2020 एप्रिल

रुमणपेच :

सा हि त्या क्ष र 

ग्रामीण समाजाचे वास्तव मांडणाऱ्या कथा.

मागच्या दोन ते तीन दशकातील सामाजिक चालीरीती श्रध्दा आणि अंधश्रद्धा यात आडकलेल्या समाजातील खरं रूप मांडणाऱ्या वास्तव कथा. सामाजिक अर्थशास्त्राची बिघडलेली घडी, ग्रामीण कुटुंबांस सोसावे लागलेले हाल अपेष्टाचं विव्हळतं अन् दुखरं रुप म्हणजे प्रा.सु.द.घाटे यांचा रुमणपेच कथासंग्रह..

नव्या पिढीला जुन्या जगण्याचं कोडं पडावं येवढं भावनात्मक करणारं प्रश्नमय गुढ म्हणजेच रुमणपेच. नव्या पिढीस सामाजिक श्रध्दा व अंधश्रद्धा यांचे चिंतन करण्यास भाग पाडणाऱ्या व संशोधनाचा विषय बणाव्यात अशा सार्थ कथा.
वाट्यास आलेले प्रतिबिंब स्वरूप मांडणाऱ्या ह्या कथा भाबड्या समाजाचं भोळं रूप मांडताना ढोंग्यावर कटाक्ष टाकतात. जगण्यातल्या आडीअडचनिचे गुज करत, त्या अडचणीच्या संकटाचे निराकरण कसे करावे? त्यातील रुमणपेच कसे सोडवावेत हेच अनुभवाचे बखान सांगणाऱ्या ह्या कथा प्रत्येकास वैयक्तिक गुज करणाऱ्या वाटतात. जिनगानितले अडफाटे व वाटेवाटेवर पसरलेले सुळे काटे पायाचे सालताडं काढताना स्वतःचे अनुभव समजून कथाकार.. साळी, माळी, कोळी, राईंदर, साळिंदर, जोगूळ, तमासगिर, वासुदेव, पांगूळ , वासुदेव, वैदू, गोंधळी, वाघ्या गुराखी, पोतदार, मसनजोगी, अस्वल, पोपट, नंदीवाले, माकडवाले व सपेरे यांचे वास्तव व्यक्तीचित्र रंगवून यशस्वीतेने त्यात उतरताना दिसतो. जुन्या जगण्यातले नविन अन्वयार्थ सांगत लोककला व बाराबलुतेदार यांच्या प्रतिभेच्या सुसूत्रबध्द संदर्भ सुची वाटाव्यात असा ज्ञानकोश कथासंग्रह…
उठाठेविचे अंधश्रद्धाळू कारस्थाने करत असताना घरात गरिबी कधी हळूवार पावलाने फिरत असते. लेकरांच्या शिक्षणाची अधोगती व संकटाच्या गाठी जीवनाशी कशा बांधल्या गेल्या? हे ही कळत नाही. जगण्यातील मरणछाया मांडणाऱ्या कथा वाचकाच्या मनाला आतून उमाळे फोडाव्यात अशा आहेत.कामसू वृत्ती, करारीपणा,
श्रध्दाळूपणा, भोळसरपणा,देवाणघेवाणीतले इमानदार, कलेची पारंगतता बाळगणारे, नवस सायास फेडणारे असे बलस्थान असलेले कथानायक! प्रत्येक कथेत नैतिकता व इमानदारीला जागणारे मानवी दैवतं वाटावेत इतके निर्मळ आणि प्रवाही आहेत.

जोगूळ ही कथा लवकर लेकरं न झाल्याने, पहिलं अपत्य देवीला सोडण्याच्या नवसाची कथा . पहिल्या मुलगी मोठी झाली देवाला बोललेला नवस. जोगळीनिचं झाडासोबत लग्न लावून व तिला देवाच्या हवाली केलं जात. जोगूळ झालेल्या मुलीच्या मनाच्या अवस्थेचा कोन्ही ही विचार न करता. त्या मुलीचं मनातून कोलमडणं व देवाच्या हवालीचं व समाजाच्या कचाट्यातलं जगनं. त्या मनाची अवस्था  मांडण्यात आलेलं हे अंधश्रद्धेचे उच्च कोटीचे रूप व्यक्त करणारी कथा. अशाच समाजातील जोगिन बनलेल्या असंख्य स्त्रीयांच्या कुचंबलेपणाची व्यथा व त्यांचा  नवर्‍याव्यतिरिक्त संसाराच्या रूमणपेचाची न सुटणारी रूमणगाठ...!       कथासंग्रहाचे 'रूमणपेच' हे नाव असलेली मुख्य कथा. ही कथा अंधश्रद्धेचा काक दृष्टिकोन मांडणारी अंध व्यथा . चांगली सुगी पिकल्यामुळे कथेच्या नायिकेच्या मायचे गुत्ते व बाबाच्या गुरेढोरे व दुध दुपतं यातील मुबलकता . या कथेतील नायिकेच्या बापानं कावळयाची लागण बघीतली. ते बघणं अपशकुन समजून . ते अपशकुन दूर करण्यासाठी लागण बघणारा मेला असे जाहिर करण्याची प्रथा . त्यामुळे जवळचे नातेवाईक रडत पडत नायिकेच्या घरी येतात.त्यांना जोड आहेर घेतल्यामुळे सारं जमा झालेली भर सुगीतील जमापूंजी एका खपक्यात निघून जाते. कावळ्याने मारलेला रुमनपेच हा अंधश्रध्देचा कळस बनून या कथेत व्यक्त होतो. अन् जिवंतपणी मरणार्या माय बापाच्या जवळ पून्हा कावळा ही फिरकत नाही. गरिबीनं मेल्यानंतर कावळा त्यांचं पिंड खाण्यास निश्चितच येतो अशी गर्भीत विदारकता मांडणारी व विदारकता सांगणारी कथा वाटते.      कथाकार त्याच्या मायसोबत धुने टाकायला जातो. देशमुखीन बाईचा चहा पिल्यानंतर स्वतःचा कप स्वतः धुण्याचे बोचरे वास्तव अनुभवास येतं. त्यामुळे कथाकारांच्या भावना दुखावल्या जातात, भावनेचे तुकडे तुकडे होऊन मनाला नेहमी टोचत राहातात . आपण शिकले पाहिजे ही मायची  शिकवन लेखकाच्या मनात मोठं होण्याचे घर करते. शहरात शिकताना एका मैत्रिणीच्या घरी चहा पिऊन झाल्यावर कप धुवायची वेळ आली नाही, त्यामुळे कथाकारांस वाटते लहानपणी झालेले भावनेचे तुकडे कोन्ही तरी जोडून दिले. एका पिढीतले हे बदलते अंतर दिसून येते . बदलत्या समाजाचे शुभ वास्तव मांडणारी भाव कथा.

‘ पाणवठा’ या कथेतून पाण्यासाठी पेटलेले नंदनवन ह्या गावाची रण कथा नव्हे रक्त कथा . पाटलांच्या मर्जीने मरनांक नावाच्या मातंगाने एक आड खोदून घेतो. पण त्याच्याच पिढ्या त्या आडास पाणी पिण्यास व भरण्यास परक्या होतात.. त्यांना कोन्ही पाणी भरू न दिल्यामुळे, सुवर्ण आणि महार यांचे वर्चस्व असलेल्या दोन्ही आडावर ही मंडळी काठ्याकुर्हाडी घेऊन सकाळी सकाळी पाणी भरू लागलते. ही बातमी गावभर पसरून तुंबळ हाणामारी होते . बातमी पेपरात अन् अमदार व जिल्हाधिकारी गावात येतात. कायद्याची बाजू व चौकटी सांगून सर्व आडं सर्वासाठी खुले करतात . युगायुगापासूनची विषमतेची दुरी मोडीत निघते. अन् पाणि सर्वांचे व सर्वासाठी चवदार बनते कायदेशिर विषमता दूर होऊन.
‘जळती गोधडी’ आदिवासींच्या दुःखरं
मांडणारी कथा.मरनागीचं रूप घेऊन तांडा खंगला जातो . जंगलावर हक्क सांगणार्‍या अदिवाश्यांचा पर्यावरण दिन मोहाच्या झाडाखाली बसून साजरा होतो . पुढे सुरू झालेल्या पावसामुळे तांड्यात झालेली गॅस्ट्रोची लागण, त्यातून जवळची एक एक माणसे दगावत जातानाची शोककळा सांगणारी मरण कथा . नागादादाची लाडाची यल्ली गॅस्ट्रोत दगावली. यल्ली व तिच्यासोबत मरण धरणारी गोधडी जळताना बापाच्या कोडकौतुकास उमाळे देत आतून जाळत होती.

बाप नसलेली अर्चना वर्गात हुशार, गायनात मधूर व सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वात पुढे अशा गुणी मुलीच्या अकाली अंताची भावक कथा ही साने गुरुजीच्या एका वाचनाची आठवन करून देते, 'जे सर्वांना आवडे ते देवांना आवडे या अर्थाचे' रक्तशिल्प' कथानक मनाला हेलावून सोडतं       बारा बलुतेदार, अठरापगड जाती, फिरस्तीचा बारीकसारीक धद्दा पाणि करणारे कुटुंब, कुणबिक या सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व त्यांच्या दुःखद जगण्याच्या व्यथा मांडणाऱ्या एकतीस भावस्पर्शी व सामाजिक अडचणीचे आंतर्मन मांडणाऱ्या ह्या सर्व कथा बोध कथेच्या 'रुमणपेचात' व्यक्त होतात . सर्व लहान थोर मंडळी कथासंग्रह हातात पडल्यानंतर छोट्या छोट्या मनभावक कथा अदाशासारखा वाचत सुटतो.प्रत्येकाच्या मनाशी भावनिक गाठी मारणारा सहज व सुटसुटीत कथासंग्रह. गणगोतकार मा. पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड सर यांच्या 'गणगोत' या प्रकाशनाचा पहिलाच पण पूर्णतः यशस्वी आणि सार्थ प्रयत्न ठरतो. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मा.देविदास फुलारी सर यांची प्रतिक्रिया सुबक व सटिक भाष्याचे रुपक मांडते. विष्णू थोरे यांचे मुखपृष्ठ प्रत्येक कथेचे प्रतिनिधित्व वाटत राहते.

~प्रा.व्यंकट सोळंके
9922654732
Skvsolanke@gmail.com

पुस्तकाचे नाव :रुमणपेच
प्रकाशक पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड
गणगोत प्रकाशन, देगलूर
रेखाटन :प्रमोद दिवेकर
किंमत :२१०रूपये

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment