2020 एप्रिल

बाबासाहेबांच्या प्रेरणेने सिलिंडर वाहक कवी झाला

सा हि त्या क्ष र 

 नागपूरमध्ये सिलिंडर वाहणारा संजय गोडघाटे 

(आज दि.१४ एप्रिल.बाबासाहेबांच्या प्रेरणेने कवी झालेल्या सिलिंडर वाहक तरुणाचा प्रेरणादायी प्रवास रेखाटणारा आजचा ब्लॉग स्वत:च संजय गोडघाटे यांनी लिहिला आहे.लेखात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.- संपादक,साहित्याक्षर)

बाबासाहेबांच्या प्रेरणेने कवी झालो – संजय गोडघाटे 

साधारणतः मी पाचवी सहावीत असेल तेव्हाची गोष्ट……

आम्ही भाड्याच्या खोलीत राहायचो, आई वडील दोन लहान बहिणी आणि एक भाऊ, असं आमचं कुटुंब

वडील मजुरी करायचे,त्यावेळी रोजंदारी खूप जास्त मिळायची नाही, भाड्याची खोली, खाणारी सहा तोंड,

बरीच चणचण भासायची.

नवा शाळेचा गणवेश मी दहावीला जात पर्यंत मिळाला नाही.

मला वाचनाची आवड होती.

मराठीच्या क्रमिक अभ्यासक्रम पुस्तकातील सर्वच्या  सर्व कविता मला तोंडपाठ असायच्या.

काही कवितांना मी स्वतःची चाल लावून गाऊन पाहायचो, त्यामुळे मला कविता चटकन पाठ व्हायच्या.

एकदा रातीला आम्ही सारे मिळून जेवण करत होतो, तेव्हा आमच्या घरी लाईट नव्हता.

दिव्याच्या मंद प्रकाशात आमचं जेवण सुरू होतं,

मला गृहपाठ करायचा होता म्हणून मी झटपट माझं जेवण आटपल आणि अंगणात आलो,

जेवल्यावर दोन कदम चालावं आणि नंतर अभ्यासाला बसावं म्हणून मी अंगणात फिरू लागलो,

त्यावेळी अचानक माझं लक्ष आभाळाकडे गेलं, मनोहारी चंद्र फुलुन आला होता,

त्या आकर्षक दृष्यात मी काही वेळ हरवून गेलो आणि मला उत्स्फूर्तपणे दोन ओळी सुचल्या.

त्या डोक्यातून जाऊ नये म्हणून मी लगेच वही पेन घेऊन लिहून ठेवल्या,

आणि पुन्हा त्या चंद्रकोरिकडे पाहू लागलो पण पुढे काही सुचेना..

खूप प्रयत्न केला पण काहीच नाही.

दुसऱ्या दिवशी शाळेत सरांना त्या मी लिहिलेल्या ओळी दाखविल्या,

”अरे ह्या तर कवितेच्या ओळी आहेत, कोणी लिहिल्या बे?”

“सर, मी लिहिल्या” मी म्हणालो.

“”शाबास, बे पोट्ट्या ..छान,, आणखी लिही”

मी हरखून गेलो,तो दिवस धुंदीत गेला.

मग माझा रात्रीचा क्रम ठरला,

जेवण झालं की अंगणात फिरायचो

चंद्राला न्याहाळायचो,काही सुचलं की लिहून ठेवायचो.

सात आठ दिवसात माझी कविता पूर्ण झाली

मी ती कविता पुन्हा सरांना वाचावयास दिली, सरांनी काही सूचना केल्यात, शाबासकी दिली,

मित्रांना कविता दाखविली,मित्र म्हणाले,

“मस्त लिहिलंस गोडघाटे”

मी हरखून गेलो,

वाचू लागलो विविध विषयांवर कविता लिहू लागलो, आणि माझ्यातील कवी आकार घेऊ लागला.

सोबतच शिक्षण सुरू होतंच,

अभ्याक्रमाव्यतिरिक्त मी अवांतर पुस्तकं ही वाचायचो, रद्दीच्या दुकानात माझी वाचनाची

भूक भागविणारी पुस्तक मला मिळायची, तिथून मी पुस्तकं विकत घ्यायचो, आणि कधी कधी तर पैसे

नसले तर चोरून पण आणायचो,,

असं हे सारं दहावी पर्यंत चाललं.

पुढे पैश्या अभावी बोर्डाचा फॉर्म भरण्यासाठी त्यावेळी(१९९२-९३) माझ्याकडे ७५ रु. नसल्यामुळे माझं दहावीच वर्ष वाया गेलं,

मी खूप नर्वस झालो, माझा मलाच राग येऊ लागला, कधी घरच्यावर राग काढू लागलो,

पैसे मिळविण्यासाठी मी टिनटप्पर वेचून विकू लागलो,, भिंतीवर पोस्टर चिकटवू लागलो,

बालवाडीत ब्रेड पिचविण्याचे काम करू लागलो, चांगले वाईट लोकांत उठबस सुरू झाली,

रात्री बेरात्री त्यांच्यासोबत फिरणं सूरू झालं, ओघानेच सिगारेट, बिडी आणि देशी दारू पिणे

पण सुरू झाले, घर आणि शाळा इतकी मर्यादित दुनिया सोडून मी आता नव्या व्यापक दुनियेत वावरू लागलो

आणि माझ्या कवितेचे विषयच बद्दलले.

ते सर्व वर्ष असं कड-ू गोड  घटनेतच गेलं.

आणि जीवनाला कलाटणी देणारा दिवस माझ्या जिंदगीत पुन्हा उगवला, 

विजय बोरकर , आमी त्याला आजही विजू भाऊ म्हणतो,

माझ्या जीवनात मित्र म्हणून आला, त्यानं माझं सार जीवन वाचलं आणि

मला नव्याने स्वतःच्या पैशाने रिअडमिशन करून दिली दहावीला.

मी पुन्हा अभ्यासाला लागलो, नवीन शाळा, नवीन मास्तर, नवीन दोस्त, आणि नव्या मैत्रिणी,

पुन्हा नवीन अनुभव पदरी पडू लागले, कवितेचं बोट तर मी धरूनच होतो,,

आता कवितेला आणखीनच आकार येऊ लागला होता, कवितेचे विषय सत्य अनुभवाशी भेट घेत होते,,

आणि कविता तावून सुलाखून निघत होती, वास्तवाशी भिडत होती.

बोर्डात ७५ टक्के गुण घेऊन मी पास झालो,, मला शिक्षक व्ह्याचे होते जी, म्हणून मी आर्ट ११ वी आणि १२ केलं,

या दरम्यान माझं वाचन खूपच वाढलं होतं, कवितासंग्रह , कादंबरी, कथा,

याव्यतिरिक्त मी बाबासाहेबांचे छोटे छोटे पुस्तक, त्यांची भाषणं वाचू लागलो होतो,

सभा समारंभ येथे हजेरी लाऊन मनःपूर्वक वक्त्यांची भाषण ऐकू लागलो होतो,,

त्या भाषणातील काही ओळीवर मी स्वतंत्रपणे विचार करू लागलो होतो,,

बाबासाहेबांच्या भाषणाचा, मान्यवरांच्या वक्तव्याचा आणि आपल्या कवितांचा

काही ताळमेळ बसतो का ते तपासून पाहू लागलो होतो,

आपली जात, आपला धर्म, आपल्या पूर्वजांचे जीवन, त्यांचे जगणे मरणे, त्यांचे कष्ठ,

त्यांचे झालेले शोषण मला माझ्या कवितेत दिसत नव्हती,

मला माझीच खन्त वाटली,, इतके दिवस आपण गुळ मुळीतच (सर्वच कविटेबद्दल नाही बरं)

लिहिलं तर.मला आपल्या वाचनाची दिशा बदलावी लागली, आता मी प्रस्थापित मराठी साहित्य सोडून

(पूर्णतः नाही)सामाजिक आशयाच साहित्य मिळवून वाचू लागलो, आपल्या मित्रांशी, चर्चा करू लागलो,,

 सामाजिक आशयाचे, बाबासाहेबांच्या जीवनावरील गीतांच्या कॅसेट्स , सी डी ऐकू लागलो,,

माझा ‘कान’ तयार होउ लागला होता,, माझ्या लिखाणाची दिशा निश्चित होऊ लागली होती,

मी नव्याने, नव्या उमेदीने लिहू लागलो होतो,

कवितांनी डायऱ्या भरू लागल्या होत्या,

दरम्यान ग्रॅज्युएशन केलं,स्पर्धा परीक्षा दिल्यात, अपयश आलं, दिवस भराभर जात होते, मी वाचत होतो लिहीत होतो,, 

शालेय जीवनापासून ज्या मुलीवर माझे प्रेम होते तिच्याशी माझं कोर्ट मॅरेज झालं, 

संसार आला आणि मिळेल ते काम करू लागलो,, लिखाण सुरूच होतं.

