड यांनी धर्म , पुराणकथा , विनोद , साहित्य , कला , इतिहास इ त्यादींची मीमां साही मनोविश् ‍ लेषणसिद्धांतांना अनुसरून केली . विसाव्या शतकातील जागतिक कला – ज्ञानक्षेत्रांवर मनोविश् ‍ लेषणाचा खोल ठसा उमटलेला आहे .

विसाव्या शतकातील एक थोर विचारवंत म्हणून फ्रॉइड यांचे स्थान कायम राहील . त्यांनी मानवी मनाबाबत मांडलेल्या संकल्पनां मुळे मानवी स्वभावाबाबतच्या पारंपारीक कल्पनां मध्ये फार मोठी उलथापालथ झाली . त्यांच्या संशोधनाने प्रभावित होऊन ॲड्लर , युंग , ऑइगेन ब्लॉइलर , कार्ल अब्राहम , सँडोर फेरेंत्सी , अर्नेस्ट जोन्स , ⇨ व्हिल्हेल्म श्टेकेल (१८६८ – १९४० ), अब्राहम ए . ब्रिल (१८७४ – १९४८ ) ह्यांसारख्या ख्यातनाम व्यक्ती त्यांच्या अनुयायी झाल्या . इंग्लिश लेखक ⇨ डी . एच् . लॉरेन्स (१८८५ – १९३० ) आणि जर्मन लेखक ⇨ टोमास मान (१८७५ – १९५५ ) यांच्या साहित्यावर फ्रॉइडचा गहिरा प्रभाव पडलेला आढळतो . वस्तुतः विसाव्या शतकातील आधुनिक कला संप्रदायां वर – उदा . , अतिवास्तवा द – फ्रॉइडच्या मनोविश् ‍ लेषणाचा फार मोठा परिणाम आहे . शेवटीशेवटी त्यांच्या कार्यास पुरेपूर मान्यता मिळाली . साहित्यासाठी असलेले गटे पारितोषिकही त्यां ना मिळाले (१९३० ). हे पारितोषिक मिळाल्याचे त्यांना विशेष समाधान वाटत असे .

फ्रॉइड यांनी मानसशास्त्रीय विचारात निर्माण केलेल्या प्रवाहाचे महत्व थोडक्यात असे सांगता येईल : त्यांच्या आगेमागेच शुद्ध वैज्ञानिक पद्धतीचा अंगीकार करून मानसशास्त्र रचणारा ‘ वर्तनवाद ’ स्थिरावला होता आणि मानसशास्त्रा चे वैज्ञानिक सांगाडे तयार होत होते . परंतु एकीकडे तांत्रिक सुक्ष्मता वाढत असताना दुसरीकडे त्यातून माणसाचे माणूसपण निसटते आहे की काय , अशी शंका निर्माण होत होती . धर्म , कला , सत्वजाणीव , आत्मोन्नती , स्वप्न व जा णि वेच्या इतर पातळ्या यांच्याबद्दल सर्वसामान्य विचारी माणसाला असणाऱ्‍या जिज्ञासेला व्यूहमार्गात उंदीर कसे धावतात , त्यांची अध्ययन प्रक्रिया , अशाबद्दलच माहिती मिळू शकत होती . माणूस म्हणजे प्रतिक्षेप हे उत्तर नुसते अपुरेच नव्हे , तर अनेकांना अधिक्षेप करणारे वाटत होते . फ्रॉइड यांच्या विचारात मानवी गुंतागुंतीला स्थान मिळाले . स्वतःतील अंतर्विरोधांचाच बळी होण्याचा माणसाचा ललाटलेख त्यांनी वाचला . संस्कृतीच्या नावाने दडपल्या जाणाऱ्‍या कामप्रेरणेला त्यांनी लखलखीत उजेडात आणले . एका अर्थी मानसशास्त्राच्या अंतर्गत एकांति कते ला त्यांनी दुसरा ध्रु व दिला , त्याचबरोबर समाजांतर्गत जखडलेपणातून बाहेर येण्यासाठी दिशाही दिली. आधुनिक समाजाच्या वाटचालीसाठी मानवाच्या स्वतःच्या आकलनाची एक चौकट त्यांनी उपलब्ध करून दिली , हे महत्वाचे आहे .

कलांच्या क्षेत्रातील त्यांचा प्रभाव एका अर्थी निर्मितीपेक्षा समीक्षेच्या अंगानेच आहे , हे लक्षात घ्यायला हवे . त्यांनी दिलेली चौकट ‘ रहस्य ’ वादी ( मिस्टिक – ओरिएंटेड ) होती . कलावंतांना कामुकतेची विविध रूपे पूर्वापार वेगवेगळ्या प्रकारे जाणवत आलेली हो ती . परंतु कलावस्तूंचा अर्थ लावताना एक संपूर्ण नवी व्यवस्था फ्रॉइड यांनी उपलब्ध करून दिली . अव्यक्त जाणिवांच्या कलारूपांच्या रचनेतील शोध घेण्यासाठी तिचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झालेला आहे .

विसाव्या शतकात समाजजीवन ढवळून टाकणाऱ्‍या अनेक घटना , पंथ , संप्रदाय उदयास आले . वैचारिक क्षेत्रात ज्यांच्याशी कडाडून भिडावे असे सिद्धांत मांडले गेले . फ्रॉइड यांच्या बाजूने आणि विरोधात उभे राहून अजूनही वाद झडतात हेच त्यांच्या हातून घडलेल्या विचारजागृतीचे लक्षण मानावे लागेल .

जर्मनीत १९३३ मध्ये नाझींनी फ्रॉइड यांच्या ग्रंथांची होळी केली . १९३८ मध्ये ऑस्ट्रिया पादाक्रांत केल्यावर नाझींनी फ्रॉ इडला व्हिएन्ना सोडून जाण्यास भाग पाडले . तेथून ते लंडन येथे गेले आणि तेथेच कर्करोगामुळे कालवश झाले .

त्यांनी लिहिलेल्या प्रमुख मूळ जर्मन ग्रंथांची विविध भाषांत भाषांतरेही झाली आहेत . इंग्रजीत भाषांतरित झालेल्या त्यांतील काही उल्लेखनीय ग्रंथांची नावे पुढीलप्रमाणे : स्टडीज इन हिस्टेरि आ ( जोसेफ ब्रॉइअरसमवेत –१८९५ ), द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स (१९०० ), द सायकोपॅथॉ लॉ जी ऑफ एव्ह्‌रीडे लाइफ (१९०४ ), थ्री एसेज ऑन द थिअरी ऑफ सेंक्झुआलिटी (१९०५ ), टोटेम अँड टाबू (१९१३ ), लिओनार्दो दा व्हिंची (१९१६ ), बियाँ ड द प्ले झर प्रिन्सिपल (१९२० ), एगो अँड द इड (१९२३ ), सिव्हिलिझेशन अँड इट्स डिसकन्टेट्स (१९३० ), न्यू इंट्रोडक्टरी लेक्चर्स ऑन सायकोॲनालिसिस (१९३३ ), मोझेस अँड मॉनाथीइझम (१९३९ ) इ त्यादी . जेम्स स्ट्रेची यांनी चोवीस खंडांत संपादित केलेल्या द स्टँडर्ड एडिशन ऑफ द कम्प्लीट सायकॉलॉजिकल वर्क्स ऑफ सिग्मंड फ्रॉइड (१९५३ – ६ ४ ) मध्ये फ्रॉइड यांचे सर्व मानसशास्त्रीय लेखन संगृहीत आहे .

पहा : मनोविश्लेषण .

संदर्भ : 1. Freud, Sigmund Trans. Strachey, James, An Autobiographical Study, London, 1959.

12345672. Fromm, Erich, Sigmund Freud’s Mission : An Analysis of His Personality and Influence, London, 1959.3. Hutchins, R. M. Ed. Great Books of the Western World : Freud  (Major Works of Sigmund Freud), Chicago,1952.4. Jones, Ernest, Life and Works of Sigmund Freud, 3 Vols., New York, 1953–57.   5 .  हरोलीकर ,  ल .  ब .  सिग्मंड फ्रॉइड ,  जीवन व कार्य ,  पुणे  १९७२ .

सुर्वे , भा . ग .

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment