2020 मे

गीतकार योगेश यांची एक्झिट

सा हि त्या क्ष र 

गीतकार योगेश यांच्या  निधनाची वार्ता घेऊन आजची सकाळ उगवली आणि तीव्रतने जाणवलं की , अरे, हा तर 70च्या दशकातला जेंव्हा माझी मध्यवर्गीय  पिढी किशोर- तारुण्यभानाच्या उंबरठ्यावर होती, तेंव्हाच्या आमच्या अबोध भावभावनांना ज्यानी उजागर केलं आणि मंत्रमुग्ध केलं ते   हेच योगेश तर होते. 

        माझ्या मनाचा योगेशने कब्जा घेतला तो “रजनीगंधा फुल तुम्हारे युंही महके जीवनमे” या गीताने. योगेशचे तरुण मनाच्या हुरहूरत्या भावना समर्पकपणे व्यक्त करणारे नाजूक शब्द, सलील चौधरी यांचे सुरेल  संगीत आणि  विद्या सिन्हाचे आपले वाटणारे घरेलू रूप यामुळे या गीताने माझ्या मनावर तेंव्हा जे गरुड केले होते ते आजही कायम आहे. त्यातली ही ओळ”युंही महके प्रीत प्रिया की मेरे अनुरागी मन मे” आजही मधुर शब्दांमुळे माझ्या मनात रुंजी घालते. याच “रजनीगंधा” मधले त्यांचं मुकेशने गायिलेले “कई बार युंही देखा है, ये जो मन की सीमारेखा है,मन दौडने लगता है- अंजन आस के पिछे” तेवढेच मनात घर करून आहे.

        खरं तर”आनंद” हा योगेश यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट. तो लोकांच्या स्मरणात आहे तो राजेश खन्नाच्या अविस्मरणीय अभिनयामुळे. पण आनंद या व्यक्तिरेखेचे दोन शेड योगेशच्या गीताविना  राजेश साकार करू शकला नसता. “दूर कही जब दिल ढल जाये, सांझ की दुलहन बदन चुराये- चुपके से आये” ही विरहाची समंजस  वेदना ज्या नजाकतीने योगेशनी शब्दबद्ध केली आहे, तिला तोड नाही. दुसरे फिलॉसॉफीकल गीत”जिंदगी कैसी है पहेली हाये” हे कुठेही preachy न होणारं गीत . माझं जीवनाचे तत्वज्ञान या गीताने सुरू होते व या गीतावरच संपते असं म्हणलं तर अतियशोक्ती होऊ नये!

     आणखी एक गीत आज त्यांची आठवण करताना आठवतं ते म्हणजे “न जाने क्यूँ होता है जिंदगी के साथ , अचानक ये मन,  किसी के जाने के बाद, करे उसकी याद, छोटी छोटीसी बात-‘ हा प्रतेकला येणारा अनुभव किती सहजपणे पण तरलतेने  योगेश व्यक्त करतात. पुन्हा येथे या शब्दांना पडद्यावर साकारणारी विद्या सिन्हा!

      आणि “Manzil” मधले अमिताभ व मौसुमी चॅटर्जी वर चित्रित झालेले आर्डी च्या सुरावटीने भिजले योगेशचे गीत ,ज्याला मान्सूनचे अँथेंम – गीत म्हणता येईल ,ते म्हणजे 

     “रिमझिम गिरे सावन, 

सुलग सुलग जाये मन. भिगे आज इस मौसम मे,लगी ये कैसी अगन”. हे गीत केंव्हाही ऐक, मन उत्फुल व प्रेमगंधीत होऊन जातं!

     असा हा माझ्या पिढीचा पण आजही सर्वांना आवडणारा योगेश. तो आपल्या भावविश्वाचा भाग होता. त्याने  प्रामुख्याने हृषीकेश मुखर्जी व बासू चॅटर्जी यांच्यासाठी , ज्यांना आर्टफिल्म वा समांतर फिल्म म्हणले जाते, त्यातला middle of path पकडणारा व निम्न्न मध्यमवर्गीय जीवनाचे प्रगटीकरण करणाऱ्या सिनेमासाठी प्रामुख्याने गीते लिहिली. शुद्ध पण सोप्या हिंदी भाषेत त्याची गीतं होती, पण “अनुरागी मन” “सांझकी  दुलहन” किंवा “मन की सीमारेखा” सारख्या भाव विभोर प्रतिमा आणि अबीध मनातील सुप्त भावना नेमक्या प्रगट करणारी काव्यप्रतिभा  या मुळे तो खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या  उत्कट भावनांचा प्रभावी भाष्यकार होता असे मी नि:संदिग्धपणे म्हणेन!

   हे कांही योगेशच्या समग्र गीतांचे रसग्रहण नाही की भाष्य नाही, तर त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मन Nostelgic झालं आणि मनात जे भावतरंग उठले ते शब्दबद्ध केले एवढेच! 

      एक मात्र नक्की माझ्या भावविश्वाचा एक तुकडा योगेश मुद्रेचा होता व राहील.  आणखी एक हळहळ कायमची वाटत राहील की योगेश यांच्या प्रतिभेचे मोल ओळखण्यात हिंदी फिल्मी जगत कमी पडले. त्यामुळे तुम्हा आम्हा रसिकांचे किती नुकसान झाले याची नुसती कल्पना केली तर सल गहिरी होते. असो. 

     जी मोजकी गीतं आम्हास मिळाली ती कायम स्मरणात राहणारी व आठवणारी आहेत. मुख्य म्हणजे मन तरल करणारी व एक हुरहूर लावणारी आहेत.  अश्या हुरहुरीने आपलं जगणंही भावसंपन्न होतं! आणि हे योगदान कांही कमी नाही!अन्नदाता या सिनेमातली 

रातों के साये घने

निसदिन निसदिन मेरा जुलमी सजन

नयन हमारे सांजसकारे देखे कोई सपना

ही योगेश यांची गीते,सलील चौधरी यांची विलक्षण संगीत रचना आणि लताबाई,मुकेश याचे स्वर

हा  एक सुंदर योग होता

     योगेशी जी, आज तुम्ही आमच्यात नाहीत आणि एक छोटीशी का होईना पोकळी मला माझ्या भावजीवनात तुमच्या नसण्याने जाणवत राहणार. तुमच्या ” मिली” सिनेमातील एका गीताचा आधार घेत तुम्हाला  मी असं म्हणेन की 

“बडी सुनी सुनी जिंदगी “हो गयी अपनी तुम्हारे बिना!

      आता आठ पंधरा दिवसात पुन्हा ऋतुचक्राच्या गतीने मान्सून बरसेल आणि त्यात चिंब होताना आम्ही तुमचे शब्द आपले म्हणून गुणगुणू”रिमझिम गिरे सावन” तर कधी दूर गेलेल्याची आठवण आली की “न जाने क्यू – करे किसकी याद छोटी छोटी बात” म्हणत कातर होऊ. त्यावेळी तुम्ही आम्हास फार फार आठवणार!

      तुम्हाला अलविदा कसं म्हणू? तुम्ही आमच्या भावविश्वात राहणार आहातच!

-फेसबुक वॉल वरुन..

दै.अमर उजाला : 

बॉलीवुड को एक से बढ़कर एक गीत देने वाले गीतकार योगेश गौर (Yogesh Gaur) ने इस दुनिया को अलविदा कह दिया है। योगेश की गिनती उन गीतकारों में होती है जिन्होंने अपने समय में सबसे बेहतरीन फिल्मकार रहे ऋषिकेश मुखर्जी, बासु चटर्जी आदि के साथ खूब काम किया है। वहीं हिंदी सिनेमा के पहले सुपरस्टार राजेश खन्ना की फिल्म ‘आनंद’ के लिए भी योगेश ने ही गीत लिखे थे। योगेश ने भले ही हम सबको अलविद कह दिया हो लेकिन उनके गीत हमेशा हम सबके जेहन में रहेंगे।

योगेश की आखिरी बड़ी रिलीज फिल्म किशन कुमार स्टारर बेवफा सनम थी। याद दिला दें कि योगेश ने फिल्मों के अलावा कुछ टीवी कार्यक्रमों के लिए भी लेखन किया था। अपने गीतों के बारे में एक इंटरव्यू में योगेश ने कहा था, ‘जो देखा था, जो जीता था, वही लिखा है। मैंने हमेशा अपने आस-पास के लोगों के बारे में लिखा।’ फिल्मों के अलावा अगर बात योगेश के चुनिंदा बेहतरीन पांच गीतों की करें तो, ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’, ‘जिंदगी कैसी है पहेली’, ‘रिमझिम गिरे सावन’, ‘कई बार यूं ही देखा है’, ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहा’ के बिना लिस्ट अधूरी कहलाएगी।

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment