इंधन :हिंदू- मुस्लिम वेदनांचा प्रवास
साधारणतः पन्नासच्या दशकात प्रकाशित झालेली हमीद दलवाई यांची ‘इंधन’ ही कादंबरी स्वातंत्र्यानंतरही जिवंत असलेल्या जातीयतेच्या म्हणजे हिंदू-मुस्लिम ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेदना, येणारी अस्वस्थता आणि माणसा-माणसांचा तुटत जाणारा संबंध, निर्माण होणारी संशयीवृत्ती या सर्व गोष्टी परखडपणे मांडते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या हिंदू-मुस्लिम लढ्यावर भाष्य करणारी मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी म्हणून ‘इंधन’कडे पाहिले जाते. मुळातच नायक मुस्लिम घरातील […]