वर्ष२००९ ला एका दिवाळी अंकात लोकनाथ यशवंत यांची कविता वाचून त्यांच्या घरी गेलो,

त्यांना माझ्या कविता दाखविल्या, सरांनी पण खूप आस्थेने त्या कविता वाचल्या,

सर मला माझ्या कवितांचं पुस्तक काढायचं आह, मी सरांना म्हटलं,

आणि त्यांनी सर्व ती मदत केली आणि२०१० ला ‘वादळ’नावाचा माझा कवितासंग्रह प्रकाशित झाला.

११व्या दलित साहित्य संमेलनात मा. गंगाधर पानतावणे सरांच्या हस्ते माझ्यासारख्या नवख्या कवीच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले,

सकाळचे पत्रकार केवल जिवनंतारे यांनी माझ्या बद्दलची मोठी बातमी प्रकाशित केली आणि सर्वांना अपरिचित असलेला,

सिलेंडरची गाडी ओढणार मजूर माणूस रातोरात स्टार झाला,, हो स्टार,,

कारण त्या नंतर मला अनेक कार्यक्रमाचे निमंत्रण येऊ लागले,, निमंत्रीत कवी म्हणून मी अनेक साहित्य संमेलनाला जाऊ लागलो,अनेक विचारवंतांच्या संगतीत, त्यांच्या वैचारिक लिखाणात मी रमू लागलो,,

 आणि वास्तवाशी प्रखरपणे भिडण्याचे बळ मला मिळू लागले,,

माझी कविता पुन्हा नव्या दमाने मुसंडी मारू लागली,

आणि २०१२ ला माझा दुसरा कविता संग्रह ‘लढा सुरूच ठेवावा लागेल’

देवयानी प्रकाशन: मुंबई च्या वतीने प्रकाशित झाला.

या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ नरेंद्र जाधव(आमचा बाप आणि आम्ही चे लेखक)

आणि विचारवंत राजा ढाले यांच्या हस्ते झाले.या कविता संग्रहाला डॉ यशवंत मनोहर यांची प्रस्तावना आहे,

या कविता संग्रहाला एकूण नऊ राज्यस्तरिय  काव्य पुरस्कार मिळाले.

लिहिण्या वाचण्याचा कारवा अविरत सुरू होता,,

पण मी घरात बसून लिहिणारा कवी नव्हतो,, कल्पनेत रमून मी कविता लिहिल्या नाही,,

सभा, धरणे, आंदोलने, चळवळ, यात सहभाग घेत होतो,, नारे देत होतो, एल्गार करत होतो,,,

आणि तेव्हा माझा हुंकार कवितेत उमटवत होतो,,,

समाजात पसरलेलं निराशाजनक वास्तव पाहून, अनुभवून अस्वस्थ होत होतो,

तेव्हा ते सर्व टिपून कवितेत उतरवत होतो,,

२०१२ नंतर , चार वर्षानंतर, ‘अस्वस्थ काळ आणि माणूस’ हा माझा तिसरा कवितासंग्रह “

संवेदना प्रकाशन, नागपूर च्या वतीने प्रकाशित झाला, 

रसिक, समीक्षक आणि चाहते मित्र मंडळींनी माझ्या या कविता संग्रहाचे खूप कौतुक केले,

अनेक मान्यवर साहित्यिक संस्थांनी या कविता संग्रहाला राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देऊन माझा गौरव केला.

आणि सिलेंडरचे ओझे पाठीवर घेऊन घरोघरी हिंडणारा संजय गोडघाटे,

अवघ्या महाराष्ट्राला कवी संजय गोडघाटे म्हणून सुपरिचित झाला.

— संजय गोडघाटे

७५, जयभीम नगर

नागपूर

पिन कोड;४४००२७

मो ९६२३३४५४५२

ई-मेल:sanjaygodghate16@gmail.com

………………………………………………..

संजय गोडघाटे यांचे कवितासंग्रह 

 डॉ.संजय बोरुडे यांच्या नव्या भिमगीतासाठी यु ट्यूबलिंक : https://youtu.be/zj06ea2bAW4

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment