डागी (डागाळलेले) पुरस्कार : विठ्ठल सोनवणे
डागी (डागाळलेले) पुरस्कार : विठ्ठल सोनवणे
(या लेखात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)
.पुरस्कार, सन्मान, किंवा बक्षीस हे शब्द आनंद वाढवतात.
मनाला सुखावतात. ज्या कोणा अबालव्रूद्धाला असा पुरस्कार मिळतो.
त्याच्या तपसाधनेचे चीज होते. श्रमाचे फलित मिळते.
सर्वात महत्त्वाचे आणखी पुढे काम करण्यास बळ येते.
मात्र याबाबत खेदाने काही गोष्टी लिहाव्या वाटतात.आज साहित्य.
जगतात पुरस्काराची रेलचेल वाढत चालली आहे.आणि ही
चांगली बाब आहे. त्यात साहित्यलेखनही तितकेच व्यापक
झाले आहे.सर्व स्तरातील हात लिहिते झाले आहेत.व ते वाढत
आहेत.साहजिकच याचे वाचकवर्ग मूल्यमापन करतो समीक्षक
दखल घेतो.नितीमान पुरस्कार दाते योग्य ते मूल्यमापन करून
उच्चतम कलाकृती ला सन्मानीत करतात. खरोखर हेपवित्र
पुण्यशील कार्य साहित्यविश्वाला सोन्याची झळाळी देणारे आहे.
पण दुसरी काळी बाजू मात्र साहित्य विश्वाला मोठा कलंक वाटतो.
त्याबद्दल जितके लिहावे तितके ते लाजिरवाणे आहे.
साहित्यलेखनाचे सर्वच अंग सम्रूद्ध आहेत.त्यामुळे त्यांचा गौरव
होणे नक्कीच भुषणावह आहे.पण मी अनुभवाने सांगतो की,पुरस्कार
प्राप्त ज्या काही कलाकृती मी वाचल्या त्यावेळी नक्कीच मनाला
खंत वाटली की,हे पुरस्कार. या कलाकृतीला मिळालेच कसे?मूल्यमापन
योग्य पद्धतीने का होत नाही.?इथे काहीतरी काळेबेरे असते.
मिंधेपणा नक्कीच असतो.त्यामुळे चांगल्या कलाकृती दुर्लक्षित
राहतात. योग्य त्या साधकाला न्याय मिळत नाही. दुर्दैवाने साहित्य
विश्वात ही दुर्गंधी वाढली आहे. मला पुण्याच्या एका प्रतिष्ठानकडून
कुणाच्या तरी वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ पुरस्कार देऊ केला. तसे मला
सविस्तर पत्राने कळवले.व त्या पत्रात शेवटी ओळ होती कीआपण आमच्या
प्रतिष्ठानला एकहजार रुपये देणगी पाठवा.मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारला.
खरोखर पुरस्कार देणारे जरी वाढत चालले असले तरी त्यात अशी
दुकानदारी करणारे बक्कळ आहेत.याल़ा केवळ त्यांचाही दोष नाही.
कारण त्यांच्या दुकानदारीला आज मुबलक गि-हाईके मिळत आहेत.
पुरस्कारासाठीअनेक भुकेलेले आत्मे आशावादी नजरेने फिरत आहेत.
त्यासाठी पुरस्कारदात्यांच्या पायात घोटाळणे.बुट चाटणे.शेपूट हलविणे.
धनाचा वापर करणे.लागेबांधे शोधणे. अधिकारी असेल तर पदाचा
गैरवापर करून चांगले पुरस्कार मिळविणे.पुरस्काराचे रंगीत लाकडी
फळकूट घरी घेऊन येणे.असे हे तुंदील तनुचे बदकं पण गरुडाच्या
आवेशात सोहळ्यात. वा रंगमंचावर हलचाल करीत असतात
अशा पुरस्कार मिळविण्यासाठी हपापल्यांच्या अनेक करामती आहेत.
त्यांची एकच धडपड की,”आपलीच कशी लाल”हे दाखविण्याची.!
त्यामुळे पुरस्काराचे खेळणे झाले आहे.काहींचे साहित्य प्रकाशित
होण्याधिच पुरस्काराचे नियोजन निश्चित झालेले असते.
असे कितीतरी उथळ प्रतिभेचे चालू याच्यात्याच्या काव्यप्रतिमा ,
काव्यकल्पना मोडतोड करून लुबाडायच्या शब्द छल करुन मांडायच्या.
प्रसिद्धीमाध्यमे हाताशी धरून तिथेही काळेबेरे उद्योग ठरलेले.आणि
आपले साधून घ्यायचे.यांचीच चलती वाढत चालली आहे.
बाजारु पुरस्काराचे हे विषारी पीक सर्वत्रच पसरले आहे.त्यामुळे
साहित्य निष्ठा जपणारा,प्रतिभासंपन्न तपसाधक उपेक्षिला जातो
आहे.खरोखरच पतिव्रतेच्या गळयात धोंडा बांधला जातो आहे.पुरस्कार
जगातील घाण वेळ खर्च करून येथे मांडणे पटत नाही. पण
अस्वस्थ मन रहावेना म्हणून हा प्रपंच..!!
– श्री. विठ्ठल शिवराम सोनवणे
शेवगाव जि.अहमदनगर.
9423391124
हा संग्रह वाचलात का?