2020 जुलै

सु.शि.

सा हि त्या क्ष र 

रहस्यकथालेखक व १०० चे वर पुस्तके लिहिणारे कादंबरीकार ,#सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. यांचे आज पुण्यस्मरण (नोव्हेंबर १५, १९४८ – जुलै ११, २००३) 

१९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु ‘लोकांना आवडेल ते’ अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंघांच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथादेखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘देवकी’ या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर ‘दुनियादारी’, ‘कोवळीक’ या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत.(विकिपीडिया )

त्यांची साहित्यसंपदा 

अंतिम——अतर्क्य—–अनुभव——अंमल—–असह्य—–असीम——असो …——आक्रोश—–ऑपरेशन बुलेट——ऑब्जेक्शन युवर ऑनर—–ऑर्डर ऑर्डर—–आवारा——इज्जत—–इत्यादी… इत्यादी…—–इथून तिथून——इलेव्हन्थ अवर——एक … फक्त एकच!——एव्हरीथिंग … सो सिंपल!—–ओ गॉड——कणाकणाने—–कथा पौर्णिमा—–कपाकपाने——कल्पांत—–काटेरी—–कायद्याचे हात——क्षण क्षण आयुष्य—–किल क्रेझी—-कोल्ड ब्लड—–कोवळीक——क्रमश:——गढूळ——गुणगुण——जाई—–जाणीव——जीवघेणा——झलक—–टेरिफिक—–ट्रेलर गर्ल——तलखी—–तलाश—–तुकडा—-तुकडा चंद्र—–थँक यू मि. न्यूजपेपर——दास्तान——दुनियादारी——धुकं-धुकं——नॉट गिल्टी—–निदान——निमित्तमात्र——निराकार—-न्याय अन्याय—–पडद्याआड—–पाळं मुळं—–प्राणांतिक——फलश्रुती——बंदिस्त—–मंत्रजागर—–मधुचंद्र—–मरणोत्तर——मर्मबंध—-मातम—-माध्यम—–मास्टर प्लॅन—-माहौल—–मुक्ती—-मुखवटा—–मूडस—–म्हणून—–बरसात चांदण्यांची—–बिनशर्त—–योगायोग—–रूपमती—-लटकंती—–लास्ट बुलेट——वंडर ट्वेल्व्ह——वर्तुळातील माणसं——वास्तविक——वेशीपलिकडे—–शब्दवेध—–शेडस——सनसनाटी—-सन्नाटा—–सफाई—–समांतर—–सराईत——संशय—–सायलेन्स प्लीज—–सॉरी सर——सालम—–सूत्रबद्ध—–सैतानघर——स्टुपिड——स्पेल बाउंड—–स्वीकृत—–हॅलो हॅलो—–हायवे मर्डर—–हिरवी नजर—-हृदयस्पर्श——क्षितिज

“********************************************

( लेख फॉरवर्डेड ) 

सुहास शिरवळकरांच्या घरी त्यांना भेटण्याचा योग आला होता. मित्राच्या पुस्तकाच्या कामासाठी दिलीपराज प्रकाशनाकडे गेलो होतो. तिथे बोलता बोलता प्रकाशक म्हणाले, सु.शि. वरच राहतात. मग काय.. त्यांनी फोन लावून सु.शि. शी बोलून  घेतले. मग आम्ही अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून गेलो. एक साधा टी शर्ट व जीन्सची पँट घातलेले शिरवळकर समोर आले. फ्लॅटच्या बाल्कनीत दोन तीन गोधड्या , चादरी . मराठी लेखकाचे घर शोभते खरे, असे वाटून गेले.  दोन तास चर्चा, दोनदा चहा झाला. सु.शि. नी सिगारेट शिलगावत गप्पांचा फड रंगवला. त्यांचे वडील प्रख्यात कीर्तनकार होते  आणि त्यांचे मूळ आडनाव देशपांडे असल्याचे त्यांनी सांगितले. नगरला दिल्ली गेटला त्यांचे बंधू उत्तम शिरवळकर राहात होते. त्यांच्या ‘ जाई ‘ या गाजलेल्या कादंबरीबद्दल, उठलेल्या वादळाबद्दल आणि त्यांना आलेल्या पत्राबद्दल खूप सविस्तर चर्चा झाली. त्या काळात मोबाईल नसल्याने हा क्षण पकडता आला नाही.

 लोकप्रिय साहित्यिकाला अखिल भारतीयवाले संमेलनला सहसा बोलावत नाहीत. पण सुशि त्याला अपवाद ठरले. नगरच्या संमेलनात त्यांना सन्मानाने बोलावले गेले, तेव्हाही त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांच्या प्रेमात असणारे आमचे भिंगारचे  लेखक मित्र सुनील राऊत यांनी त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी बोलावले, तेव्हाही संवाद झाला. कालपरवा सुशि यांचा स्मृतिदिन होता, त्पानिमिताने हे स्मरण. धन्यवाद

– डॉ. संजय बोरुडे

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment