राहत इंदोरी साहब : किरण काशीनाथ
राहत इंदौरी….. काळाला ओळखणारा शायर.
आज मशहूर, मेहबूब आणि बागीयाना शायर राहत इंदौरी यांचा मृत्यू झाल्याचे कळले.
मन खरोखरंच अतिशय दुःखी झाले आहे.
त्यांच्या सोबत घालवीलेल्या काही क्षणांची आजही आठवण डोळ्यासमोर आहे….
रवायतों की सफ़े तोड़ कर आगे बढ़ो वर्ना
जो तुमसे आगे है वो रास्ता नहीं देंगे l
असे शेर जेव्हां मंचावरून ऐकतो किंवा कुठे वाचतो तेव्हा त्या बगावती शायर बद्द्ल आपलं एक मत बनत असते. आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावत असतो. राहत सहाब ऐसी ही शख्सीयत थी l जैसे उनके शेर अच्छे और सच्चे लगते है वैसे ही वे आवाम की नजरों मे खरे और सच्चे उतरे l
राहत सहाब जब मंच पर शेर कहते हैं तो किसी जादूगर की तरह हज़ारों तादाद में आए श्रोताओं को अपनी गिरफ्त में कर लेते हैं l एक एक मिसरा पेश करने का उनका अंदाज, लबों-लहजा औेर आवाज मे हरक़ते इतनी लाज़वाब होती है कि शेर जेहन में बस जाते है l शेर पढ़ते वक्त उनके हाथों के इशारे, शेरों के मूड के मुताबिक़ चेहर्यावरचे बदलणारे भाव, ऑडियंस मधून आलेल्या एखाद्या कॉमेंट्स वर राहत इंदौरिंचे कॉमेंट्स आणि त्यावर लागणारे पब्लिकचे ठहाके. हे सारे बघणे म्हणजे एक रोमांचित करणारा क्षण..
रोमांचित करणारा क्षण फक्त मेहबूबा के साथ नहीं मेहबूब के साथ भी बिताया जा सकता है l राहत इंदौरी
अवाम के मेहबूब शायर थे, हैं और रहेंगे ईसमे कोई दोराय नहीं है l अशा या बगावती तेवर असलेल्या शायरला एकदा भेटण्याचा योग आला. नागपुर मधील मोमिनपुर्यातील फुटबॉल ग्राउंड वर मुशायरा असल्याचा प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि शायर अब्रार काशीफ चा फोन आला. तो म्हणाला किरण आज के मुशायरे मे राहत सहाब है l
मैं और राहत सहाब एक ही होटल में रुके है l आजा, आज तेरी राहत सहाब से मुलाकात करा देता हूं l मी आणि अलाहाबाद बँकचे मॅनेजर सुमेध वासनिक दोघे ही मोमिनपुर्यातील hotel ला गेलो. अब्रार ने राहत सहाब से पहचान करा दी l बाते शुरू हो गई lअब्रार म्हणाला.. आप दोनों राहत सहाब के साथ महफ़िल सजा सकते हैं l हम महफ़िल का साजो-समान ले आए l जाम बने l महफ़िल धीरे-धीरे शायराना होने लगी l साथ ही साथ संजीदा बाते भी होने लगी l
राहत सहाब म्हणाले.. हिंदी-उर्दु भाषा के लिए जो भी काम करना चाहेंगे मैं उनके लिए हमारे फाउंडेशन से पैसा देने के लिए तैयार हू और मैं खुद भी उन प्रोग्राम में हमेशा शरीक होता रहूँगा l देश इन्हीं खूबसूरत भाषा से बंधे रहेगा l कितनी सारी बोली भाषाएँ है देश मे, उनका ईस्तेमाल बेहद जरूरी है l ते म्हणाले.. आप देखिए मेरी फ़िल्मों के गीतों मे भी कहीं कहीं बोली-भाषाएँ दिखाई देते हैं l शायरी, नज़्म, गीत, समाज, राजनीति अशा बर्याच विषयांवर चर्चा झाल्या. l अब्रार कडे सूत्र संचालन असल्यामुळे तो आधी निघून गेला. काही वेळ चर्चा केल्यानंतर आम्ही दोघेही राहत सहाब को यह कहते हुए रुखसत हो गए कि राहत सहाब.. हम फुटबॉल ग्राउंड जाते है l हमे आपको सुनना है…
आणि आज ही बातमी…..
क्या हम फिर से उन्हें कभी सुन पाएंगे…..
घरों की राख फ़िर देखेंगे पहले देखना ये है
घरों को फूँक देने का इशारा कौन करता हैं l
मुझ पर नहीं उठे हैं तो उठकर कहां गए
मैं शहर मे नहीं था तो पत्थर कहां गए l
पिछले दिनों की आँधी मे तो गुम्बद तो गिर चुका
अल्लाह जाने सारे कबूतर कहां गए l
राह में ख़तरे भी है लेकिन ठहरता कौन हैं
मौत कल आती है आज आ जाए डरता कौन हैं l
तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर
फैसला मैदान मे होगा कि मरता कौन हैं l
राहत इंदौरी सहाब…. सलाम 🙏
= किरण काशीनाथ , चंद्रपूर
राहत इंदोरी यांचा अल्पपरिचय.
जन्म.१ जानेवारी १९५० इंदोर येथे.
राहत इंदोरी यांचे
राहत कुरेशी हे त्यांचे खरे नाव. ते उर्दू भाषेचे माजी प्राध्यापक आणि एक चित्रकार देखील होते. याआधी ते इंदोरच्या देवी अहिल्या विद्यापीठात उर्दू साहित्याचे शिक्षण शास्त्रज्ञ होते. राहत इंदोरी यांनी आपले शिक्षण नूतन स्कूल इंदोर येथून पूर्ण केले त्यांनी इंदोरच्या इस्लामिया करीमिया महाविद्यालयातून १९७३ साली पदवी संपादन केली आणि त्यांनी बरकत उल्ला विद्यापीठातून उर्दू साहित्यात १९७५ साली एम ए केले. १९८५ मध्ये राहत यांनी भोज विद्यापीठातून उर्दू साहित्यात पीएचडी मिळविली होती.
राहत इंदोरीजी यांनी सुरुवातीच्या काळात इंदोर येथील इंद्रकुमार महाविद्यालयात उर्दू साहित्य शिकवायला सुरुवात केली. राहतजींमध्ये जबरदस्त प्रतिभा, क्षमता, कठोर परिश्रम आणि शब्दशैलीची एक विशिष्ट शैली होती ज्यामुळे ते लोकप्रिय झाले. ते केवळ अभ्यासातच हुशार नव्हते तर ते खेळातही पारंगत होते, ते शाळा व महाविद्यालयीन स्तरावर फुटबॉल व हॉकी संघाचे कर्णधारही होते. महाविद्यालयीन काळात त्यांनी जेव्हा पहिली कविता केली तेंव्हा ते केवळ १९ वर्षांचे होते.
राहत इंदोरींनी गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून असंख्य मुशायरा आणि कवि संमेलनात भाग घेतला. आपले काव्य वाचन त्यांनी भारतभर व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा अमेरीका, ब्रिटन, युएई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, मॉरिशस, कुवेत, कतार, बहरेन,ओमान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ येथे सादर केले होते.
राहत इंदोरी यांनी मैं तेरा आशिक, सर, खुद्दार, जानम, मुन्नाभाई एम.बी.बी एस, मिशन कश्मीर, करीब, इश्क, घातक आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती.
राहत इंदोरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.