2020 एप्रिल

इंधन :हिंदू- मुस्लिम वेदनांचा प्रवास

सा हि त्या क्ष र 
साधारणतः पन्नासच्या दशकात प्रकाशित झालेली हमीद दलवाई यांची 'इंधन' ही कादंबरी स्वातंत्र्यानंतरही जिवंत असलेल्या जातीयतेच्या म्हणजे हिंदू-मुस्लिम ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेदना, येणारी अस्वस्थता आणि माणसा-माणसांचा तुटत जाणारा संबंध, निर्माण होणारी संशयीवृत्ती या सर्व गोष्टी परखडपणे मांडते.   वर्षानुवर्षे चालत आलेल्या हिंदू-मुस्लिम लढ्यावर भाष्य करणारी मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी म्हणून 'इंधन'कडे पाहिले जाते.   मुळातच नायक मुस्लिम घरातील उभा केल्यामुळे कादंबरी वाचत असताना अनेक अंगाने विविध बाजू आपल्या समोर उभा राहत असतात. मुंबईतून विश्रांती घेण्यासाठी पंधरा वर्षातून गावी आलेला नायक आणि त्याला आलेले अनुभव कादंबरीत मांडलेले आहेत. गावात आल्यावर त्याच्या भावाला मारायला आलेले लोक आणि त्यावर परत केस करून बदला घेतलेला त्याचा भाऊ आणि हे प्रकरण शांत मिटावे म्हणून धडपडणारा नायक असे हे कथानक. पण प्रत्यक्षात कोणीही त्याच ऐकायला तयार नाही,म्हणून अस्वस्थ झालेला नायक. मग अशातच लक्ष्मी नावाच्या बाईवरून झालेला हिंदू आणि मुसलमानातील वाद. यामुळे गावाला आलेला बकालपणा आणि गावकऱ्यांची होणारी घालमेल या सर्व गोष्टी कादंबरीत मांडल्या आहेत.गावात काहीतरी तंटा झाला आणि शांतपणे ते सोडवायला गेलेला नायक आणि त्याच कोणीही न ऐकल्यामुळे आलेली अस्वस्थता कादंबरीत मांडलेली आहे.    वाद वाढत चालला की हिंदूंच्या पालखीवर बहिष्कार टाकणे, त्यांच्या पालखीची ओटी न भरणे किंवा हिंदूंनी मस्जिदीसमोर मोठ्याने ढोल वाजवणे असले धंदे सुरू झाले. म्हणजे सामाजिक एकोपा विस्कळीत होऊ लागला. नंतर सर्व काही ठीक झाल्यावर, गाव सोडून जाणारे लोक आणि गावकऱ्यांच्या मनात बसलेली भीती असे एकूण चित्रण कादंबरीत उभे केले आहे.    गावात आल्यावर नायकाला भेटणारे लोक आणि त्यांची गावाबद्दलची आपुलकी आणि प्रेम पाहून तो थक्क होतो. जस विनोबा भावे म्हणतात, "पुलामुळे शहरे आणि खेडी जोडली गेली. पण यामुळे खेडी भिकेला लागली आहेत. हे पुलंच तोडून टाकले पाहिजेत." अशी स्वछ आणि निर्मळ भावना असणारे लोक कसे एका छोट्या घटनेमुळे एकमेकांच्या जीवावर उठतात हे  या कादंबरीत दाखवलेलं आहे. मग हिंदू लोक मुस्लिम लोकांच्या दुकानला जात नसे व मुस्लिम हिंदूंच्या. ही एक पोकळी निर्माण होत चालली आहे. आणि ही पोकळी म्हणजे एकूणच आपल्या सामाजिक व्यवस्थेचा बकालपणा  आहे.  म्हणजे कसं झालंय, आजच्या समाजव्यवस्थेत आपल्याकडून नकळत अनेक गोष्टी घडत जातात. माणसे जनरुढीप्रमाणे बहुधा वाईटच वागत असतात. अनेकदा आपणहून आणि कधी इच्छेविरुद्ध त्यात ओढली जातो. मग मी कशाला त्राग करायचा?आणि किती? मग अशा समाज व्यवस्थेत अनेक पोकळ्या निर्माण होतात. छोट्या-छोट्या गोष्टींचं रूपांतर वाद, दंगली मध्ये होतं. हिंदू-मुस्लिम असो किंवा अमेरिकेमधील काळा-गोरा वाद असो. मग ह्या व्यवस्थेत काय होत जाणूनबुजून आपण एका समाजाचे हाल करत असतो. त्यांना कामावरून काढून टाकणे, अनेक ठिकाणी मुद्दाम डिवचणे किंवा धार्मिक भावनांचा उद्धार करणे. अशा गोष्टी वाढत जातात. पण मुळात बघायला गेलं की, या गोष्टी करणारे लोक खूप कमी आहेत आणि त्याचा त्रास पूर्ण समाजाला भोगावा लागतो. चूक भलतंच कोणीतरी करत आणि दंगलीमध्ये स्त्री, मुलांचे, म्हाताऱ्यांचे हाल होतात. म्हणजे करावे कोणी, भरावे कोणी. अशा व्यवस्थेत सामान्य जनतेचे हाल होतात. घरकोंडीपणा वाढतो, ज्या गावात कधी घराचे दरवाजे बंद नसतात तिथे लोक दार बंद करून एकमेकांना बोलणे टाळतात.   हिंदू-मुस्लिम ताणतणाव आपल्या देशात वर्षानुवर्षे अगदी परंपरेगत चालत आलेला आहे. प्रत्येक वादामध्ये पुरोगामी मुस्लिम विचारधारा हळूहळू नष्ट होत चालली. आपली हिंदुत्ववादी विचारधारणा पुढे येत राहिली. या वादामध्ये प्रत्येक वेळी नुकसान मुस्लिमांचेच झाले. त्यांना व त्यांच्या विचारांना समाजासमोर कधीच येऊन नाही दिले. त्यांचा समाज नेहमी दबावाखाली ठेवण्यात आला. ना त्यांना न्याय मिळाला ना त्यांना कधी संधी मिळाल्या. अगदी बोटावर मोजण्याइतकी लोक त्यांची वर आली. याचा अर्थ एकच झाला की त्यांचे विचार आपल्या समाजाला मान्य नाहीत आणि आपण कळत नकळतपणे त्यांना कधी वर येऊन दिले नाही. कळत असूनसुद्धा आपण त्या व्यवस्थेचे बळी होत गेलो. आपण आपल्याच माणसांचे विचार दाबण्यात अग्रेसर होत गेलो आणि इथेच आपण एकेक पाऊल अधोगतीकडे टाकत चाललो आहे.       हे वास्तवदर्शी चित्र या कादंबरीने उभे केले. ते चित्र आजपण आहे तसेच आहे. उलट त्यात अजून वाढ झाली आहे, आक्रमकता वाढली आहे. वाद कमी होण्याच्याऐवजी  दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 'इंधन'च्या रूपाने या वादावर प्रकाश टाकण्याचे काम हमीद दलवाई यांनी केले आहे.   खरंतर ही कादंबरी वाचकाला जिंकते कुठे तर, कादंबरींच्या कथानकामध्ये गावात देवीची पालखी चालली असते. संपूर्ण गावातून तिची यात्रा संपन्न होत असते. अचानक कोणतरी लोक येतात आणि स्त्रियांची विटंबना करतात. हे कोणी केले काहीच कळत नाही. ना ते लोक कोणाला माहीत असतेत ना कोणी त्यांना बोलवलं ते. मग यावेळी एक मुस्लिम लेखक म्हणून ते एक विधान करतात, 'जेंव्हा पोलीस येऊन कारवाई करतील तेंव्हा साक्ष देताना लोक म्हणतील की मुसलमान लोकांनी हे घडवून आणले असणार.' म्हणजे एक मुस्लिम असून अस विधान करणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण काय करतो हीच विचारधारणा वर्षानुवर्षं दाबत आलेलो आहोत. म्हणून आपल्या गंजलेल्या या विचारला बदलण्यासाठी ही कादंबरी खूप महत्त्वाची भूमिका निभावते

– प्रतीक महेंद्र कदम
B .E.(Mach. Final year)
Savitribai Phule Pune University, Pune.

प्रतीक कदम

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment