2020 एप्रिल

खोट्याला बळी पडून द्वेषाला निमंत्रण देतोय? – डॉ.महेंद्र कदम

सा हि त्या क्ष र 
डॉ.महेंद्र कदम
संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट

(श्री.संजय आवटे ,संपादक,दिव्य मराठी यांनी काल  त्यांच्या फेसबुकवर लेख टाकला आहे, त्यावरची ही  डॉ. महेंद्र कदम यांची प्रतिक्रिया.संपादक त्या मताशी सहमत असतीलच, असे नाही. ज्यांना संजय आवटे यांचा मूळ लेख वाचायचा आहे त्यांच्यासाठी  लेखाची लिंक -https://m.facebook.com/story.php?story_fbid=10158230460284919&id=715559918 )

                     खोट्याला बळी पडून द्वेषाला निमंत्रण देतोय? 

             मी काल संजय आवटे यांच्या “मुस्लिमांचे काय करायचे” ,या टिपणावर ही छोटी प्रतिक्रिया दिली होती। ती जरा स्वतंत्रपणे सविस्तर शेअर करतोय। संजय आवटे म्हणतात ती खरी गोष्ट आहे। आपल्या हजारो मुस्लिम मित्रांना हिंदूच्या सगळ्या परंपरा माहीत आहेत। पण आपणाला ते आपले मित्र असतानाही त्यांच्या परंपरा नीट समजून घ्याव्या वाटत नाहीत। हे असे का होते माहीत नाही? 

     आमचा मित्र रफीक सूरज याने दस्तक या शीर्षकाचा निवडक मुस्लिम मराठी कवींचा संग्रह संपादित केला आहे। त्यात मी शाहीर अमर शेख यांच्या आई मुनेरबी यांच्या कविता वाचीत होतो, तर त्या मला बहिणाबाई चौधरींच्या कवितेइतक्या हिंदू वाटल्या। म्हणून त्यातील त्यांच्या काही कविता आम्ही पुण्यश्लोक अहिक्यादेवी होळकर विद्यापीठात अभ्यासक्रमाला लावल्या। मुलांना ती कविता बहिणाबाई चौधरींच्या कवितेइतक्याच जवळच्या वाटतात।  त्या संग्रहातील अनेक कविता वाचताना मला माझीच लाज वाटत होती की, अरे मी माणसे आपल्यात किती सामावली आहेत, आणि आपण मात्र कायम काही अंतर ठेवून का राहिलो आहोत? 

      हमीद दलवाई, फ. ह. बेन्नूर, फ.म. शहजिंदे, समर खडस, शफाअत खान अशी मोठी परंपरा आपल्याकडे आहे। पण आपण ती दुर्लक्षित करीत आलो आहेत। ती नीट समजावून घेतली पाहिजे। 

 मुळात शिक्षित मंडळीच अधिक धर्मांध बनत चाललीय असे माझे निरीक्षण आहे। गावपातळीवर मला हा हिंदू मुस्लिम संघर्ष कशी दिसला नाही। झाला असेल तर आजच्या तरुण अर्धवट शिकलेल्यालांकडून। तर हे जे काही तबलिकीचे सुरू आहे, ते त्यांनी केले ते चूक आहे, पण त्याची प्रसिद्धी ज्या वेगाने केली जातीय, त्याकडे कोण नीट पहात नाही।  

      असाच एक उपक्रम गोमूत्र पाजण्याचा आणि शेण कपाळाला लावण्याचा एका हिंदू महाराजांच्या गर्दीची मात्र चर्चा होत नाही। धर्मांध माणसे सगळीकडे आहेत। आपण ती पाहत नाही। “आपल्या तो बाळ्या लोकांचं ते कार्ट” ही प्रवृत्ती बळावत चालली आहे। ती बरी नाही। आपली बहुसांस्कृतिक ओळख विसरून आपल्याला चालणार नाही। ती धोक्याची घंटा आहे। 

     मुद्दाम एक उदाहरण देतो, मागे आमच्या घरी गणपतीची वर्गणी मागायला काही शाळकरी मुले आली होती, माझी “बायको म्हणाली, 

“अरे मुलांनो शिकायचे सोडून हे कशाला करताय?” 

तर ती मुलं म्हणाली, “अहो काकी 5 रुपये दिले तरी चालतील।”

यावर ती म्हणाली, 

“अरे तुम्ही शाळेचे काम आणा, 5 काय मी 500 देते।”

पोरं म्हणाली, “म्हणजे तुम्ही आंबेडकरवाले आहात काय?” 

ती पुन्हा म्हणाली, “काय फरक पडतो असलो म्हणून”।

तर मुलं वर्गणी न घेता तोंड वाकडे करीत निघून गेली। 

तर हा असला कचरा जातीवाद आणि धर्मांधता सगळ्यांनाच हानिकारक आहे। चूक ते चूक म्हणण्याची धमक अलीकडे कमी होत चालली आहे। याचा फायदा मेडिया आणि राजकारणी लोक घेत आहेत।मला काय त्याचे आई समजणारा वर्ग द्वेष करणाऱ्या वर्गापेक्षा धोकादायक असतो, हे लक्षात घ्या। आपल्याकडे अल्पसंख्य जमातीतील एखादा गुंड आपणाला दिसतो, पण बहुसंख्यात शेकडो गुंड असतात, ते आपणाला दिसत नाही। ही डोळ्यांवरची पट्टी कधी काढायची?

आजच्या तरुणाईने हे नीट समजून घेतले पाहिजे, नाही तर मित्रानो यात तुमच्या पिढीचे नुकसान अधिक आहे।

द्वेषाने द्वेष वाढतो, प्रेमाने प्रेम वाढते” असे सांगणाऱ्या बुद्ध विचाराला आपण हाकलून दिले आणि आपली प्रगती खुंटली, हे लक्षात घ्यायला हवे। नमाज आणि योग यात फार फरक नाही। मुस्लिम राजवटीत अनेक काही बऱ्या गोष्टी भारतात घडल्या आहेत, हे आपण कधीच चर्चा करीत नाही। कायम हिरव्या आणि भगव्या रंगात आपण चर्चा करीत आलो आहोत। 

अत्यन्त महत्त्वाचे : मित्रानो, वाळवंटी प्रदेशात वाढलेल्या मुस्लिम जमातीला ओऍसीस सारखा हिरवाच  रंग जगण्याला प्रेरक वाटला म्हणून तो त्यांनीं स्वीकारला। आग ओकणारा सूर्य त्यांचा देव होऊ शकत नव्हता, म्हणून त्यांनी शीतल चंद्र स्वीकारला। ह्या प्रतिमा त्यांनी भारतात आल्यावर विरोधी म्हणून स्वीकारल्या नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवे।

   आपला पाच हजार वर्षांचा भारत असा द्वेषपूर्ण नाही। तो बहुसांस्कृतिक आहे, ती ओळख पुसून आपण महासत्ता होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या। 

   कोरोनात जे चुकीचे वागले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। फक्त त्याकडे धर्माच्या चष्म्यातून न पाहता भारतीय मानवतेच्या परिप्रेक्ष्यातून पाहावे लागेल।

आणि मूळच्या गावाकडच्या सौहार्दाचे वातावरण लक्षात घ्यायला हवे। 

#ता.क. :माझ्या वडशिंगे ता  माढा जि.सोलापूर  या गावचे ग्रामदैवत रामसिद्धबुवा हे वाण्याचे आहे, पुजारी मुस्लिम आहे। आणि सगळे गाव गूळ चपातीचा ( मलिदा म्हणतात) नैवेद्य दावतात। आजही लाखाच्या वर इनाम देणारा कुस्त्याचा फड मोठ्या दिमाखात भरतो। ह्या कुस्त्यांची सुरुवात माझ्या गावचे #मल्लशंकरगोसावी यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीने होते। त्यांचा मुलगा माझा मित्र बजरंग गोसावी एक लाख रुपयांची पदरमोड करून दरवर्षी कुस्ती लावतो। हा सलोखा हरवून आपण काय मिळवणार आहोत। राजकारण्यांना राजकारण करू द्या। आपण आपल्या मातीतला विचार समजून  

मोहरमचे डोले बसवायला आमचा गावातला सगळा बालचमू गोळा व्हायचा। आणि सगळं गाव तो उत्सव करायचा। आता ते गाव मला पुन्हा खुणावते आहे। 

बघा, मित्रानो, तुम्हाला पण आतून हाक येईल,

 ती नक्की ऐका, एवढीच विनंती!!!

– – प्रा.डॉ.महेंद्र कदम                                                               

संपर्क : ९०११२०७०१४ 

( लेखक हे मराठीतील  प्रथितयश लेखक असून ते टेभूर्णी येथे एका महाविद्यालयात  प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.सोलापूरच्या अहिल्याबाई विश्वविद्यालयाच्या डीनपदाचा कार्यभार ही ते सध्या सांभाळत आहेत.)

*******************

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment