2015 एप्रिल

एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल..

सा हि त्या क्ष र 

  (डावीकडून अशोक नायगावकर,डॉ. महेश केळुसकर ,साहेबराव,मी  तुकाराम धांडे )

  एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल..

मी मुंबई विद्यापीठात पी एच. डी. च्या कामासाठी गेलेलो..फोर्ट मधील काम आटोपल्यावर मी केळुस्करांना फोन केला. ते म्हणाले ,’अरे,मुंबईत आलायस का?’ मी हो म्हणताच ते म्हणाले.. ,’आता नको  कर,संध्याकाळी सात पर्यंत वाशीच्या नाट्यगृहात पोहोच.राजकीय विडंबने  दोन तयार  ठेव..’ मी हो म्हटले खरे पण राजकीय कवितांसाठी  प्रसिद्ध असलो तरी  विडंबने  ? फक्त तीन तास हातात उरलेले.  जेवण राहिलेले.. 

  वाशी  स्टेशनवर उतरलो तर अर्धा तास झालेला.. तोपर्यंत मुखडा सुचला होता.. समोर महेशजी दिसले..मग एकाच रिक्षातून जाताना मी त्यांना मुखडा ऐकवला. वामनदादांच्या एका गीताच्या चालीवर.. त्यांना तो आवडला.ते म्हणाले,’मी शेवटी नाव घेतो तुझे..तोपर्यंत तयार कर ‘त्यांनी प्रोत्साहन दिले खरे पण मला टेन्शन  आलेले.कार्यक्रम मोठा होता.नवी मुंबई प्रेस क्लबने कोजागिरी निमित्त ठेवलेला. नायगावकर,साहेबराव ठाणगे,तुकाराम धांडे सगळे स्टेजच्या मागे तयार होऊन बसलेले.. अनेक कार्यक्रमात एकत्र असल्याने ते माझ्या बाबत कॉन्फिडन्ट होते.स्टेजवर गेल्यावर भर एसीत मला घाम फुटला..काही सुचायलाच तयार नाही.कुठून कार्यक्रमाला हो म्हटले असे झालेले..  एक शिवरायांवरची माझी गाजलेली   कविता होतीच.पण पहिल्या राउन्डला विडंबन हवे होते..मला तर काही सुचेना. त्यात तिथे कागदही नव्हता.. म्हणजे मनात करावी लागणार.त्यात अन्य कवींच्या कविता चालू झालेल्या .. 

               पहिल्या राउन्डच्या शेवटी माझे नाव पुकारले..केळुस्करांनी प्रस्तावनाही  दणकेबाज केली..अनुवादक,समीक्षक वगैरे..   मी उठलो..,आवाज लावला… आणि सुरु केले… 

‘पहा गड्यानो ,निवडणुकीचा मोसम आलाय खरा… हे.. मोसम आलाय खरा,पुन्हा मलाच मतदान करा.. ‘

आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.. मग मी माझ्या नेहमीच्या मूड मध्ये परतलो .. आणि केळुसकरांनी टाकलेला विश्वासाला मी पात्र ठरल्याची पावती त्यांच्या चेहऱ्यावर दिसली.. अशा रीतीने मी वेळ मारून नेली..पण कुणाला संशय हि आला नाही कि मी ऑन सतेज कविता तयार केली म्हणून… 

– डॉ .संजय बोरुडे 

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment