2020 एप्रिल

विषाणूपुढे हतबल मानवाला उमेद देणारी कविता : प्रा. जयसिंग गाडेकर

सा हि त्या क्ष र 

( परिचय : प्रा.सौ. मीनल सुरेश येवले,

एम. ए.मराठी,राज्यशास्र,समाजशास्त्र बी.एड.एम.फिल.

पद –  कनिष्ठ व्याख्याता ग्रामविकास कनिष्ठ महा.कुही 

           जि. नागपूर

*प्रकाशित पुस्तके*

* मोहोर    – कवितासंग्रह – 2007

* परिघ    – कवितासंग्रह – 2013

* आंदण   – ललितलेख संग्रह – 2017

* एकांताचे कंगोरे  – ललितलेख संग्रह – 2019

* मी मातीचे फुल – कविता संग्रह  – 2019

* वेदनेला फुटे पान्हा – कविता संग्रह – 2019 *कवितेच्या पाऊलवाटा – प्रकाशनाच्या वाटेवर

( लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहभागी असतीलच असे नाही – साहित्याक्षर )

आश्वस्त- विषाणूपुढे हतबल मानवाला उमेद देणारी कविता

नागपूरच्या कवयित्री  प्रा.मीनल येवले यांची ‘आश्वस्त’ही कविता कोरोना च्या हल्ल्याने हाताश आणि भयभीत झालेल्या मानवजातीचे यथार्थ चित्रण करतेच पण या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सांगते.
मागील दोन दशकापासून आपण जागतिकीकरण आणि उदारीकरण या दोन संकल्पनांचा अंगीकार केला आणि आपला देश देखील आपले भारतीयपण विसरून भौतिक साधनांच्या पाठीमागे धावणाऱ्या कधीही न संपणाऱ्या शर्यतीत सामील झाला. या स्पर्धेमधून मोठ्या प्रमाणावर लालसा वाढीला लागली साऱ्या जगावर आपला प्रभाव असावा अशा प्रकारचा अविचारी प्रभुत्व वाद काही राष्ट्रांनी जोपासायला सुरुवात केली यातून परस्परांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू झाले. जी राष्ट्र पूर्वी अण्वस्त्रांच्या माध्यमातून एकमेकांना धमकावत होती ती आता जैविक अस्त्रांच्या माध्यमातून प्रतिपक्षाला नेस्तनाबूत करण्याची संधी शोधू लागली. आजचा कोरोना नावाचा भस्मासुर या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे अपत्य आहे.. कोरोना हा डोळ्यांना दिसत नाही पण आभाळालाही देखील  व्यापून टाकेल अशा प्रकारची संहारक शक्ती असलेला विषाणू आहे आणि त्याने जगातील मानवजातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अमेरिका, फ्रान्स इटली स्पेन जर्मनी अशी बलाढ्य राष्ट्रे देखील या कोणाशी सामना करण्यात सपशेल अपयशी ठरली आहेत आणि हताश होऊन मृत्यूचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.. या परिस्थितीवर भाष्य करताना कवयित्री लिहिते-
कुठे शोधायचे जगण्याचा दिलासा
देणारे संजीवन तत्व
कसे गवसायचे विनाशाला
थांबवण्याचे प्रत्ययकारी तंत्र
आता तर जीवनाच्या वाटाच अवगुंठित झालेल्या
किती हताशपणे बघतोय आपण
एकमेकांकडे ऐकतोय दूरवरून
अस्वस्थ करणारे भेसूर स्वर
या विषाणूने कोणालाही सोडलेले नाही. गरीब-श्रीमंत असा भेद ठेवला नाही की हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा प्रकारच्या धर्मांच्या सीमा पाहिल्या नाहीत. सारेच त्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे अवघे जगच भयभीत झालेली आहे. अगतिक,असहाय्य आणि वैफल्यग्रस्त देखील झाले आहे.
हा तो मी ते सर्वच अंतर्बाह्य
धास्तावलेले
दिवसांच्या भुमीत झाली वैफल्याची पेरणी
मनामनात उगवताहेत
भयाचे खुरटलेले , गर्भगळीत कोंब
मानवाच्या इतिहासामध्ये चढ-उतार हे सतत येत असतात. पृथ्वीवर जीवांचा जन्म होणे, त्याची प्रगती होणे आणि एक दिवस एखाद्या धूमकेतू सारख्या किंवा सुनामी सारख्या महा संकटात या जीवनाचा सर्वनाश होणे हे चक्र अव्याहतपणे चालूच आहे. आजही जणू मानवजात विनाशाकडे जाते आहे. स्वतःला प्रचंड सामर्थ्यवान समजणारा माणूस आज स्वतःला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसला आहे असे दिसते. त्याच्या या मनोवस्थेचे वर्णन करताना कवयित्री लिहिते,-
युगायुगाच्या शापाने झालो आहोत
का आपण असे सत्वहीन
की , आपल्या आकाशाला हात
पुरणाऱ्या अहंकाराचा
फुटू बघतोय टंच भरलेला फुगा
या परिस्थितीत शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि  तत्वज्ञ असे सारेच भांबावून गेले आहेत. अर्थात हे अक्राळविक्राळ प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विज्ञान मदत करण्यासाठी आहेच. पण वैज्ञानिकांच्या मते या संकटावर मात करण्यासाठी किमान एक वर्ष लागेल.पण प्रश्न आजच्या या एकट्या कोरोना नावाच्या विषाणूचा नाहीच. प्रश्न आहे माणसाच्या मनाला जो स्वार्थ लोलूपतेचा विषाणू पोखरत आहे त्याच्यावर इलाज करायला हवा. अन्यथा ठराविक काळानंतर कोरोना सारखे भयंकर विषाणू या पृथ्वीवर येऊन मानव जातीचा संवर्ग करतच राहतील.. यासाठी गरज आहे माणसाने आपले माणूसपण टिकवण्याची.. हाच एकमेव आश्वस्त उपाय या संकटातून माणसाला वाचवू शकेल.. कवयित्री या ठिकाणी लिहिते –
प्रश्न आणि प्रश्नांचे आक्राळ विक्राळ
भोवरे देताहेत कोणत्या भयावह संकटाची सुचना ?
की , अजूनही जागे करताहेत
आपल्यातला माणूसपण टिकवण्याच्या चेतना
उमेदीला , सृजनाला , मानव्याला पोहोचू लागलीय झळ
म्हणजे भयंकर संकटातून माणसाला फक्त माणूसच वाचू शकतो आणि तेही आपले माणूस पण टिकवून. सुदैवाने आज जगातील कोट्यवधी ही निराधारांसाठी आधार देण्यासाठी लाखो हात पुढे आलेले आहेत आणि माणसाला जगवण्यासाठी निसर्ग नाहीतर माणसेच पुढे येऊ शकतात हे आपण स्वतः अनुभवतो आहोत. कवयित्री आपल्या कवितेचा शेवट करताना नेमके हेच सांगते आहे-
माणसाच्याच तर हातात आहे अजूनही हे संकट थांबविण्याची एक चिरंतन…आश्वस्त… कळ…
नागपूरच्या कवयित्री प्रा. मीनल येवले यांनी सध्याच्या महाभयंकर संकटाची उकल या कवितेतून अगदी नेमकेपणाने केली आहे आणि त्यावर निश्चित असा उपायही सुचवले आहे हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. साहित्य हे समाजाला दिशा देण्यासाठी असते ही बाब या कवितेने अगदी ठळकपणे अधोरेखित केली आहे. मीनलताई, या सुंदर कविते साठी आपल्याला हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि अगदी मनापासून अभिनंदन देखील…

– प्रा. जयसिंग गाडेकर
आळे, जुन्नर पुणे.
22 एप्रिल 20 20
*परिचय*
प्रा. जयसिंग गाडेकर*
+91 99703 41646
शिक्षण- M.Sc. (Organic Chemistry) B.Ed.SET.*
व्यवसाय- Head,*मा. बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत आहे.
गेली पंधरा वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहि:शाल शिक्षण मंडळ व्याख्याता म्हणून कार्यरत.*
सासवड, पिंपरी चिंचवड, डोंबिवली, बडोदे, यवतमाळ आणि उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कवीकट्टा या काव्यमंचावर सलग सहा वर्षे कविता सादर केली आहे.*
 *तीन कविता संग्रहासाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे*
*’गझलची दुनिया’ या व्याख्यानातून हिंदी मराठी आणि उर्दू गझल चे अंतरंग उलगडवून दाखवले आहेत. आजवर ‘गझलची दुनिया’ ची तीसहून अधिक व्याख्याने झाली आहेत.*
*प्रकाशित साहित्य-*
*भोपाळ(म.प्र.) येथून प्रकाशित झालेल्या ‘ विश्वकोश शृंखला शब्दकोश’ या १५ भाग असलेल्या विश्वकोशाचे मुख्य संपादक म्हणुन काम केले.*(२००८)*रसायनशास्त्र शब्दकोश या मराठी भाषेतील पहिल्या इंग्रजी मराठी शब्दकोशाचे लेखन व प्रकाशन. .(ई.स.२००८)*
“आयुष्य चालताना” हा कवितासंग्रह प्रकाशित*
*(२०१३)*

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment