2020 एप्रिल

कळवंड : डॉ. जगदीश कदम

सा हि त्या क्ष र 

कवंडळ

दुपारपासून राघोबा खूप अस्वस्थ होता.त्याचं मन कशातच लागत नव्हतं.कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं.डोक्यात किडे पडल्यासारखं झालं होतं त्याला.तो मनातल्या मनात स्वत:वर चिडत होता.स्वत:लाच दोष देत होता.आपलं चुकलंच गड्या.आपल्यामुळंच मायचा जीव गेला‌.आपण हेकाडी केली नसती तर माय जगली असती.मायच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत या जाणिवेनं त्याचं काळीज आरपार चिरत होतं.
कधी नाही ते आपण इतकं निष्ठूर कसं वागलो हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.रमेश आपला सख्खा भाऊ पण त्याला आपण झटक्यात झटकून टाकलं.मायनं अशानं असं हाय म्हणून लाख परीनं समजावून सांगितलं.”लेका आठपंधरा दिवस भाऊ बायको- लेकराला घेऊन तुह्याकडं राह्यला तर फार नुकसान व्हणार नाही.रमेश तुव्हा लहान भाऊ हाय.शहरात महामारी आली म्हणून त्याला गाव जवळ करावं वाटायलं.त्याचं लेकरू लहान हाय.बायकोच्या माहेरची परिस्थिती अशीतशी हाय.तू त्याचा बोलून चालून मोठा भाऊ.तुह्याबिगर त्याला कोण हाय.”
मायेनं काकुळतीला येऊन दिलेला सल्ला आपण कानाआड केला.रमेशचा गावाकडे येण्याचा रस्ता रोखला.खूप दिवसांपासून रमेशविषयी मनात असलेला राग या निमित्तानं चोंभाळला.
राघोबाच्या मनात विचारचक्र गरगरत होतं.
तो बसल्या जागेवरून उठला.खुंटीवरचा रुमाल तोंडाला गुंडाळला.शेताकडं जायच्या विचारानं पायात चप्पल सरकवली.बाहेर पाहिलं.रस्त्यावर पावसाचे थेंब पडत होते.वर आभाळ गच्च भरून आलं होतं.
“आता कोठं निघाले म्हणते.खाल्लाकून आभाळ मोडून आलंय.गाव वलांडू देणार नाही.”
अंगणात भांडी विसळत बसलेल्या नर्मदानं टोकलं तसं राघोबानं पायातली चप्पल दाराआड लोटली.खाटंवर येऊन आडवा झाला.वाट चुकल्या पाखरासारखा आड्याकडं टुकूटुकू पाहू लागला..
मायचं ऐकलं असतं तर मनाची अशी कुत्तरओढ झाली नसती.मायचं ऐकलं नाही.बायकोचं ध्यानात घेतलं नाही.ती बिचारी खूप काकुळतीला येऊन बोलली.नरमाईनं घ्या म्हणून हात जोडले.तिला पण जुमानलं नाही.”किती केलं तरी रमेश भावजी तुमचे भाऊ हात.त्यांनी काय केलं मुलखायेगळं?ते शिकले सवरलेले लोक.त्यायच्या इच्यारानंच वागणार की.त्यायच्या वाट्याचं काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार आपला थोडाच हाय.आपून कामून इनाकारण जिवाचा तिळपापड करून घेवाव.”
नर्मदा सांगत होती ते खोटं नव्हतं.रमेश आपला भाऊ असला तरी त्याचे त्याला विचार असतील ना!तो त्याचंच बघणार ना!आपल्यासारखं त्यानं वागलं पाहिजे हे सांगणारे आपण कोण?त्याची त्याच्या जगण्याची गणितं असतील ना.आपण मध्ये टांग मारणं बरोबर नाही.राघोबाचं मन कधी कधी सोयसा विचार करायचं.पण मध्येच उलटंपालटं व्हायचं.
खरं तर राघोबानं मनाला लावून घेण्यासारखी ही गोष्ट नव्हती.पण तिचा त्यानं बाऊ केला होता.
रमेशनं गाव सोडलं याचं त्याला दु:ख नव्हतं पण जमीन विकून पुण्यात बि-हाड करावं हे त्याला पटत नव्हतं. रमेश आपल्या निर्णयावर ठाम होता.मागे हटायला तयार नव्हता.बरं झालं बापानं हयात असताना जायदातीची वाटणी केली.रमेश शिकलेला म्हणून त्याला पाच एकर आणि राघोबा शेतात काम करणारा म्हणून त्याच्या वाट्याला सात एकर आणि घर अशी विभागणी केली.शिवाय जीवात जीव आहे तोपर्यंत मायबापाची जबाबदारी थोरला म्हणून राघोबाची.
रमेश लहान असूनही बापानं केलेल्या वाटणीबद्दल चकार शब्द बोलला नाही.
राघोबा मात्र ताणून होता.रमेशशी तुटकपणे वागत होता.त्याच़ं वागणं सगळ्यांनाच खटकत होतं.
कोणी स्पष्टपणे बोलत नव्हतं एवढंच.बोलून फारसा उपयोग नव्हता.कोणी चांगलं सांगायला गेलं तरी राघोबा वाकड्यात घेत होता.त्यामुळं कोणीच मध्ये पडत नव्हतं.
राघोबा किती तरी वेळ विचारात गढून गेला.
वडील जिवंत होते तोपर्यंत सारं सुरळीत होतं.विषमज्वराचं निमित्त झालं अन् वडील गेले.जाताना सोयवार सांगून गेले.राघोबा आणि रमेशला बोलावून घेतलं.जवळ बसवलं.आणि सगळं उजडून सांगितलं.” पोरहो,आमचा काही आता भरोसा नाही.तुम्हाला सांगून ठेवतो.आमच्या माघारी मथारीला अंतर देऊ नका.जड झालं म्हणू नका.एकच बहिण हाय.तिला सणावाराला का व्हयीना आणत जा.साडीचोळी करत जा.मायलेकीला केलं तर वाया जात नाही.राघोबा तू मोठा हास.तू शिकला नाहीस.शाळा सोडून शेतात रमलास.शिकला असतास तर चार घास सुखानं खाता आले असते.तव्हा शाळा सोडून नदाडानं हिंडत गेलास.आमचं बोलणं कानाआड केलं.माय मिनतवारी करून थकली.त्याचे फळं तुला आता दिसायलेत.पायात कुरपं घेऊन धुरे राखायची पाळी आली.झाली जराशी फडफड.पण रमेश शिकला.शिकलेला माणूस रिकामा थोडाच राहतो.त्याचं त्यो बघंल काहीतरी.राघोबा तू शेतात काम करणारा गडी.शेतीचं गणित तोट्यातलं.कितीही मेहनत केली तरी उजडायचं नाव नको.तुला रमेश अंतर देणार नाही.तूच कव्हाकव्हा तिरसटावनी वागतूस‌.असं वागणं बरं नाही.तुला दोन लेकरं हात.त्यायला शिकव.शिक्षणाची गोडी लागली तर पुढं सरकतील.भावाच्या आधारानं मोठं व्हतील.तुह्यासारखी त्याह्यची आबाळ करू नकोस.”
राघोबाला वडिलांचे शब्द न् शब्द आठवू लागले.त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ होऊ लागला.बापाचं ऐकलं असतं तर हा प्रसंग आलाच नसता असं त्याचं त्याला वाटू लागलं.
वडील गेले आणि घराची जबाबदारी राघोबावर येऊन पडली. त्यामुळे तो काहीसा भांबावला.रमेशनं गाव सोडलेलं.पुण्यातल्या कुठल्या तरी कंपनीत लागलेला.त्याची बायको सुद्धा तिथल्याच इंग्रजी शाळेत टेंपररी लागलेली.त्याच्या शेतीची वहीत राघोबाकडंच होती.बटाईनं जे काही पदरात पडेल ते घेत होता.तीन-चार वर्ष सगळं सुरळीत चाललं.रमेश दिवाळीला गावी यायचा‌‌.येताना सगळ्यांना कापड आणायचा. बहिण- भाऊ मिळून दिवाळी साजरी करायचे.शेवंता मायला खूप बरं वाटायचं.हे पाहायला पोरांचा बाप नाही याचं वाईटही वाटायचं.
सगळं ठरवून केलेल्या सारखं चाललं होतं.पण मध्येच रमेशनं वेगळा पुंगा काढला.आपल्या वाट्याचं शेत विकायला काढलं.राघोबाच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो जवळजवळ उलथलाच. मनातून खूप दुःखी झाला.भावाचा वाटा गेल्यावर आपण टिचभर रानात काय करायचं.सगळाच विस्कोट होणार या जाणिवेनं तो धास्तावला.रमेशनं शेत विकू नये यासाठी मायला मध्यस्थी करायला भाग पाडलं.शेवंता मायेनं रमेशला नाना परीनं समजावून पाहिलं.मात्र रमेश कोणाचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.गावाकडची जमीन विकून पुण्यात गुंठा दोन गुंठे जमीन घ्यायची अन् उरलेल्या पैशात डोनेशन देऊन बायकोला कुठल्यातरी शाळेत चिकटवायचं.हा विचार त्यानं मनात पक्का खोवून ठेवलेला.त्यापासून तसूभरही हटायला तो तयार नव्हता.यात त्याच्या बाजूनं त्याला चूक दिसत नव्हती.शेतीच्या तुकड्यात या सालाचं टोक त्या सालाला पुरणं मुस्कील होतं.वर्षभर शेतात राबून काहीच शिल्लक राहत नव्हतं.लाव लावगडीचा खर्च वजा करून चार दोन पोते पदरात पडत होते.एवढंच काय ते.शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला हे रमेशच्या डोक्यात पक्कं बसलेलं.त्यामुळे कोणी काहीही सांगून उपयोग नव्हता.शेवंता माय सांगून सांगून दमली.”माय जिती हाय तव्हर काळीचा सौदा करू नको लेकरा.” म्हणून अडवून पाहिलं.पण रमेशनं मायचंही ऐकलं नाही.
एके दिवशी शेतालगत शेत असलेल्या मारवाड्याच्या नावानं सातबारा लिहून दिला.राघोबानं खूप कल्ला केला.बहिण खुतून बसली तेव्हा तिला थोडीफार रक्कम देऊन बयनाम्यावर सही घेतली.शेवंता मायला हटकून पाहिलं.”माय तुला काही पाहिजे असेल तर आताच मागून घे.पुन्हा कुरबूर करू नको.माझ्या नियोजनात मोडा घालू नको.”
“मला काय करायचं बाप्पा.तुला जे पटतं ते कर.पण गावची वाट मोडून टाकू नको बापू.एवढंच सांगणं.”
शेवंता मायला रमेशची काळजी नव्हती.तो अनाठायी पैसे उधळणार नाही याची जाणीव होती.शिकायला असताना खर्चाला दिलेले पैसे तो पुरवून पुरवून वापरायचा.त्यानं कधी हॉटेलात जाऊन मित्रांना पार्ट्या दिल्या नाहीत की शानशौकीत पैसे घातले नाहीत.दहावीत घेतलेल्या सायकलीवरच शिक्षण केलं.भावाच्या मुलाला कामी येईल म्हणून ती सायकल घरी आणून टाकली.उधळमाधळ त्याच्या स्वभावात नव्हती.जमेल तशी काटकसर करीत त्यानं दिवस काढले.
शेतक-यांबद्दल कळवळा रमेशच्या वागण्याबोलण्यातून दिसायचा.शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो.पण काय पडते त्याच्या पदरात?कोणत्याच गोष्टीला त्याचा हात पुरत नाही.त्याचे हाल पुसायला कोणाला फुरसत नाही.राजकारणानं तर पार वाट लावली.शेतकरी मेला काय,जिवंत आहे काय याच्याशी कोणाला देणंघेणं नाही.निवडणूक आली की नंदीबैल होऊन दारात येणारे बगळे निवडून गेले की पाच वर्ष गायब होतात.जागा अडवून बसलेली शेतकऱ्यांची पोरं कशी पिळवणूक करतात याविषयी तो बोलायचा.शेवंता मायला रमेशचं भारी कौतुक होतं.लोक म्हणायचे “रमेश लई शिकला.गावातला पहिला इंजिनिअर झाला.” असं काही ऐकलं की शेवंता माय फुरगटून जायची.आपल्या पोरानं नाव केलं म्हणून तिला भूषण वाटायचं.पण कधी कधी काळजी वाटायची.रमेश गाव सोडून जाणार म्हणून ती व्यथीत व्हायची.
रमेशचं लग्न झालं त्या वर्षीची गोष्ट.रमेश इंजिनिअर झाल्याबरोबर पुण्यातील एका कंपनीत त्याचं सिलेक्शन झालं.पॅकेज जास्त नसलं तरी ब-यापैकी होतं.रमेशला नोकरी लागली हे समजल्यावर लग्नासाठी पाहुण्यांची रीघ लागली.चांगल्या सधन घरच्या मुली आल्या.पण रमेशनं निवड केली साधारण परिस्थितून आलेल्या प्रतिभाची.इंजिनिअर मुली सोडून डबल गॅज्युएट झालेल्या प्रतिभाची निवड करण्यामागे रमेशचा हेतू होता.त्याच्या निवडीविषयी कोणी काही बोलले नाही.रमेश पुण्याला जाणार हे जवळजवळ निश्चित झाले होते.हाताशी आलेला जॉब कोण सोडणार?रमेशने कंपनी कडून काही दिवसांची फुरसत घेतली.त्या दरम्यान लग्न उरकून घेतलं.लग्नातही बडेजाव केला नाही.लग्न झाल्यावर आठ दिवसातच
रमेश पुण्याला निघाला.
राघोबा आपल्या कामात रमलेला.रमेशच्या जाण्याचं त्याला काही वाटत नव्हतं.नोकरीसाठी गाव सोडावंच लागते हे तो जाणून होता.शेवंता माय मात्र अस्वस्थ होती.रमेश सामानाची बांधाबांध करीत असताना न राहवून ती बोलून गेली.
“रमेश,बापू तुला आपल्या टापूत नोकरी लागणार नाही का रे?”
तिनं थेट रमेशलाच विचारलं.
“गावात कोणती नोकरी मिळणार आहे माय मला.डीएड,बीएड झालो असतो तर शाळा मास्तर झालो असतो.पण तिथं सुध्दा डोनेशन मोजावंच लागलं असतं.”
“ते समदं खरं हाय.तू परमुलखात गेल्यावर आमचं कसं व्हणार‌ हाय इकडं.”
“काही होत नाही माय.कोणाचं कोणावून अडत नाही.राघोबादादा आहे की सांभाळायला.इथं करमत नसेल तर येऊन राहा की आमच्या कडे.”
“तू चाललास बापू पाचशे कोसावर नोकरीला.तिथं आमच्या ना वळखी- पाळखीचं.आम्हाला काय करमते बापू परमुलखात.इथंच बरं आपल्या रानभोईत. वळखीच्या लोकात मन लागते.”
रमेशनं नोकरीसाठी आपल्या पासून दूरवर जाणं शेवंता मायला मानवलेलं नव्हतं.गावापासून पुण्याला जायला दीड दिवस लागतो हे कळल्यावर तिच्या मनाची घालमेल वाढली.आपलं वय होत चाललंय.आपणाला काही दुखलंखुपलं तर दोन्ही लेक जवळ असावेत असं तिला वाटायचं.नवरा दिवाळीत गेला.चांगला ठणठणीत गडी.पण ज्वर आल्याचं निमित्त झालं.दोन्ही पोरं आणि लेक जवळ.त्यांच्याजवळ मन मोकळं केलं.लेकरांना पाहात जीव सोडला.आपलंही तसंच व्हावं.जीव जाताना पोरं आपल्या जवळ असावेत असं शेवंता मायला वाटायचं.त्यामुळं रमेश आपल्या पासून खूप दूर चाललाय या जाणिवेनं ती आतून खचली होती.
राघोबानं खूप समजावून सांगितलं.
शिकलेली पोरं गावात राहत नसतात.शहरवस्तीतल्या सोयीसुविधा त्यांना खेड्यात कोठून मिळणार.त्यात बायको शिकलेली असल्यावर तर नाव नको.तिकडं चपराशी म्हणून काम करतील पण गावात राहणं नको वाटते त्याना.शेवंता मायनं मुक्यावनी सगळं ऐकून घेतलं. काय बोलणार ती तरी.
त्यात रमेश एकटाच पुण्याला गेला नव्हता.कमीजास्त शिकलेल्या दुस-या मुलांनीही पुण्याची वाट धरली होती.जे गेले ते तिकडंच रमले.कोणी कंत्राटदाराच्या हाताखाली काम करून तर कोणी टॅक्सी चालवून पोट भरायला लागले.पण एक गोष्ट खरी होती.रमेशनं आपल्या वाट्याची जमीन विकून गावाशी असलेली नाळ तोडून टाकली होती.बाकीचे गावातील घराच्या ओढीनं अधूनमधून गावाकडे येत होते.
राघोबाला या गोष्टीचा खूप राग होता.
रमेशनं जमीन विकल्यापासून तो पंगू झाला होता.सात एकर जमिनीत त्याची बैलजोडी मावत नव्हती.त्यानं विचार केला.बैलं विकून दोन दुभत्या म्हैशी घेतल्या.शेत राखत राखत धु-या-बांधावर म्हैशी चारू लागला.म्हैशीही दुधाच्या निघाल्या.चरवी चरवी दूध देऊ लागल्या. गावातल्या दूध डेअरीला दूध जाऊ लागलं.हातात पैसे खेळू लागले.ध्यानीमनी नसताना राघोबाचं गणित छान जुळून आलं होतं.हे खरं असलं तरी राघोबाच्या मनातला राग काही शांत होत नव्हता.
रमेश जमीन विकून गेला तेव्हा केवढा मोठा धुला केला होता त्यानं!शेवंता मायला नको नको ते बोलला होता.
“माय,रमेशचा दोष नाही. तुम्ही लोकांनी शेफारून ठेवलंय त्याला.बापानं लेक शाळा-कॉलेजात जातो म्हणून टेच दाखवली.त्याच्या शिक्षणासाठी पैसा वतला.”
“लेकरा तुला कोणं अडवलं व्हतं माय.तुव्ह चित नव्हतं अभ्यासात..शाळा सोडून तू हिंडत राह्यलास थडीव्हळानं.तो तुव्हा भाऊच हाय.तो शिकला म्हणून उजेडलं त्याचं..त्याला दोष देऊन काय फायदा आता.”
शेवंता माय नरमाईनं बोलली.
“तुव्ह बी खरंच हाय माय.आम्हाला नव्हती अक्कल.बोंबलत फिरलो नदाडावर.जाऊ दे. जुन्या गोष्टी उकरूध काय उपयोग आता.” राघोबा पडती घेतल्यावानी बोलला आणि पुन्हा एकदम चेव आल्यागत चित्कारला.”माय,झालं ते झालं.आम्ही हातापाय धरले.गळा खरडून समजावून सांगितलं.पण तुह्या पोरानं ऐकलं नाही.लई टेचीत आल्यावनी वागला.पाठचा भाऊ म्हणून आम्ही सहन केलं.आता यापुढं त्याचं तोंड आम्ही पाहणार नाही अन् आमचं तोंड त्यानं पाहू नाही.” राघोबाचा संताप शेवंता माय ओळखून होती.एरवी त्याला राग येत नसे आणि आला तर आवरणं मुस्कील होई.बापाशी बोलताना कधी कधी असं घडायचं.अशा वेळी त्याला ठिस्कारण्यापेक्षा शांत बसणं चांगलं.हे अनुभवावरून शेवंता माय जाणून होती.त्यामुळं राघोबा मनातली खदखद व्यक्त करताना ती एका शब्दानंही बोलली नाही.
रमेश गाव सोडून गेला त्याला दोन वर्ष उलटून गेली.एक दोनदा रमेशनं भावाशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला.पण राघोबानं तुटक बोलून त्याचं संभाषण मोडून टाकलं.”मायची तब्येत कशी आहे.” असं विचारल्यावर “तिलाच फोन करून विचार”असं उलटं उत्तर दिलं.
भावाचा राग मावळला नाही हे रमेशच्या लक्षात आलं.पुन्हा कधी त्यानं फोन केला नाही.एकदा दावलू नानाच्या पोराजवळ निरोप दिला होता.बापाची तब्येत ठीक नाही म्हणून तो भेटायला आला होता.शेवंता मायला कळल्याबरोबर ती धावत पळत दावलू नानांच्या घरी गेली.नानाचा मुलगा अवधूत घरीच होता.पुण्याहून कधी आला वगैरे जुजबी स्वरुपाचं बोलून झाल्यावर शेवंता मायनं रमेशची ख्यालीखुशाली विचारली.”काकू तुला राग येऊ दे.मला वाईट म्हण की काहीही म्हण.पण तुमची चूक दिसते मला.रमेशला मुलगा झाला.त्याचं तुम्हा लोकांना काहीच कसं वाटत नाही.चुलत्यानं,आजीनं भेटून यायला पाहिजे की नाही.रमेश आणि मी एकाच गल्लीत राहतो.रोज भेट होते आमची.एक दिवस जात नाही त्याचा.तुझी आठवण काढल्याशिवाय.तो तुमची आठवण काढतो आणि इकडं तुम्ही बिनघोर.”
शेवंता मायला काय बोलावे ते कळेना.हतबल झाल्यागत तिनं डोळ्यात दाटून आलेलं पाणी पदरानं टिपलं.
“अवधूत,अरे बाबा किती दिवसांनी तुह्या काकू आल्या.चहापाणी करतूस का उगं आपल्या गप्पा मारतूस.” दावलू नाना लोडाला टेकून बसत विषयांतर करीत बोलले.शेवंता मायच्या दु:खाची जागा त्यांच्या लक्षात आली.अवधूतचं बोलणं त्यांच्या जिव्हारी लागल्याचं जाणवलं.
रमेशवर त्यांचा खूप जीव आहे हे ते जाणून होते.
रमेश पुण्याला जाताना नानांनी त्याला घरी बोलावून चार गोष्टी समजावून सांगितल्या होत्या.राघोबा शिकलेला नाही.त्यानं कधी बाहेरचा मुलूख पाहिला नाही.जग कोठं चाललं याची त्याला खबरबात नाही.रानात काम करणारा गडी.दूरचा विचार करायला शहाणपण लागते.ते त्याच्याकडं कोठून येणार.नाना काहीबाही बोलत राहिले.रमेशनं त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं.तेव्हापासून रमेश हा खूप दमदार मुलगा आहे असं नानांना वाटू लागलं.
“भाबी तुम्ही मनाला लावून घेऊ नका.राघोबाच्या मनात आल्याशिवाय तुम्ही पुण्याला जाणार कशा?रमेश तिकडं खुशाल हाय नं.त्याला नोकरी हाय.त्याची बायको पण मास्तरीन हाय म्हणतेत.सगळा आनंद हाय.जाता येईल की पुढं मागं भेटायला.कमी जास्तीला अवधूत हायच की!तुमचं घर का लांब थोडंच हाय आम्हाला?”
दावलू नानाच्या बोलण्यानं शेवंता मायच्या मनावरचा ताण काहीसा कमी झाला.कितीतरी वेळ अवधूतशी त्या बोलत बसल्या.
चार दोन महिने उलटले असतील या घटनेला.जो तो आपल्या कामात गुंतलेला होता.शेतातला हरभरा काढायला आला होता.राघोबा त्याच तयारीत होता.तर मध्येच हे संकट आलं.कोरोना नावाची महामारी आली म्हणून सरकारनं घराबाहेर पडू नका असे आदेश काढले.पहिल्या पहिल्यानं लोकांनी हे हलक्यातच घेतलं.पण पटापट माणसं मरू लागली.रोग एकाचा दुस-याला होऊ लागला.त्याला अटकाव करण्यासाठी सरकारनं वाहतूक बंद केली.लोकांनी आपापल्या घरात बसून राहावे म्हणून कडक फतवा काढला.दणकट नियम लावले.सुरुवातीला लोकांना काही वाटलं नाही.सगळं सहन केलं.जवळचा दाणादुणा संपू लागला तसतशी लोकांची घुसमट वाढली.सरकारला अंदाज येईना.महामारी किती दिवसांची सोयरीन आहे ते कळेना.कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढू लागली.अंगात ताप आणि कोरडा खोकला ही लक्षणं दिसली की १०८ नंबरची गाडी दारात येऊन थांबू लागली.मोठ्या शहरांना या महामारीनं चहुबाजूंनी घेरलं.मुंबईच्या बरोबरीनं पुण्याला वेढलं.
कोरोनाच्या बातम्या खेड्यापाड्यात पोचायला वेळ लागला नाही.घरोघरच्या टीव्हीतून कोरोनाचा कहर दिसू लागला.बंद मुळे व्यापार,उद्योग थांबले.कारखान्यांची चाकं बंद झाली.भोंग्यातून निघणा-या धूरांचे लोट आटले.उदरनिर्वाहासाठी शहरात गेलेले लोक जमेल त्या मार्गाने गावाकडे परंतू लागले.वाहतुकीची सगळी साधनं बंद.रस्त्यावर पोलिसांचा पहारा.हाताला काम नाही.पोटात अन्न नाही.लाखो लोकांच्या संयमाची जणू परीक्षा.त्यांच्या कथा,व्यथा टीव्हीच्या पडद्यावर झळकू लागल्या.
शेवंता माय खूप काळजीत होती.रमेशची काय खबरबात आहे कळायला मार्ग नव्हता.राघोबा त्याचा फोन घेत नव्हता.पहिल्यांदा घेतला तेव्हा तुटक बोलून बंद केला.त्यानंतर एकदोनदा आला होता.पण राघोबानं उचलला नाही.त्याच्या मुलाकडून जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा इतके दिवस गप्प बसलेल्या शेवंता मायचा संयम सुटला.शेतातून घरी आल्या आल्या राघोबावर तुटून पडली.”हे बघ राघू इतके दिवस मी तुला काही बोलले नाही.आता मातर पाणी गळ्यापसोर आलं.कामून वागायला तू असा.रमेश आठ पंधरा दिवस गावाकडं येतो म्हणतो तर कामून अडवायला रस्ता.”
“माय उगी असं काहीही बोलू नकोस.मी काहाला अडवू त्याचा रस्ता.तो त्याच्या मनाचा मुखत्यार हाय.इथून जाताना थोडाच मला रस्ता विचारून गेला.”
राघोबा तिरसटपणे बोलला.तशी शेवंता माय अधिकच उखडली.
“तुला इच्यारून जायाला तो काय बांधला व्हता का?बापानं तुह्या वाट्याला झुकतं माप टाकलं.तू शिकला नाहीस म्हणून समदं घर तुह्या हवाली केलं.लेकरू एका शब्दानं बोललं नाही.आपलाच भाऊ हाय.त्याचं घर काय, आपलं काय एकच की.या न्यायानं वागला.तू मातर सगळं इसरून..”
“माय मी काहीच इसरलो नाही.सगळं ध्यानात ठेवून हाय.येळ आल्यावर सांगीन.उगं असं वडाचं पिंपळाला लावू नको.”राघोबा मायचं बोलणं खोडून काढत बोलला.
“राघू लेकरा मागं झालं ते झालं.इसरून जा.मी माय म्हणून तुह्यापुढं पदर पसरते.रमेश तुव्हा भाऊ हाय.त्याच्या म्होरं संकट हाय.कामधंदा नाही.परमुलखात अडकून पडला.त्याचं लेकरू लहान हाय.महामारीनं समद्या जगाला जेरीला आणलंय.चार दिवस गावाकडं येतो म्हणायला तर येऊ दे ना.एवढा का जड झाला भाऊ तुला.”
शेवंता माय डोळ्यातलं पाणी पदरानं पुसत बोलत होती.
राघोबा मात्र तसूभरही हलायला तयार नव्हता.उलट तिरीमिरीत बोलल्या सारखा म्हणाला,”माय गाव सोडताना करायला पाहिजे होता सगळा इच्यार.त्या दावलू नानाच्या पोरासंगं गेला पुण्याला.जाऊन इच्यार की अवधूतला काय चाललं तिकडं म्हणून.कालच आला तो गावात.शाळंत बि-हाड थाटलं.पंधरा दिवस तेथंच राहावं लागणार हाय चिलटं मारत बायको-लेकरासंगं त्याला.”
अवधूत गावात आल्याचं कळाल्यावर शेवंता मायला बरं वाटलं.त्याला जाऊन भेटावं अन् रमेशची ख्यालीखुशाली विचारून घ्यावी या विचारानं ती सुखावली.आता राघोबाशी बोलून च-हाट वळण्यात मतलब नाही या विचारापाशी येऊन थांबली.तिचा तो ही विचार राघोबानं विस्कटून टाकला.
“हे बघ माय.गावात सरपंचानं दवंडी दिली.शाळंत थांबलेल्या लोकांना कोणीही भेटायचं नाही.शहरातून आलेल्या लोकांकडून महामारीचा फैलाव होऊ शकतो म्हणून सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे.आपल्या घरात दोन लेकरं हात.मही बायको हाय.तुव्हं वय झालं.जाशील पोराच्या पुळक्यानं अवधूतला भेटायला शाळंत.”
राघोबा बोलत होता. ते सारं शेवंता मायच्या कानावरून गेलं.ती आपल्याच विचारात गढून गेली.
या घटनेला आठ-दहा दिवस झाले असतील.दरम्यान शेवंता मायनं एकदाही रमेशचा विचार घरात काढला नाही.राघोबा घरात नसल्याची संधी साधून नर्मदा मात्र रमेश,त्याची बायको आणि लेकराचा विषय काढत असे.नवरा आपलं ऐकून घेत नाही याची खंत व्यक्त करीत असे.तिचा भाऊ पंधरा दिवस येऊन राहिला.याचा दाखला देऊनही राघोबाचा राग पातळ होत नव्हता.”मरणा अगूदर एकदा नातवाला पाहावं वाटायलं ये माय. दुसरं काही नाही.”सासूच्या मनातली कालवाकालव नर्मदाच्या लक्षात येत होती.पण ती काही करू शकत नव्हती.सासू- सून इलाज खुतल्यावनी बोलत राहायच्या.राघोबा घरात असला म्हणजे वातावरण उग्र व्हायचं.त्याचा दहावीत गेलेला मुलगा बैठकीत पुस्तक घेऊन बसलेला तर धाकटा टीव्ही वरच्या मालिकेत रमलेला.हे चित्र नित्याचंच झालेलं.
त्या दिवशी अर्ध्या रात्री शेवंता मायला अचानक हुडहुडी भरली.अंगात सरसरून ताप आला.राघोबानं पाराकडच्या गुदाल डॉक्टरला बोलावून घेतलं.रोजच्या संबंधातला म्हणून तो आला.त्यानं शेवंता मायला तपासलं.लक्षणं काही ठीक दिसत नाहीत म्हणून त्यानं राघोबाच्या कानात काहीतरी सांगितलं.भल्या पहाटेच १०८ नंबरची गाडी दारात आली.नको नको म्हणत असताना शेवंता मायला गाडीत घातलं.पाठीमागून सरपंचाच्या मोटारसायकलवर राघोबा हिंगोलीला गेला.
हिंगोलीत सगळीकडे सामसूम.सरकारी दवाखाना तेवढा चालू.तिथलं वातावरण ओरबडलेलं.डॉक्टरांचं शरीर किट्सनं झाकलेलं.कोणता डॉक्टर कोण आहे कळत नव्हतं.आजूबाजूला तोंडाला मास्क बांधलेले लोक.पेशंटला अॅडमिट करूंन घेण्यासाठी ताटकळत उभे.एकमेकांपासून अंतर राखून उभे राहण्याच्या भोंग्यावरून सारख्या सूचना दिल्या जात होत्या.कोणी कोणाशी बोलत नव्हतं.पोलीसांच्या गाड्या गरगरत होत्या.मध्येच सायरन वाजवत एकशे आठ नंबरची गाडी पेशंटला आणून टाकत होती.राघोबा हे सगळं पाहून भांबावून गेला.
सरपंचाच्या ओळखीनं काम झालं.त्याचा चुलत मेव्हणा दवाखान्यात डॉक्टर होता.त्यानं शेवंता मायला दवाखान्यात अॅडमिट केलं.रिपोर्ट यायला दोन दिवस लागतील.काळजी करू नका.रिपोर्ट आल्यावर कळवतो म्हणून सांगितलं.राघोबा सरपंचासोबत गावी परत आला.शेवंता मायला दवाखान्यात दाखल केलं ही बातमी वा-यासारखी गावभर पसरली.लोक काहीबाही चर्चा करू लागले.कोरोना झाला की काय म्हणून तर्कवितर्क लढवू लागले.
राघोबा आणि त्याची बायको चिंतेत पडले.मुलगा मोबाईलवरची माहिती देऊन त्यांच्या चिंतेत भर घालू लागला.राघोबाचं एक मन म्हणत होतं रमेशला कळवलं पाहिजे.त्याची सुध्दा माय आहे.लगेच दुसरं मन झिंजाडा देत होतं.अखेरचं मोबाईलचं संभाषण आठव म्हणून सांगत होतं.’यापुढं कोणी मेलं तरी तुला फोन करणार नाही.’ हे तूच बोललेलं इतक्या लवकर विसरलास का म्हणून तासत होतं.राघोबाला काय करावं कळेनासं झालं.त्यातच रात्री उशिरा शेवंता मायला कोरोना पॉझिटिव्ह आल्याची खबर घेऊन सरपंच आला.शेजारीपाजारी गोळा झाले.कुजबूज सुरू झाली.लोक कोरोनाच्या भितीनं दूरूनच बोलू लागले.’म्हातारी या महामारीत टिकंल की नाही सांगता येत नाही.’सरपंच डॉक्टरचा हवाला देत बोलला.’्”मव्हा सासरा नाही का आडवा झाला अन् चार दिवसात गेला.लै डेंजर बिमारी हाय ही.”काळूराम भोईट्या मध्येच बोलला.तसा राघोबाच्या अंगावर काटा आला.भितीनं तो ताठरल्यासारखा झाला.”तसं काही नाही.चांगले तरणेताठ बी चालले की राव.रोज टीव्ही वर दाखवायलेत.”कुरप्या भरत माहितगारासारखा म्हणाला.जो तो आपापल्या बुध्दीनं रेंगू लागला.”राघो तू काळजी करू नकोस.आपला पाव्हणा लै चांगला माणूस हाय.तो घेईल भाबीची काळजी.तसा बोलला पण.आता पहिल्या सारखं दवाखान्यात जाऊन बसता येत नाही.या महामारीनं सगळा इस्कोट केला.कमी जादा झालं तर मी हाय की संगतीला.तुव्हं घर आता काही दिवस गावापासून तोडावं लागंल एवढंच.आरोग्य केंद्राचे लोक येतील घरी.त्यांना तपासू दे अन् इच्यारतील ती माहिती दे.’
राघोबानं काहीही न बोलता मान हलवली.
एखाद्या हप्त्यात शेवंता माय नीट होईल या आशेनं सगळे बसले होते.शेवंता माय दवाखान्यात गेली तेव्हापासून राघोबाचं मन कशातच लागत नव्हतं.त्याची अन्नावरची वासना साफ उडाली होती.कसे तरी नाईलाजानं चार घास पोटात ढकलत होता.मायला भेटायला जावं म्हटलं तर त्यालाही मनाई होती.दवाखान्यात कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता. बाहेरून काही दवापाणी लागलं तर सरपंचाच्या पाव्हण्यानं ती जबाबदारी उचलायचं कबूल केलं होतं.त्यामुळे राघोबाचा तेवढाच ताण कमी झाला होता.
राघोबाचं घर गावाच्या कडेला होतं ते बरंच झालं.त्याच्या घरासमोरचा रस्ता लाकडं लाऊन
बंद केला होता.महामारीच्या दहशतीनं गावातले लोक घाबरले होते.कोरोना राघोबाच्या घरात शिरला याचीच चर्चा जागोजाग होत होती.राघोबाच्या घरातील कोणीही गावात फिरायचं नाही.असं ग्रामसेवक बजावून गेला होता.उमरीवून भेटायला नव-यासोबत बहिण आली.तिला दहा दिवस शाळेत ठेवलं.मायचं तोंड सुध्दा पाहता आलं नाही म्हणून ती फणफण करू लागली.राघोबालाच बोल लावू लागली.
राघोबाला काय करावं कळत नव्हतं.सगळे अवयव बधीर झाल्यासारखे त्याला वाटत होते.नर्मदानं दोन तीनदा सांगून पाहिलं.”रमेश भावजीला निरोप करा. सासूबाई बिमार हात ते कळवा.येतील ते त्यायच्या सोयीनं.”राघोबानं प्रत्येक वेळी ऐकून न ऐकल्यासारखं केलं.त्याच्या मुलानं हाच विषय काढला तेव्हा ‘माय नीट होऊन घरी आल्यावर बघू काय करायचं ते’ एवढंच बोलला.शेवंता माय आजारातून बरी होऊन घरी येईल अशी त्याला आशा होती.पण ती व्यर्थ ठरली.चौथ्या दिवशी पहाटेच माय गेल्याची बातमी कानावर आदळली अन् राघोबाच्या घरात आकांत उडाला.तोंडाला रुमाल लावून राघोबा ओक्साबोक्शी रडू लागला.
कोरोना पेशंट म्हणून कोणालाही अंत्ययात्रेला जाता आले नाही.सरपंच आणि भावकीतले चार दोन लोक जीपमध्ये जाऊन आले.लांबवरूनच मायचं पॉलिथिनच्या पिशवीत कोंबलेलं प्रेत पाहिलं.तिथूनच हात जोडले आणि अखेरचा निरोप घेतला.नगरपालिकेच्या लोकांनी शासकीय नियमानुसार प्रेताची विल्हेवाट लावली.
शेवंता माय गेली आणि गावात चर्चा सुरू झाली.राघोबानं रमेशला माय आजारी असल्याचं कळवलं नाही.दोघा भावात जमीन विकल्यावरून खटके उडाले होते.रमेशचं चूक की बरोबर ते काही असो.पण मरण्यापूर्वी मायचं तोंड त्याला पाहता आलं नाही.याची खंत प्रत्येकजण व्यक्त करीत होता.राघोबाला या विषयावर एक दोघांनी हटकलं.कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडं नव्हतं.
शेवंता माय गेली तेव्हापासून तो वेड्यासारखा वागत होता.स्वत:वरच चिडत होता.मायला कोरोना कसा झाला असेल या विचारानं तासन् तास बांधावर बसून राहात होता.मनातल्या विचारांची कवंडळ थांबत नव्हती.
आज दुपारी बारवंजवळ अवधूत अचानक भेटला आणि सा-या गोष्टींचा उलगडा झाला.
अवधूत शाळेत क्वारंटाईन असताना शेवंता माय दोन तीनदा भेटायला गेली होती.अवधूतनं जे सांगितलं ते ऐकून राघोबा आरपार फाटत गेला.शेवंता काकू रमेशच्या काळजीनं धास्तावली होती.मुलगा शहरवस्तीत अडकून पडला.त्याला त्याच्या हक्काचं गाव उरलं नाही.कुठं आहे माहित नाही.फोन लागत नाही.बायको अन् लेकराला घेऊन कोठं गेला असंल.त्याच्या लेकराला पाहावं वाटायलं.राघोबाला दहादा विनवलं पण त्याच्या काळजाला पाझर फुटला नाही.जागेवरच अडून बसला.त्याचा राग शांत झाला नाही.
राघोबाला कोणी समजावून सांगायचं म्हणून इलाज खुतल्यावाणी रडली.वेड्यासारखं कपाळावर हात मारून घेतले.रमेशची एकदा भेट झाली अन् त्याच्या लेकराला पाहिलं की आपण मरायला मोकळं झालो.असं काहीबाही बोलली.
अवधूत किती तरी वेळ बोलला.
काकूला आम्ही कोरोंटाईन आहोत.भेटायला येऊ नको म्हणून दहादा सांगितलं तरी ती आलीच.रमेशबद्दल कोणाजवळ बोलू.कोणाजवळ काळीज मोकळं करू म्हणत रडली.दत्ता गावंड्याचा सासरा पलिकडच्याच शाळेत होता.त्याला भेटून आली.तो कोरोनाबाधीत निघाला.संकट कोणत्या वाटेनं येईल सांगता येत नाही. तिला येऊ नको म्हणायला आमची जीभ रेटली नाही.काही म्हण राघोबा दादा तू चुकलासच.रमेशला गावाकडं येऊ दिलं असतं तर हे रामायण घडलं नसतं.त्यानं काय तुह्या घरावर ताबा केला नसता.वातावरण निवळलं की गेला असता निघून.आता आला की नाही आयुष्यभर तुझ्यावरच ठपका.माय मेली पण रमेशला कळवलं नाही म्हणून बोलतील की नाही लोक तुला.”अवधूत शहाण्या माणसासारखं सगळं उजडून सांगत होता आणि राघोबा कळसूत्री बाहुलीसारखा मान हलवत होता.
अवधूतची भेट झाल्यापासून राघोबा अस्वस्थ होता.आपण फार मोठी चूक केली.रमेश आला असता तर मायच्या मनावरचं ओझं उतरलं असतं.ती घराबाहेर पडली नसती.पुढचं आरिष्ट टळलं असतं.
खाटेवर लवंडलेला राघोबा मांजरीच्या कवंडळीनं एकदम दचकून उठला.दाराआडची काठी घेऊन किंचाळणा-या मांजरीला पिटाळण्यासाठी बाहेर आला.

जगदीश कदम

कथा

लेखक डॉ. जगदीश कदम

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment