2024 History चांदबीबी नोव्हेंबर

मुदगलचे पुजारी – चांदबीबी प्रकरण ३ रे

सा हि त्या क्ष र 

    

मुदगल.  उत्तरेकडे कृष्णा आणि दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीच्या दरम्यान असलेल्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात वसलेलं देशातील एक महत्त्वाचं शहर. चौदाव्या आणि पंधराव्या शतकात हे विजयनगरचे हिंदू राज्य  आणि दक्षिणेतील मुसलमान शाह्यांच्या वादाचं केंद्र होतं. हे शहर मिळविण्यासाठी दोन्ही सैन्यामध्ये भयंकर रक्तरंजित लढाया झाल्या. रायचूर हे दोआबाच्या  ( त्यावेळी प्रांताला दोआब म्हणत असत) फारस महत्त्व नसलेल्या पूर्व भागाची राजधानी होती. मुदगल ही राजधानी आणि स्थानिक प्रशासनाच केंद्र होत. इतिहास कारांच्या मते, विजय नगरच्या राजा विरुद्ध  मुसलमान राजांच्या युतीचे पर्यावसान पुढे डिसेंबर १५६९ मध्ये मुदगल पासून तीस मैलावर  आणि कृष्णेच्या दक्षिण तीरावरील तलिकोटच्या लढाईत  झाले. हिंदू राज्य नष्ट झाले आणि आपल्या कथेच्या काळापर्यंत हे शहर आणि किल्ला मुसलमान राजांच्या ताब्यात होता. जे आजतागायत त्यांच्याच ताब्यात आहे. ते तेव्हा विजापूर राज्याच्या नैऋत्य प्रांताचे मुख्य ठिकाण होते आणि सीमेवरील कोणत्याही गडबडीविरुद्ध कारवाई करण्यासाठी, बेरड आणि इतर विविध लष्करी जमातींना  दडपण्यासाठी एक अतिशय लक्षणीय फौज तेथे नेहमीच सज्ज असायची. मुसलमान राजांशी एकनिष्ठ असले तरी ते लूटमार करणे,  गुरे ढोरे पळविणे अशा गुन्हेगारी कारवायात मग्न असत.

बरीच पडझड झालेली असली तरीही मुदगल चा किल्ला आजही एक नयनरम्य वास्तू आहे. काही भाग हिंदूंनी आणि काही भाग मुसलमानांनी बांधलेला हा किल्ला ग्रॅनाईटच्या टेकाडावर वसलेला आहे. जे फार पूर्वी झालेल्या एका भयंकर उद्रेकामुळे निर्माण झालेले होते. सुपीक असलेल्या सपाट भूप्रदेशावरून वर आलेले हे खडक काहीसे विलग दिसतात. किल्ल्याची बांधणी अनियमित होती जिथं बांधकाम शक्य होतं तिथं बुरुज बांधलेले होते.  किल्ल्याचा तुटक भाग एकेरी, दुहेरी आणि तिहेरी भिंती व बुरुजांनी संरक्षित केलेला होता. उत्तरेकडे सिंचनासाठी एक मोठा तलाव आहे. जो आजही सुस्थितीत आहे आणि लागवडीसाठी मुख्य सिंचन स्रोत आहे. याच्या काठावर आंब्याची आणि चिंचेची बरीच झाडं आहेत.जी या उजाड भूभागाला सुंदर रूप देतात. दाट लोकवस्तीचे हे  शहर किल्ल्याच्या पूर्वेकडे वसलेले आहे. इतस्तः पसरलेल्या अवशेषांवरून या शहराच्या गत वैभवाची कल्पना येते. किल्ला माञ निर्जन आहे त्याचे बरेच बुरुज अवशेषांचे ढिगारे बनलेले आहेत. जे काही शिल्लक आहेत ते पूर्वी हा किल्ला किती मजबूत असेल याची कल्पना देतात. हे शहर दोन वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होतं. एक सुती कापडाच्या विणकामासाठी ज्यासाठी कच्चा माल प्रांताच्या लगतच्या प्रदेशातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असे. दुसरं कांबळीसाठी ज्या  स्थानिक मेंढपाळांनी  पाळलेल्या मेंढ्यांच्या मोठया कळपांमधून मिळणाऱ्या लोकरी पासून बनत असत. हे मेंढपाळ आणि विणकर सामान्यपणे शांतता मय आयुष्य जगत असले तरी किल्ल्याच्या रक्षणासाठी ते लढाईतही भाग घेत असत.

   आश्चर्य  याचे वाटते  की   या कथेच्या काळात हे मेंढपाळ अणि विणकर हे ख्रिश्चन झालेले होते . तेव्हापासून आजतागायत ते एकनिष्ठ राहिले. त्यांनी धर्म परिवर्तन केले किंवा ते कोणी केले याबाबत काहीही माहिती नाही. असं म्हणतात की सेंट फ्रान्सिस झेवियर मिशनचा एक साधू मुदगल मध्ये गेला आणि त्याने त्या सर्वांना कानडी भाषेत उपदेश केला .त्यांचा बाप्तिस्मा करून त्यांना ख्रिश्चन बनवले. तेव्हापासून ते एकनिष्ठ आहेत. पाठोपाठ रायचूर मध्ये ही धर्म परिवर्तन झाले. येथे कुंभारांचे प्रमाण जास्त होते. इतर गावांतही मंडळ्या असल्या तरीसुद्धा मुदगलची मंडळी हीच मोठी होती आणि इथले चर्च हे प्रांतातील मुख्य होते. कौलारू छप्पर असलेली   चर्चची इमारत गोव्यातील चर्च प्रमाणे होती. सोबतच दोन छोट्या खोल्या सुद्धा होत्या. कॅथेड्रल वर सजावट नसली तरी बांधकाम माञ मजबूत होते. एका पोर्तुगीज कलाकाराने घडवलेली व्हर्जिन मेरी ची  सुंदर मूर्ती त्यात होती. चर्चला लागूनच कानडी शिकवणाऱ्या शाळा होत्या. चर्च चा मुख्य पुजारी शाळेचा अध्यक्ष होता त्याच्या अनुपस्थितीत इतर पुजारी काम पाहत असत.

    इसवी सन १५५७ मध्ये मरण पावलेला इब्राहिम आदिलशाह (पहिला) हा चर्चचा पहिला ता होता. त्याने चर्चला मान्यता देऊन सनदा पत्रे करुन जमिनी दिल्या होत्या. त्यानंतर आलेल्या अली आदिल शाह ने जकात रूपाने कर गोळा करण्यास सुरुवात केली. स्थानीक लोक अणि सत्ताधीश हा कर भरत असत. चर्च कडूनही पैसे किंवा वस्तू रूपात कर गोळा केला जाई. तरीही मिशन हे स्वावलंबी अणि स्वतंत्र होते. चर्चचे कामकाज, जुन्या अणि नव्या करारातील निवडी आणि उपदेश लॅटिन भाषेतच चालत असे. नंतर त्याचे कानडी भाषेत भाषांतर करत असत.यातील काही भाग संतांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी आणि इतर पवित्र प्रसंगी वाचले जात आणि चर्चच्या डीकन्सद्वारे नेहमीच शब्बाथला वाचले जात, जे पुजारी उपस्थित नसताना, नियमित सेवा करत. जनसमूहाला उपदेश माञ मुख्य पुजारीच करत असे.यातील काही हस्तलिखिते आतापेक्षा काहीशा जुन्या आणि कठीण भाषेत लिहिली गेली आहेत आणि त्यांचे लेखक नक्कीच विद्वान होते. ज्यांना त्या कठीण भाषेला सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी ते ज्ञान कसे मिळवले असेल याची कल्पना करणे केवळ अशक्य आहे.

     विजापूरच्या मुसलमान राजांनी आपल्या प्रदेशात ख्रिश्चन मिशनरी स्थापन करण्यास परवानगी कशी दिली असेल आणि त्यांना शाही देणग्याही कशा दिल्या असतील हे समजणे माञ अवघड आहे. पहिला इब्राहीम आदिल शाह आणि अली आदिल शाह यांचे पोर्तुगिजांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांनी इब्राहिमला ३००० युरोपियन पायदळाची मदत केली होती. दोघांचेही शेजारी राज्यांशी नेहमी वाद होत असत. एकदा अली आदिल शाहने गोव्याला नऊ महिने वेढा दिला होता. नंतर मुसलमान आणि ख्रिश्चनांनी आपले भांडण मिटविले. आपण लिहीत असलेल्या काळापर्यंत ते चांगले मित्र बनले. अशाप्रकारे मुदगल येथील मिशन हे बाहेरून जरी वृध्दींगत होताना दिसत असले तरी आतून माञ ते अडचणीत होते.

     मुदगलच्या चर्च आणि मिशनचा कारभार दोघेजण सांभाळत होते. एक होता डॉम डिएगो दी फॉन्सेका, जो काहीकाळ चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. त्याला त्याच्या पूर्ववर्तीला कार्यमुक्त करण्यास पाठवण्यात आले होते कारण मिशनच्या कार्यावर आणि त्याच्या पूर्ववर्तीवर नैतिकता व कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल संशय घेण्यात आला होता. तो स्वतःला  एक  जेसुइट आणि चर्च चा कैवारी समजत होता. त्याने चीन अणि बंगालला भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळच्या पद्धती प्रमाणे अनेक धर्मांतरे केली होती. मिशनच्या अंतर्गत शिस्तीचीही त्याने काळजीपूर्वक तपासणी केली होती. त्याचं खाजगी आयुष्य माञ बदनाम होतं. त्याच्या कार्यालयीन सेवेसाठी त्याला मृत्युदंडही झाला असता जसा त्याने इतरांना दिला होता. डॉम डिएगो पोर्तुगालच्या शाही कुटुंबातील होता आणि त्याला तिथल्या चर्च साठी निवडले गेले होते. परंतु त्याच्या तापट स्वभावामुळे त्याने भारतातील मिशनरी जीवन निवडले जिथे त्याच्या  विलक्षण पात्रते प्रमाणे काम मिळणार होते. व्यक्तिशः डॉम डिएगो उल्लेखनीय होता. त्याच्या उदात्त व्यक्ती रेखेचं वलय त्याच्या भोवती होतं. त्याचे  गर्विष्ठ हावभाव त्याच्या शारीरिक सामर्थ्यानुरूप होते. तो सुंदर असला तरी त्याचे वागणे मात्र लबाडीचे आणि तिरस्करणीय होते. त्याचा वर्ण काळा होता. भारतातील उष्णतेमुळे तो आणखीनच काळवंडला होता . इतका की त्याचा चेहरा आणि हात मुदगलच्या लोकांपेक्षाही जास्त काळे झाले होते.   सर्वजण त्याला घाबरत. तो कोणालाही आवडत नसे. त्यांच्यादृष्टीने तो शक्ती आणि बळाचा अवतार होता त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे. त्याचे पद आणि अधिकार पाहून स्थानिक ख्रिश्चन त्याला विरोध करत नसत की त्याची आज्ञा मोडत नसत.  देव त्याच्या कृत्याची शिक्षा नक्की करेल असे ते एकमेकांत म्हणत असत. त्याची कृत्यं ते आश्चर्याने पाहत असत.  हा दैत्य ख्रिस्ताच्या अणि त्याच्या दयाळू मातेच्या चर्चचा पुजारी कसा होऊ शकतो ? ज्यांची ते साधेभोळेपणाने भक्ती करत असत.

