2020 एप्रिल

मतकरींचा काव्यविषयक दृष्टिकोन : साळेगावकर

सा हि त्या क्ष र 

रत्नाकर मतकरी मनोगत व्यक्त करताना

..नाटककार रत्नाकर मतकरी यांचा काव्यविषयक दृष्टीकोन..।।

“किती व्होल्टेजशी आपण खेळतोय हे कवीच्या लक्षात असलं पाहिजे.”
..रत्नाकर मतकरी

..आज जवळपास २८ वर्षापुर्वी चा आशा केंद्र पुणतांब्या येथील तो रविवार चल चित्रपटागत समोर गेला.माझा पहिला कविता संग्रह “वादळ ” चे प्रकाशन मा.रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते झाले ,अध्यक्ष स्थानी साक्षेपी समिक्षक र.बा.मंचरकर होते.
माझे गुरु प्रा.शाम पाठक ,तसेच भास्कर लगड ,कवी ना.भा .रोकडे ,बाबासाहेब सौदागर ,सतिश मेहता , भा.य.वाघमारे ,वि.र.कुलकर्णी ,पद्माकर खडकीकर,राशीनकर ,अजित मुरीकन ही सारी मंडळी उपस्थित होती.

या संपुर्ण संमारंभाची एक ध्वनीफीत तयार झाली.जुन्या टेपरेकॉर्डर ची एक कँसेट म्हणायची.त्यावरुन आशाकेंद्राने संपुर्ण कार्यक्रम चा त्यावेळी टंकलिखीत अहवाल तयार झाला.त्याची जिर्ण होत चाललेली प्रत पुन्हा हाती घेतली .रत्नाकर मतकरी सरांनी जगाचा निरोप घेतला.मतकरीं सारखे कथा ,कादंबरी ,नाटकावर हुकुमत असलेल्या सिद्ध हस्त लेखकानी समग्र काव्य प्रांता विषयी केलेले चिंतन प्रचंड लक्षवेधी आहे.
माझ्या वादळ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात मतकरी सर जे बोलले ते जशास तसे या लेखात मांडतो आहे.ते बोलले तेच..

1" मी तसा गद्य माणुस आहे.कवीच्या संमेलनात येवुन कवींना काही चार शब्द सांगावेत असं मला वाटतच नाही.तरी माझ्या क्षेत्रातुन या कवी साळेगावकर यांच्या वादळ कविता संग्रह प्रकाशन निमीत्ताने काही सांगु इच्छीतो.मी पहिल्या पासुन कधीच काव्या कडे वळलो नाही.काँलेज मध्ये मुलंमुली काव्य लेखनाने सुरूवात करतात पण मी मात्र पहिल्या पासुन एकांकिका याच फाँर्म मध्ये लिहायला लागलो,म्हणुन मी काव्यप्रांतापासुन दूर राहीलो.तशी नाटकाच्या निमीत्ताने मी शंभर एक गाणी लिहीली आहेत.तशी ती नाटकाची गरज अर्थात माझी गरज म्हणुन लिहीली आहेत.अरण्यक ,विठ्ठल रुखमाई ही नाटकं मी गद्य काव्य स्वरुपात लिहीली आहेत.त्यावेळी काव्याचा अभ्यासक नसतानाही मला काव्याविषयी काही विचार अपरिहार्य पणे करावे लागले.

नाटका साठी मुक्तछंदात्मक काव्याच माध्यम निवडुन संवादाला एक लय दिली.
माझ्या मनात विचार आला की ,” काव्याला गद्यापेक्षा एक वेगळं वजन असतं.काव्यातील शब्द गद्यातील शब्दापेक्षा अधिक मोठा ,अधिक व्यापक ,अधिक अर्थपूर्ण ,अधिक सर्व समावेशक ,असा असतो.
” काढ सखे तुझे चांदण्याचे हात ” असं म्हणल्यावर चांदण्याचे हात एवढ्या दोन शब्दावरुन ज्या अनेक प्रतिमा तयार करण्याच सामर्थ्य फक्त काव्यातच आहे.आपल्या डोळ्यासमोर सौंदर्य येते ,प्रणय येतो ,जीचे हात चांदण्याचे तीचे वय ही समोर येते.हे सगळं काव्यातल्या दोन शब्दांच सामर्थ्य आहे.
ऐरवी आपण अस़ नाही म्हणत .” तुझे चांदण्याचे हात बाजुला काढ ” कारण गद्य आणि पद्याच्या अर्थ समावेशनाची ताकद वेगळी आहे.
जेव्हा मी महाभारता सारखा विषय निवडला अरण्यक साठी तेव्हा मला असं वाटलं की ,यातील जी पात्र आहेत गांधारी ,कुंती ,विदुर ,धृतराष्ट्र ,हे जेव्हा बोलतील त्याचं प्रेक्षकांना त्या त्या पात्राच्या वजना विषयी ,प्रचंड असलेल्या पार्श्वभूमी विषयीच वजन त्यात आलं पाहीजे म्हणुन गद्या पेक्षा काव्यात्म शब्द निवडला पाहिजे असं मला वाटलं.
आपण पाहतो की ,मोठे संदेश देण्यासाठी काव्याचा उपयोग होतो.कुसुमाग्रज यांनी दिलेला..गर्जा जयजयकार क्रांतीचा ..हा संदेश मनाला भिडतो.”असंख्य लोकांना एकाच वेळी संदेश देण्याची ताकद फक्त काव्यात असते.”
आपल्याकडे बंकीमचंद्र चटर्जीच्या आनंदमठ कादंबरीमधील वंदेमातरम हे वीरश्रीयुक्त गाणं पारतंत्र्य च्या पार्श्वभूमीवर काही तरी उठा करा ..मातृभूमी साठी काही करा या अवाहन आणि आव्हानासाठी वापरलं गेलं.जे दहापाच व्याख्यानांनी। होणार नाही ते एका कवितेच्या दहापंधरा ओळीनंहोवु शकतं.ही आहे काव्याच्या आशयाची ताकद मित्र हो. कवीची ,कवितेची ताकद भिन्न असु शकते तथापि काव्य फाँर्मची ,या माध्यमाची जी ताकद आहे त्यातला प्रत्येक शब्द हा अनेक अर्थाचे लघुरूप घेवुन येतो.
सध्या अनेक कलामंच गाण्यातुन खड्याआवाजाने स्रीच्या वेदनेवर आवाज उठवतात तितक्या प्रभावीपणे पडद्यावरुन ते होईल असे मला वाटत नाही.
आपण शाहिरांच काम पाहिलय ,आण्णाभाऊ साठे ,अमर शेख यांना जागृती करणं का शक्य झालं तर त्यांच स्वतःच एक महात्म्य होतच ,त्यांचे गुण तर होतेच ,परंतू काव्य या विलक्षण माध्यमाची महत्वाची बाजु ही त्यांना माहित होती.
जी कवीनी लक्षात घ्यावी की ,कविता लिहीताना किती मोठी शक्ती आपल्या हाती आहे ,किती व्होल्टेजशी आपण खेळतो आहोत म्हणुनच या दृष्टीने कवींवर माझ्यापेक्षा जास्त जबाबदारी आहे .
कला ही कलावंताच्या व्यक्ती मत्वातुन येत असल्याने त्यानी स्वतःच व्यक्तीमत्व जबाबदारी ने घडवलं पाहीजे.व्यक्तीमत्व म्हणजे काय घडवायच तर जे आजुबाजुला घडतं त्याच्याशी आपण किती प्रामाणिक आहोत.?आपण केवळ शब्द मांडतो का ? आपण शब्द उसने घेवुन मांडतो का ? की ते शब्द आपल्या आतुन खरोखरच येतात ., ते येतात तर किती खोलातुन येतात ,आपल्या आत्म्याच्या किती जवळपास पोहचतात ?याचा विचार करायला हवा.अशा लेखनाला खरेपणा येईल ,सुत्र रुप येईल.
सुत्य रूप म्हणजे काय ?
आपण वेदात पाहतो की ,एक छोटासा मंत्र असतो ,त्यामागे प्रचंड शक्ती असते ,ते एक सुत्र असते.एका वाक्यानं असंख्य वाक्याचं काम होतं.
ऋषीमुनींनी वेदात सामर्थ्य ओतलं आहे ते तपश्चर्या चे ,म्हणुनच त्यांचा शाप खरा ठरणं ,अवाहन करताच पाउस पडणं हे कशातुन तर त्यांच्या व्यक्तीमत्वातुनच होते.
म्हणुन ध्यास घेणे गरजेचे आहे.
प्रत्येक कवीवर मोठी जबाबदारी आहे. शब्दांच्या फार प्रेमात पडुनये ,फार गुंतु नये .
व्यक्तीमत्वात भावना श्रेष्ट आणि शब्द दुय्यम असतात, शब्दा हे नाईलाजाने आपल्या हातुन प्रतिष्ठापित होत असतात.
एखादा माणुस काही लिहीणार नाही , तो कविता करणार नाही तरी तो कवी असेल ,कारण तो स्वतःला कवी सारखा तयार करत असेल.प्रत्यक्ष शब्दातुन त्याची कविता नाही बघायला मिळणार पण आतुन तो त्याचं व्यक्तीमत्व घडवत असेल.
उदाहरणच घ्यायचे तर मेधा पाटकरां सारखी स्त्री जीने एकही कविता लिहीण्याची गरज नाही ,त्या बाईंच आयुष्य च एक काव्य आहे.
तुम्ही जर सुंदर आयुष्य जगलात , ध्येयाचं आयुष्य जगलात ,ध्येयाचं ,आदर्श ,मुळातच मोठं ,मुळातच माणुसकीचं ,मुळातच सर्व समाजाला कवेत घेणारं ,असं जर तुमच स्वप्न असेल तर काव्य याहुन वेगळ नाहीच.काव्य हे या अशा जगणँयाचेच वेगवेगळे पैलु दाखवत जात.
प्र.के.अत्रेच्या स्वतःच्या कविता त्यांच्या कार्या पुढे दुय्यम भाग आहेत.त्यांनी स्वतःला तयार करुन विडंबन हा काव्य प्रांताचा भाग आहे कुणाला आवडो न आवडो परंतु ही रचना आहेना याला काव्य म्हणतात.यावरुन कविता हा सोपा भाग नाही.
एखाद्या लेखाला समाजशास्त्रीय बैठकीचा आधार व विश्लेषणाची गरज असते परंतु काव्यात समाजशास्त्रीय विवेचनाची गरज असताना तो बाजुला ठेवून त्यातली चटका लावणारी बाब वर आणली जाते.
वादळ या संग्रहात अशा कविताही आढळतात.
कारण खुप विचार करत बसलना तर कदाचित कवीची उर्मी थांबेल .हा पद्य लेखनाला धोका आहे.जास्त विचार करुन लिहायला लागले की ,उस्फुर्तता कमी होईल,त्यामुळेच चांगले गद्य लेखक हे कवी होवु शकले नाहीत.जसं ब-याच वेळा आपण म्हणतो चांगला दिग्दर्शक हा चांगला नट होवु शकत नाही.दिग्दर्शक हा हिशोब आणि विचार करतो नट मात्र उस्फुर्त पणे करून जातो. काव्याचंही हे असच आहे, पण ते काही वेळाच होतं असं मला वाटतं.
आपली उस्फुर्तता नष्ट न करता आपण जे म्हणतो आहोत ते त्या विषयाला पुर्ण न्याय देवून म्हणतोय नं ?व्यक्ती पुर्ण पणे जबाबदारी उचलुन म्हणतोय नं हे लक्षात घेतलं पाहीजे आणि या दृष्टीने त्या नंतरचा भावनाचा उद्रेक होईल तेच चांगलं काव्य होईल.संस्कृत मध्ये काव्याला रसात्मक वाक्य म्हणल्या जाते.कुठल्यातरी रसाचा परिपोष केला जातो.मी तर म्हणेल काव्य म्हणजे “भावनाम उद्रेकः” .
आता एक लक्षात येत आहे की ,कविता बदलत आहे.
नुसता शब्द व भावना गुळगुळीत न राहता सामाजिक भान जपल्या जाते आहे आजचे कवी तिकडे वळताना पाहतो आहे. साळेगावकर यांच्या कवितेच्या बाबतीत ही सामाजिक भान मांडणारी कविता असे म्हणता येइल.
एकदा माझ्या संस्थे मार्फत काव्यस्पर्धा घेतली होती.माझी कल्पना अशी होती की ,आजचा तरुण हा समाज व्यवस्थेबद्ल खुप असमाधानी आहे.आजच्या तरूणाला अनेक विषयावर काहीतरी वेगळ म्हणायचय ,वेगळं घडतय ,त्याचे आदर्श वेगळे आहेत ,स्वप्न वेगळी आहेत.
आधिच्या पिढीनं त्याला सतावलय तेव्हा हे मांडण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती.
महाराष्ट्र भरातील सर्व महाविद्यालयात कविता पाठवण्याचे अवाहन केले .आम्हाला प्रतिसाद ही भरपुर मिळाला.सातशे कविता आल्या.महानगरचा तरुण धडाडीचा ,असंतोषाच्या विचाराचा पत्रकार निखील वागळे ,सामाजिक विचारसरणीचे लेखक अरुण साधु ,प्राध्यापक कवी रमेश तेंडुलकर यांना परीक्षक म्हणुन घेतले होते.
या तिघांच्या मते सहासातशे कविता मधुन दहा कविता सुद्धा आतुन आलेल्या नाहीत.
मग नव्या पिढीच्या मनातला असंतोष गेला कुठे.?
प्रमाणिक संतापातुन आलेली कविता रंगमंचावर आणण्याचा विचार होता.वेस्टर्न कंट्रीज मधील पाँप म्युझिक मध्ये ,नाटकात असंतोष दिसतो.तरुणाच्या स्वतःच्या वैफल्यग्रस्त आयुष्याबद्दल तत्वज्ञान दिसतं, किंवा जे ब्लँक म्युझिक आहे त्यात काळ्या लोकावर जे आत्याचार झाले त्यातुन गाणी तयार झाली .आमच्याकडील हे वास्तव ,ही उस्फुर्तता कुठे गेली.?
तरुणाला खुप लिहीण्या सारखं आहे पण स्वतःला दबवुन ठेवतात.कशामुळे तर कदाचित त्यांना लवकर यशस्वी व्हायचय . असं वाटतं.
त्याना असं वाटत काआपणआता सुरेश भट ,महानोर यांच्यासारखी कविता लिहावी ? ते तरी अनुकरण छान यायला पाहिजे पण आज तेही होताना दिसत नाही.
स्पर्धेच्या निमीत्ताने दुसरं लक्षात आलं की ,तरूण पिढी धड शहरी ना धड ग्रामीण संस्कृतीत घुटमळतेय.
अप्रिय वर्तमान बदलण्याची धडपड कवीत असावी.तेव्हा ते या काळाचं काव्य आहे असं वाटले तरी चालेल.पण कुण्या श्रेष्ठ कवीचं नकोनकोस अनुकरुन करुन यशस्वी होणं चांगल नाही.
यश हे एकदाच असतं.ते ज्याच असतं ते त्याचच असतं, त्या माणसालाही स्वतःच्या यशाचं स्वतःला अनुकरण करण कठीण असतं.यश हे भरवशाचं नसतं.
भरवशाची कोणती गोष्ट आहे तर आपल्याला काय वाटतं ते प्रामाणिकपणे मांडणे ,स्वतःच व्यक्तीमत्व वाचन, लेखन, चिंतन, मनन यातुन घडवणं ,विशीष्ट विचारानं लिहीत जाणं यातुन ख-या काव्याची निर्मिती होईल ही माझी धारणाआहे.
भविष्यात साळेगावकर या माझ्या धारणेला विश्वासात बदलतील अशी आशा करतो.
या वादळ काव्यप्रकाशना निमीत्त काव्य माध्यमा विषयी मनातलं तुमच्या समोर बोललो.
वादळ विषयी दुसरे रत्नाकर विस्ताराने बोलतीलच मी मात्र कवीला शुभेच्छा देवुन थांबतो.

12८ वर्षापूर्वी रत्नाकर मतकरी सरांनी कवी ,कविता यांच्याकडुन केलेली अपेक्षा पुर्ण करण्याच्या द्यष्टीने एखादं पाउल टाकल्या जाणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment