आणि गझल पोरकी झाली : प्रा. रविप्रकाश चापके
..आणि गझल पोरकी झाली!
आमच्या यवतमाळचे विरक्तिपसंद उर्दू शायर मस्तान काशीफ़ यांचे काल शनिवार दिनांक 18 जुलै2020च्या मध्यरात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले..आणि गझल पोरकी झाली!
कोण होते हे शायर?
या संदर्भात काही वास्तवदर्शी घटना बघा..
🔹 माजीद शोला ह्या सुप्रसिद्ध कव्वालाच्या सुरात पुन्हा पुन्हा तोच-तो एक शेर संगीतकार नौशाद ‘वन्स मोअर’ करीत होते..म्हणत होते..’माजीद.. वो एक शेर बार बार सुना….कोणता तो शेर ?
तो शेर होता..
‘मुझे जिगर का मेरे खून याद आयेगा..
मिलेंगे जब आप होठो पर सुर्खियां लेकर !’
(सुर्खिया-लिपस्टिक)
🔹 आपला शायर गेला एकदा.. थेट मुंबईच्या स्टुडिओत.तेथे व्ह्वी. शांतारामचे जावाई व गानकोकिळा लताबाईंचा एक प्रोजेक्ट सुरु असतो…तेव्हा त्यांचा PA (दिलीप)आपल्या शायरची गझल ऐकतो..आणि शायरला थांबण्यासाठी सांगतो..म्हणतो ‘ रुको मियां..आपकी लाईफ बन जायेगी !’ परंतु शायरला घाई असते त्याच्यावर विसंबून असणाऱ्या कुटुंबाकड़े यवतमाळ जाण्याची…आणि भविष्यातील किर्तीवंत करीअरची भन्नाट संधी तो गमवतो.
🔹एका यवतमाळच्या मोठ्या मुस्लिम मराठी कवी-गझलकाराची घटना आहे, त्याच्या मुलीचे लग्न ठरते.. पैसाअडका वगैरे नसतो..तो विनंती करतो आपल्या शायरला तेव्हा आपला शायर त्याच्या ख्यातकीर्त कव्वाल आगरेवाले ह्यांचा ‘च्यारिटी शो’ घेवून त्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी लागणारे पैसे गोळा करून देतो.. ग्रेट ना ?
🔹या,आपल्या शायरच्या गझला गझलगायक पंकज उदास व ईतर सुप्रसिद्ध कव्वालांनी गायल्यात…हा शायर म्हणजे यवतमाळचा ग्रेट शायर मस्तान काशीफ़!
त्यांच्या काही सदाबहार शेरांचा आस्वाद घ्या रसिक मित्रांनो-
चला उदास जो दामन की धज्जियां लेकर..
हरेक मोड़पर रोता रहा वो हिचकियां लेकर.
झपट लिया है सियासतों के गोताखोरोंने
निकल रहे थे समुंदरों से सिपियां लेकर .
मुझे जिगर का मेरे खून याद आयेगा..
मिलेंगे जब आप होठोपर सुर्खियां लेकर .
इन्हें जरूर बहारे गले लगायेंगी …
शजर खड़े है उमीदो की टहनियाँ लेकर .
किधरको चले काशिफ,ये कहाके लोग है?
लुटी-लुटीसी खंदो पे बस्तियां लेकर .
■
सामने हम नहीं होंगे तो क्या रह जायेगा.
देखने सुरत तुम्हारी,आईना रह जायेगा .
■
तंग कमरे, घर भी छोटे , क्या हवा ताजा लगे.
हम चले जितनाभी झुकके,सर को दरवाजा लगे.
जब करे सडको पे मजदुरी अभागन लड़कियां,
प्यारी प्यारी सुरतों पे धूल का गाजा लगे .
(गाजा-पाउडर)
मस्तान काशीफ़..या ग्रेट उर्दू शायरच्या लेखनीला सहस्त्र सलाम !
निसर्ग त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो..हेच पसायदान !
****
मस्तान काशीफ़ साहेब यांची गझल व सादरीकरण पाहण्यासाठी लिंक :
* * *