     डॉम डिएगोचा सहकारी एक वेगळा मनुष्य होता. फ्रान्सिस डी अल्मिडा , एक फ्रान्सिस्कन तपस्वी दया आणि नम्रतेचा पुतळाच जणू. काही वर्षांपूर्वीच त्याने पोर्तुगाल सोडलं होतं. इथं आल्यापासून त्याने स्थानिक भाषा शिकण्यासाठी झोकून दिलं होतं. त्यावेळी गोव्यात कानडी आणि मराठी भाषा बोलल्या जात. खालच्या श्रेणीतीले मुसलमान रासवट दख्खनी उर्दू बोलत. त्याने मात्र समृद्ध आणि  अर्थपूर्ण म्हणून कानडीच अभ्यासासाठी निवडली. चर्चच्या कामकाजासाठी अणि धर्मग्रंथांच्या भाषांतरासाठी हीच भाषा योग्य होती. त्याने गोव्यातील ढवळून निघालेल्या धर्म प्रसाराच्या कार्यात तितका भाग घेतला नाही आणि तो ते टाळण्यात यशस्वी झाला. कनाराच्या दूरवरच्या आणि एकाकी मिशनचे काम करण्यास मिळावे म्हणून तो प्रार्थना करत होता जिथून सुरू केलेले काम तो संपवू इच्छित होता. दोन्ही पुजारी जसे दिसायला वेगळे होते तसेच त्यांचे चारित्र्यही – एक काळा, उदास आणि दुष्ट तर दुसरा गोरा , नितळ तपकिरी डोळ्यांचा, त्याचे तपकिरी कुरळे केस त्याच्या खांद्यावर रुळणारे. एक सौम्य भावपूर्ण  चेहरा धार्मिक अज्ञाना बद्दल दयाभाव असणारा. त्या पदाला न्याय देऊ शकेल असा फ्रान्सिस डी अल्मिडा सारखा  शिक्षक हजारातही शोधून सापडला नसता. त्याचा समाज त्याला मानत होता. सौम्य , शुद्ध  भाषेत त्याने दिलेली शिकवण अणि उपदेश ज्यांची बरोबरी केवळ ब्राम्हणच करु शकत,  त्याचा समाज सोडून इतरांनाही मिशनकडे आकर्षित करत होते. खऱ्या ख्रिश्चन जीवनाबद्दल त्याने दिलेली भावपूर्ण उदाहरणे ऐकणाऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणत असत. सामान्य मेंढ पाळांसाठी तो दैवी दयेचा आणि प्रेमाचा अवतार होता. त्याच्या देखरेखी खाली अनेक नवीन लोकांनी नोदणी करुन बाप्तिस्मा करुन घेतल होता. ज्यांना शिकवण देऊन नवीन पंथासाठी तयार केले  गेले होते.

     तो एकटा नव्हता. त्याची बहीण मारिया, जिला त्याने लहानपणी पोर्तुगालमध्ये सोडले होते, ती मोठी झाली होती आणि तिने कर्नल डोम फिलिप डी परेराशी लग्न केले होते, ज्याने पोर्तुगालमधून नुकत्याच आलेल्या पायदळाच्या बटालियनचे नेतृत्व केले होते. मुसलमानांविरुद्ध जंगलातील लढाईत तो मलेरियाला बळी पडला होता. डोना मारिया कदाचित मायदेशी परतली असती किंवा गोव्यात राहून तिने पुन्हा लग्न केले असते; पण तिने तिचा भाऊ फ्रान्सिसला पाहिले होते, त्याच्या समाजाच्या चालीरीती आणि चालीरीतींचे किस्से आश्चर्याने ऐकले होते आणि तिने म्हटल्याप्रमाणे लगेच देवाच्या कार्यासाठी  तिने स्वतःला समर्पित केले होते.तिला एका सुरक्षा तुकडी बरोबर मुदगल येथे पाठवले होते आणि आपण लिहित असल्याच्या तीन वर्षे अगोदर ती तिच्या भावाच्या कार्यात सामील झाली होती. ती हुशार आणि अभ्यासू होती. तिच्या भावाच्या देखरेखीखाली तिने कानडी त्याच्या इतकेच उत्तम प्रकारे शिकले होते. तिच्या सुंदर हस्ताक्षरात तिच्या भावाच्या सर्व कच्च्या भाषांतरांचे चर्चच्या मोठ्या खंडांमध्ये   रूपांतर केले होते.ही हस्तलिखिते  तिने स्वतःच्या साध्या आणि मोहक रचनांनी आणि विलक्षण उदाहरणांनी सजवली होती .

     मेंढपाळ तिच्या भावाची पूजा करत असले तरी त्यांच्या मनात तिचेही वेगळे स्थान होते. ती आजारी व पीडितांची भेट घेत असे ; तिच्या गोड बोलण्याने अंथरुणाला खिळलेल्या अनेकांना आधार दिला होता. तिच्या शाळेतील मुलांना तिची शिकवण त्यांना निस्तेज दिनचर्यापेक्षा आनंददायक भेट वाटत असे. त्यांनी क्षमता दाखवली म्हणून तिने त्यांच्याशी संवाद साधला हे सर्व तिला माहीत होते. हे फारसे नव्हते, कदाचित, परंतु ते शिकवणे अणि शिकणे आनंददायी  होते ज्याचा शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आनंद घेत.डोना मारिया मुदगुलच्या नवाबाच्या कुटुंबाची खास पाहुणी होती. विजापूर सैन्याचा प्रसिद्ध सेनापती दिलावर खान हा धर्मांध नव्हता; त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आणि त्याच्या धार्मिकतेसाठी त्याचे पाद्री फ्रान्सिसवर प्रेम होते. पाद्री आणि स्थानिक मुस्लिम धर्मगुरू आणि विद्वान पुरुष यांच्यातील वादविवादाचाही तो आनंद घेत अस. आणि गोऱ्या डोना मारियाला त्याने हरममध्येच प्रवेश दिला नव्हता तर ती केव्हाही आली की खास पाहुणी असे.गोंगाट करणारी मुले आणि  गृहिणी तिच्याभोवती जमत आणि ती त्यांना नाझरेथचा पवित्र मुलगा येशूबद्दल, आणि तो मोठा झाल्यावर त्याने काय केले हे सांगत असे. प्रौढांना भरतकाम शिकवत तिने काहींना जवळपास ख्रिश्चन बनवले होते. डोना मारिया खूप गोरी होती आणि दख्खनच्या ताज्या हवेने तिचा मूळ रंग परत आला होता. लहान मुलांना तिने चेहरा रंगवलाय हे सांगण्यात मोठा आनंद होत असे. ते तिला चेहरा धुवायला लावत मग तर तो आणखीच उजळत असे. ती तिच्या गोड आवाजात आणि लयीत बालगीते, भजने ,तिच्या देशातील गाणी आणि चर्चची सूक्ते म्हणत असे जे सर्वांना आवडत.

     अशा प्रकारे  शांततेत आणि सर्वांशी प्रेमाने वागत  हे बहीण भाऊ मोठ्या आनंदाने जगत होते. सकाळ आणि संध्याकाळ ते  शेतांमधून आणि छोट्या तलावा जवळून फेरफटका मारत असत. दोघांकडेही  एक दख्खनी घोडा होता, पलीकडच्या उतारावर घोडेस्वारी करण्यात त्यांना आनंद वाटत असे. ज्याने  त्यांच्या कठोर परिश्रमांमध्ये त्यांना आरोग्य दिले. त्यांची बागही होती.  द्राक्षे आणि संत्री चांगली वाढली होती, आणि अजूनही पाद्रीच्या बागेत वाढतात. त्यांना आणखी काय हवे होते? त्यांच्याकडे आध्यात्मिक संपत्ती आणि समाधान होते. सांसारिक गोष्टींची त्यांना यापुढे गरज नव्हती. हे असेच पुढेही टिकेल? डॉम डिएगोच्या आगमनापासून आता काही महिने झाले होते,त्यांना भविष्यासाठी अंधकारमय वाटत होतं..

********************

  • सतीश सोनवणे, कामरगांव, ता. जि. अहिल्यानगर.संपर्क : ७७०९६८३३२३

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

2 thoughts on “मुदगलचे पुजारी – चांदबीबी प्रकरण ३ रे

  1. Madhuri chaudhari

    Very nice and informative

    1. सा हि त्या क्ष र

      thanks

Leave A Comment