युवान श्वांग : भाग ३ व ४
युवान श्वांग : जगन्मोहन वर्मा: अनुवाद – सतीश सोनवणे
प्रकरण तिसरे -संन्यास
युआन श्वांग ने वयाच्या एकविसाव्या व वर्षी संन्यास घेतला आणि कषाय वस्त्र घातले. एका भिक्षूचा पोशाख धारण करून, त्यांनी तेथेच निवास केला आणि विनय पिटकाचा अभ्यास पूर्ण केला. विनयाचा अभ्यास पूर्ण करून त्याने सूत्र पिटक आणि अभिधर्म पिटकाचा अभ्यास केला.
त्या वेळी त्याच्या मनात अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न झाल्या, ज्याच्या निवारणासाठी त्याने तेथे उपस्थित भिक्षूंशी बराच वादविवाद केला परंतु त्यांचे समाधान झाले नाही. त्या वेळी चांगआनमध्ये काही चांगले भिक्षू राहत होते. तिथली व्यवस्था बदलली होती. शिक्षणाची व्यवस्था सुरू झाली होती. युआन श्वांग आपल्या भावाला म्हणाला की चला चांगआनला जाऊया. चांगआनमध्ये शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता तेथे अनेक विद्वान लोक राहतात असे आम्हाला समजले आहे. तेथे आनंदात अभ्यास करूयात तेथील भिक्षू आपल्या शंकांचे निरसन करतील ज्यांचे निराकरण येथील भिक्षुंना करता आले नाही. पण त्याच्या भावाने तिथे जाण्यास नकार दिला आणि त्याला तिथेही जाऊ दिले नाही. शेवटी त्यांनी गुपचूप विचारण्याचा विचार केला आणि एके दिवशी सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असताना ते फिरण्याच्या बहाण्याने चींगतू’मधून बाहेर पडला आणि हांगचाऊला जाणाऱ्या व्यावसायिकांच्या मागे गेला. त्यांच्यासह अनेक दऱ्या पार करून मोठ्या कष्टाने हांगचाऊला पोहोचला. तिथे जाऊन तियानहुआंग नावाच्या संघरामात उतरला . तेथील श्रमण अणि भिक्षू बऱ्याच दिवसापासून त्याची स्तुती ऐकून होते आणि त्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. जेव्हा त्या लोकांना त्याच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा ते सर्व उठले आणि त्यांनी त्याला गरदा घातला आणि तेथेच थांबून धार्मिक कथा सांगण्याची विनंती करू लागले.
युआन श्वाग त्याची विनंती टाळू शकला नाही. तेथे राहून त्यांनी अभिधर्माचे विवेचन करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या विनंतीवरून तो वर्षभर तेथे राहिला. तेथे त्याच्या विवेचनाची कीर्ती इतकी वाढली की त्याच्या सुंदर विवेचनाची बातमी आजूबाजूच्या सर्व देशांत पोहोचली. हानचांगच्या राजाच्या कानावर ही बातमी पोहोचली. तो अतिशय धार्मिक आणि धर्मनिष्ठ माणूस होता. राजा युआन श्वांगला पाहण्यासाठी इतका आतुर झाला की तो स्वतः आपल्या साथीदारांसह ‘हांगचाऊला पोहोचला आणि त्याची प्रवचने मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकली. त्यांचे सुंदर व्याख्यान ऐकून ततो इतकका मंत्रमुग्ध झाला की त्यांनी युआन श्वांग ला विचारले की जर त्यांनी परवानगी असेल तर शास्त्रार्थाची व्यवस्था करावी. राजाने वारंवार विनंती केल्यावर युआन श्वांगने वादविवाद करण्यास संमती दिली आणि राजाने मोठमोठ्या विद्वान भिक्षूंना धर्मग्रंथावरील वादविवादासाठी एक बैठक आयोजित केली. ठरलेल्या दिवशी, शेकडो विद्वान आणि वृद्ध भिक्षू सभामंडपात जमले . राजा स्वतः त्याचे मंत्री आणि शाही सेवकांसह सभेत आला. राजाची परवानगी मिळाल्यावर सर्व भिक्षूंनी एक एक करून युआन श्वांगला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि युआन श्वांग त्यांना उत्तरे देऊ लागला. अशाप्रकारे युआन श्वांगने सर्व प्रश्नांची
युक्तिपूर्वक उत्तरे दिली
कोणालाही त्याचे उत्तर खोडून काढण्याचचे धाडस झाले नाही. युआन श्वांगचा या बैठकीत विजय झाला आणि सर्व भिक्षूंनी आपला पराभव मान्य केला. सभा संपली आणि राजा इतका खूश झाला की त्याने युआन श्वांगला पुष्कळ पैसा आणि रत्ने दिली, परंतु युआन श्वांगने ति स्वीकारण्यास नकार दिला. हे खरे आहे की, जगातील सर्वात मोठी संपत्तीही खऱ्या संन्याशाला बांधून ठेवू शकत नाही.
युआन श्वांगने पाहिले की तो आणखी येथे राहिला तर गुलामगिरीत पडण्याचा धोका आहे. सभा संपताच तो होंगचाऊला निघाला आणि तिथून उत्तरेला जाऊन विद्वान भिक्षूंकडून आपल्या शंकांचे निरसन करायचे त्याने ठरवले.
युआन श्वांग विद्वानांच्या शोधात सियांगचाऊला गेला. तिथे त्याला हिउ नावाची एक अतिशय विद्वान व्यक्ती भेटली. त्याच्याजवळ राहून त्याने आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आणि तेथेही त्याला शांती मिळाली नाही तेव्हा तो चिऊचाऊ ला पोहोचला. शिन नावाचा एक विद्वान साधू तेथे राहत होता आणि तेथे त्याने सत्य सिद्ध व्याकरणाचा अभ्यास केला आणि तो चांगआगनच्या दिशेने निघाला . चांगआनला पोहोचल्यानंतर तो महाबोधी नावाच्या विहारात उतरला.तेथे पोह नावाचा एक विद्वान साधू राहत होता. तेथेच त्याने कोष शास्त्राचा अभ्यास केला आणि त्याने एका वाचनात संपूर्ण ग्रंथ मुखोदगत केला. तेथे त्याला शांग आणि पिंग नावाचे दोन स्थविर सापडले. ते अतिशय प्रसिद्ध विद्वान भिक्षू होते. देशभरात त्यांचा आदर होता आणि विद्वान म्हणून त्यांची ख्याती होती. त्या दोन विद्वानांकडे काही दिवस राहून त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांच्या शंकांचे निरसन करत राहिले. त्याची अलौकिक प्रतिभा पाहून दोघेही विद्वान स्तब्ध झाले आणि ते विद्वान म्हणाले – युआन श्वाग तुझ्या कार्यामुळे एक वेळ चीनमध्ये धर्माचा सूर्य उगवेल. पण खंत एवढीच की त्यावेळी आम्ही नसू.
अशा रीतीने श्रमण युआन श्वांग हे महान विद्वान आणि वृद्ध भिक्षूंचा शोध घेत देशभर फिरले आणि जिथे जिथे त्यांना विद्वान भिक्षू आणि त्यांना ज्या काही विषयाची माहिती होती तिथे त्यांनी त्या विषयाचा अभ्यास केला त्यांच्या शंकांचे निरसन केले. पण त्याचा परिणाम उलटच झाला, त्याने अधिकाधिक धर्मग्रंथांचा अभ्यास केला म्हणून त्याच्या शंकाही वाढत गेल्या.
प्रकरण चौथे -भारत भ्रमणाचा संकल्प
शेवटी, जेव्हा युआन श्वांगच्या शंका वाढत गेल्या आणि त्याचे समाधान झाले नाही तो मोठ्या पेचात सापडला. त्याने पाहिले की सर्व संप्रदायांची मते भिन्न आहेत. प्रत्येकजण स्वतःला चांगले आणि इतरांना वाईट म्हणतो.
जर एकाने काही केले तर दुसरा त्यास विरोध करतो. हा मोठा वादाचा विषय आहे. तथागतांची मुख्य शिकवण नेमकी काय होती हे माहीत नाही. प्रत्येकजण त्याच्या वाक्यांचा अर्थ स्वत:ला अनुरूप असा घेतो. तथागतांची शिकवण त्यांच्या स्वतःच्या भाषेत पाहिल्याशिवाय आणि त्यांचा खरा अर्थ ठरवल्याशिवाय या समस्येवर तोडगा काढणे त्यांना अवघड वाटले. मूळ मजकूर पाहिल्याशिवाय संप्रदयांचा कोणता भाग तथागतांच्या शब्दाच्या मुख्य अर्थाच्या अनुषंगाने आहे आणि कोणता विरुद्ध आहे हे ठरवणे अत्यंत अवघड आहे. पण तथागतांच्या वाक्यांचा एकच अर्थ असेल यात शंका नाही. त्यामुळे, त्याला समजले की जवळजवळ सर्व संप्रदाय काही प्रमाणात तथागतांच्या वचनाच्या विरुद्ध आहेत. आता त्यांचे शब्द काय होते हे कसे ठरवता येईल? याचे कारण असे की चीनमध्ये जे काही अस्तित्वात होते ते भाषांतर स्वरूपात होते. मूळ संस्कृत किंवा पाली भाषेतील सूत्रे तेथे नव्हती आणि त्यांच्याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. शेवटी, त्याने मनाशी ठरवले की काहीही झाले तरी तो भारतात जाऊन मूळ धर्मग्रंथांचा अभ्यास करील आणि त्यांचा खरा अर्थ समजून घेतल्यानंतर आपले भ्रम दूर करील आणि आपल्या देशातील भिक्षूंचे भ्रम नष्ट करील.
हा विचार त्याच्या मनात दृढ झाला आणि त्याने आपल्या दोन-तीन सहकारी माणसांसमोर ही कल्पना व्यक्त केली.
लोकांनीही त्यांच्या कल्पनेला सहमती दर्शवली आणि त्यांनी एकत्र येऊन भारतात जाऊन बुद्धाच्या शब्दांचे मूळ ग्रंथ आणि त्यांच्या व्याख्यांचा संग्रह करण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी लोकांना चीन सोडून बाहेर जाणे कठीण होते. चीनमधली राजकीय परिस्थिती अशी झाली होती की सम्राट तांगने कडक आदेश दिला होता की माझ्या आज्ञे शिवाय कोणीही सीमेच्या बाहेर जाऊ नये. सीमा प्रांतात कडक पहारा ठेवला होता आणि बाहेर पडणाऱ्यांची तपासणी घेण्यात आली. चीनमधील कोणतीही व्यक्ती, रहिवासी राजमुद्रा बाळगल्याशिवाय बाहेर पडू शकत नव्हती.
युआन श्वागंने सम्राटाकडे भारतात जाण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज पाठवला. पण त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. त्याचे मित्र अधीर होऊन बसले होते, पण युआन श्वागंने दुसरे पत्र पाठवले. पण त्यावरही उत्तर नव्हते. आता त्याने आपल्या साथीदारांना सांगितले की जर तुम्ही सर्वांनी मला साथ दिली तर मी लोयांग येथे जाऊन बादशहाकडे निवेदन देईन आणि त्यांची परवानगी घेईन. पण त्याच्या साथीदारांनी त्याच्यासोबत तिथे जाण्यास नकार दिला. पण यामुळे त्याचे धैर्य कमी झाले नाही. दरम्यान, सम्राटाची आणखी एक आज्ञा आली आणि राज्यकर्त्यांनी घोषित केले की, कोणतीही प्रजा, मग तो भिक्षू असो किंवा गृहस्थ, त्याला देशाबाहेर जाऊ दिले जाऊ नये. या आदेशामुळे सम्राटाकडे जाण्याचा निर्णय सोडून द्यावा लागला. पण भारतभेटीचा संकल्प ते सोडू शकले नाहीत. त्याच्या साथीदारांची उदासीनता आणि शिक्षेच्या अशा कठीण आदेशांना न जुमानता तो भारतात प्रवास करण्याच्या मार्गांचा विचार करत राहिला. तेथील मार्गाबाबत त्यांनी लोकांकडून विचारपूस केली आणि सर्वांनी सांगितले की हा मार्ग अतिशय धोकादायक आणि विविध प्रकारच्या त्संकटांनी भरलेला आहे. अनेक वाळवंट आणि धोकादायक पर्वत पार करावे लागतील, ज्याचे ध्यान केल्याने मन अस्वस्थ होते. पण हे सगळं ऐकूनही त्याची हिंमत कमी झाली नाही उलट वाढतच गेली. तो मठात गेला आणि भगवानाच्य मूर्तीसमोर पूजन करून त्याने स्वतःला भारताच्या प्रवासासाठी तयार केले आणि प्रार्थना केली की जर देवाला आपला प्रवास यशस्वी करायचा असेल तर त्याने मला स्वप्न द्यावे की मी यशस्वी होऊ शकेन की नाही? त्याच रात्री त्याला स्वप्न पडले . तो एका महासागराच्या किनाऱ्यावर उभा आहे आणि समुद्राच्या मध्यभागी सुमेरू पर्वत आहे ज्याची शिखरे तेजस्वी दिसत आहेत. त्याला जाऊन सुमेरू पर्वतावर चढण्याची इच्छा होती पण तिथे ना बोट होते ना तराफा. सुमेरूपर्यंत पोहोचणे अवघड होते, एकटेच ते चढणे सोडा. अचानक त्याने समुद्रात डोकावून पाहिले तेव्हा त्याला दोन कमळाच्या आकाराचे दगड दिसले. युआन श्वागंन पायांवर पाय ठेवून झोपला आणि त्याने आपले पाय लांबवले. तोजसा पुढें जाईल ते दगड पुढे दिसत . अशा प्रकारे चालत तो सुमेरू पर्वताच्या काठी पोहोचला. पण त्याच्या शिखरावर पोहोचणे कठीण होते. तो इतका उंच होता की त्यावर चढणे अशक्य होते. पण इतक्यात वादळ उठले आणि त्याला उचलून मेरू पर्वताच्या शिखरावर ठेवले. तिथे पोहोचल्यावर तो आजूबाजूला पाहू लागला पण त्याला आकाश आणि पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते. जिकडे नजर गेली तिकडे फक्त पाणी आणि आकाश दिसत होते. तिथे पोचल्यावर त्याच्या मनाला इतका आनंद वाटला जितका पूर्वी कधीच झाला नव्हता. ही घटना सप्टेंबर 626 मध्ये घडली.
त्यावेळी चिनचाऊचा एक भिक्षू चांगआनमध्ये राहत होता. त्यांनी ज्ञानाचा अभ्यास केला होता. त्याचे नाव होते ‘हियावत्ता’. तो निर्वाण विहार येथे राहत होता आणि शिक्षण पूर्ण करून आपल्या गावी जाणार होता. युआन श्वागं त्याला भेटला आणि त्याच्याबरोबर ते ठिकाण सोडले. (क्रमश 🙂
***
- सतीश सोनवणे, कामरगाव. मोबा. 7709683323
साहित्याक्षर प्रकाशनाची नवी पेशकश . मूल्य :150 रु