Category: मे

आणि गूज मनीचे… : नितीन माधव, मुंबई

आणि गूज मनीचे… ब्रेकींग न्यूज, एव्ही, एव्हीबी, डब्लुकेटी इत्यादी…दिवसभर बातम्यांच्या भडिमारात एखाद्या घटनेवर ‘मी’ म्हणून व्यक्त होणं राहून जातं. बातमीदाराऐवजी एक व्यक्ती म्हणून त्या घटनेविषयी काय वाटतं हे जरा मागे पडत जातं. हे केवळ माझ्या किवा कुणा एकाच्याच बाबातीत नव्हे तर प्रत्येकाच्या बाबतीत घडत असावं कदाचित… मग एखाद्या निवांत क्षणी आपलेच आपल्याला प्रश्न पडू लागतात […]

छत्रपती संभाजी राजांचे स्वैरवर्तन (?) : डॉ. अशोक राणा

छत्रपती संभाजी राजांचे स्वैरवर्तन (?)___________________________________________ डॉ.अशोक राणा,यवतमाळ. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात सर्वात बदनाम व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर कुणाच्याही तोंडून एकच नाव येईल व ते म्हणजे संभाजी राजांचे. त्यांच्या या बदनामीमागे कारणे दिली जातात, ती त्यांच्या तथाकथित उच्छृंखल वृत्तीची. तसेच, चर्चा चवीने चघळली जाते, ती त्यांच्या तथाकथित स्वैरवर्तनाची. पण खरोखरच ते उच्छृंखल वा स्वैरवर्तनी […]

जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : : डॉ.प्रतिभा जाधव

जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : ‘काळ्या आईची तहान———————–  (काव्यसंग्रह- “काळ्या आईची तहान” द्वारा- गाव प्रकाशन,औरंगाबाद)*कवी – राजेंद्र दिघे ,मालेगाव)      अवघ्या जगाला संजीवनी देणारा बळीराजा स्वतःच बळी ठरत असलेला हा आजचा कडू काळ. ह्या कडू काळात जगाच्या पोशिंद्याची व्यथा-वेदना, अस्वस्थता कवी राजेंद्र दिघे यांनी काव्यसंग्रहात जोरकसपणे मांडली आहे. जगासमोर शेतकऱ्याच्या यातना, ससेहोलपट अगदी प्रामाणिकपणे […]

मतकरींची ‘लोककथा’ आमच्या परिसरातली.. : डॉ. जगदीश कदम

मतकरींची‘लोककथा’आमच्या परिसरातली.. मराठीतील एक प्रयोगशील नाटककार रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले.आम्ही एकदम भूतकाळात गेलो.मतकरींचं ‘लोककथा ७८’ हे नाटक गाजत होतं,तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो.अभ्यासक्रमाला नुकतंच हे नाटक लागलं होतं.आम्हाला ‘मराठी वाड़मयाचा इतिहास’हा विषय शिकवणारे नरहर कुरुंदकर गुरुजी यांनी रंगभूमीच्या संदर्भातील विवेचक प्रास्ताविक केलं आणि ‘लोककथा ७८’या नाटकाच्या अध्यापनाची जबाबदारी दत्ता भगत […]

स्त्रीदास्य : काल आणि आज – छाया बेले

    भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध असा वारसा म्हणजेच, न्याय, समता व शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावं, आणि ते हजारो वर्षे टिकून राहाव ही अतिशय खेदाची बाब आहे. शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे भेदावर, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणं हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात म्हणावी लागेल. आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा आपल्या […]

वसंत मुरदारे नावाचा अलक्षित कवी : डॉ.संजय बोरुडे

प्रतिभासंगम साहित्य व संस्कृती मंच च्या वतीने मी अनेक कविसंमेलनाचे आयोजन करायचो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला शेवगावचे ज्येष्ठ कवी वसंत मुरदारे आवर्जून  उपस्थित रहायचे.. या कार्यक्रमातूनच संदीप काळे ( पाथर्डी ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी) यांसारखे नवे कवी पुढे आले. साम टीव्हीचे निवेदक दुर्गेश सोनार (पंढरपूर) यांना उमेदीच्या काळात आमच्या मंचाने खूपदा बोलावले. ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) तेव्हा विद्यार्थीदशेत […]

पुरातत्व विद्या

पुरातत्त्वविद्या : इतिहास (History of Archaeology) • प्रमोद जोगळेकर • प्रागैतिहासिक काळ भूतकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल ही खास मानवाची वैशिष्ट्ये आहेत. मानवी संस्कृतीला किमान पंचवीस ते तीस लक्ष वर्षांचा इतिहास आहे. इतक्या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; […]

गीतकार योगेश यांची एक्झिट

गीतकार योगेश यांच्या  निधनाची वार्ता घेऊन आजची सकाळ उगवली आणि तीव्रतने जाणवलं की , अरे, हा तर 70च्या दशकातला जेंव्हा माझी मध्यवर्गीय  पिढी किशोर- तारुण्यभानाच्या उंबरठ्यावर होती, तेंव्हाच्या आमच्या अबोध भावभावनांना ज्यानी उजागर केलं आणि मंत्रमुग्ध केलं ते   हेच योगेश तर होते.          माझ्या मनाचा योगेशने कब्जा घेतला तो “रजनीगंधा फुल तुम्हारे युंही महके […]