मी कुणी ‘वेगळी ‘ नाही ! : सोनाझरिया मिंझ
या मुळच्या झारखंडच्या . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विदयापीठात ‘ कॉम्प्युटर अॅण्ड सिस्टीम सायन्स ‘ च्या प्रोफेसर . नुकतीच त्यांची झारखंडमधील ‘ ‘सिधो कान्हो मूर्मू ‘ या विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून निवड झाली आहे . या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत . या सन्माननीय नियुक्ती निमित्तानं त्यांच्या मनोगताचा हा पुर्वार्ध*
एक आदिवासी महिला ही माझी ओळख आहे आणि अस्मिता, अभिमानही.मी आदिवासी आहे म्हणून इतरांपेक्षा वेगळी, विशेष होते असं मी कधीही मानलं नाही . उलट मी इतर सर्वांसारखीच होते आणि आहे . हे सर्वांना जमत, करता येतं ते मलाही जमायला हवं, हा माझा स्वतःविषयी हट्ट आहे . हा विश्वास उराशी जपतच मी कुलगुरू या पदापर्यंत पोहोचले आहे .
रांचीमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं .ती खास खासगी मिशनरी मुलींची शाळा होती. तिथे ७५ टक्के मुले आदिवासी होत्या. ९० टक्के शिक्षक हे आदिवासी होते .आमच्या शाळेत आम्हाला कधीच जाती -जमाती वरून संबोधलं जायचं नाही .
‘शिक्षण घेणारी आमच्या घरातली दुसरी पिढी म्हणजे मी .माझे वडील शिकणारे पहिलेच . ते शिकागो विद्यापीठातून पीएचडी करून आले . आदिवासी म्हणून शिकताना काय अडचणी येतात, किती संघर्ष करावा लागतो हे त्यांनी अनुभवलं होतं . माझ्या आईलाही या संघर्षाची जाण होती . मी पाच वर्षांची असताना वडिलांनी मला सांगितलं ,आपण आदिवासी आहोत म्हणजे आपण कमी आहोत असे इतर समाज ठरवतो, मानतो. पण आपण कमी नाही .’
‘एक आदिवासी मुलगी म्हणून अभिमान ,आत्मविश्वासाचं बळ माझ्या पायात तेव्हाच निर्माण व्हायला सुरुवात झाली .कमीपणाची जाणीव करून देणारे प्रसंग आयुष्यात आले, तेव्हा मी खचले नाही, ती याच बळाच्या जोरावर!’
‘ मी आठवीत होते. परीक्षेत मला संस्कृत विषयात उत्तम मार्क मिळाले . मी संस्कृतच नाहीतर सर्व विषयात इतरांच्या पुढे होते . पण माझं संस्कृत मध्ये चांगले गुण मिळवणं आमच्या पंडितांना रुचलं नाही . ते मला म्हणाले की, संस्कृत ही आर्यांची भाषा आहे .त्यात तुला चांगले मार्क कसे मिळू शकतात?’
‘ पंडितांच्या या प्रश्नानं मी खरंतर आश्चर्यचकित झाले. पण विचार केला की मी कोणत्या विषयात चांगले गुण मिळवावे हे ठरवणारे हे पंडित कोण? इतर विषयातही मी पुढे आहे तर मग संस्कृत मध्ये पुढे गेलं तर काय होतं? मी नऊ वर्षांची होते तेव्हापासून ठरवलं होतं की ,मी गणितात शिक्षक होणार. कारण आदिवासी समाजात गणित आणि विज्ञानाची शिक्षक कमी .बिगर आदिवासी शिक्षक आदिवासी मुलांना गणित आणि विज्ञानात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांचं खच्चीकरण अधिक करतात . हे मी ऐकलं होतं, पाहिलं होतं आणि पुढे जाऊन ते अनुभवलंदेखील.’
‘ मी दहावीची परीक्षा पास झाले. गणितात मला सर्वात जास्त गुण मिळाले होते. पण माझे गणिताचे शिक्षक म्हणाले की ,”तू गणित हा विषय घेऊ नकोस तुला तो पेलवणार नाही .’ हे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली . मी काय शिकावं कोणता विषय घ्यावा हे ठरवणारे हे कोण ? मी तर गणितच घेणार !मी ठरवलं होतं तेच केलं . ‘
‘ पुढच्या शिक्षणासाठी आम्ही बंगलोरला गेलो. तिथे गणितात बी .एस्सी, एम. एस्सी .केलं . पुढे एम . फिल .पी एच डी साठी मी दिल्लीच्या जे .एन. यु . विद्यापीठात जाण्याचं ठरवलं पण दुर्देवानं तिथे एम .फिल , पी . एच . डी . साठी हा विषय नव्हता .तिथे कम्प्युटर सायन्स हा विषय होता .एम.एएस्सी करताना कॉम्प्युटर सायन्सच्या अनेक संकल्पनांशी माझा परिचय झाला होता. गणित हा विषय मला सोडवत नव्हता .पण वडील म्हणाले, “आपल्या समाजात कम्प्युटर सायन्स या विषयाचे शिक्षक फारच कमी आहेत तो हाच विषय घे!”
‘. मी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. पी.एच.डी.ची दोन वर्ष केली आणि भोपाळला असिस्टंट प्रोफेसरसाठी खुल्या गटातून अर्ज केला. नंतर मदुराई येथील कामराज विद्यालयात नोकरी केली आणि मग जे . एन . यु . विद्यापीठात कॉम्प्युटर आणि सिस्टीम सायन्स हा विषय शिकवायला आले ‘
. आज झारखंड मधील ‘सिधो कान्हो मूर्मू ‘ या विद्यापीठाची कुलगुरू म्हणून माझी निवड झाली आहे . माझ्या या निवडीचे काही अर्थ आहेत . ते मला आवर्जून सांगावेसे वाटतात .एक तर मी आदिवासी, शिकणारी म्हणून दुसऱ्या पिढीतली. पण शिक्षणातली सर्व आव्हानं, स्पर्धा स्वतःच्या बळावर पार करत इतर समाजाच्या बरोबरीने आले. मी तर कोणा पेक्षा वेगळी नाही हे मी यातून सिद्ध केलं.
या माझ्या निवडीमुळे इतर आदिवासी मुलामुलींना मिळणारी प्रेरणा मला फार महत्त्वाची वाटते.
दुरध्वनीवरून मुलाखत आणि शब्दांकन
_ माधुरी पेठकर
सौजन्य – लोकम*मी कुणी ‘वेगळी ‘ नाही !
✍🏻सोनाझरिया मिंझ
या मुळच्या झारखंडच्या . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विदयापीठात ‘ कॉम्प्युटर अॅण्ड सिस्टीम सायन्स ‘ च्या प्रोफेसर . नुकतीच त्यांची झारखंडमधील ‘ ‘सिधो कान्हो मूर्मू ‘ या विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून निवड झाली आहे . या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत . या सन्माननीय नियुक्ती निमित्तानं त्यांच्या मनोगताचा हा पुर्वार्ध*
एक आदिवासी महिला ही माझी ओळख आहे आणि अस्मिता, अभिमानही.मी आदिवासी आहे म्हणून इतरांपेक्षा वेगळी, विशेष होते असं मी कधीही मानलं नाही . उलट मी इतर सर्वांसारखीच होते आणि आहे . हे सर्वांना जमत, करता येतं ते मलाही जमायला हवं, हा माझा स्वतःविषयी हट्ट आहे . हा विश्वास उराशी जपतच मी कुलगुरू या पदापर्यंत पोहोचले आहे .
रांचीमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं .ती खास खासगी मिशनरी मुलींची शाळा होती. तिथे ७५ टक्के मुले आदिवासी होत्या. ९० टक्के शिक्षक हे आदिवासी होते .आमच्या शाळेत आम्हाला कधीच जाती -जमाती वरून संबोधलं जायचं नाही .
‘शिक्षण घेणारी आमच्या घरातली दुसरी पिढी म्हणजे मी .माझे वडील शिकणारे पहिलेच . ते शिकागो विद्यापीठातून पीएचडी करून आले . आदिवासी म्हणून शिकताना काय अडचणी येतात, किती संघर्ष करावा लागतो हे त्यांनी अनुभवलं होतं . माझ्या आईलाही या संघर्षाची जाण होती . मी पाच वर्षांची असताना वडिलांनी मला सांगितलं ,आपण आदिवासी आहोत म्हणजे आपण कमी आहोत असे इतर समाज ठरवतो, मानतो. पण आपण कमी नाही .’
‘एक आदिवासी मुलगी म्हणून अभिमान ,आत्मविश्वासाचं बळ माझ्या पायात तेव्हाच निर्माण व्हायला सुरुवात झाली .कमीपणाची जाणीव करून देणारे प्रसंग आयुष्यात आले, तेव्हा मी खचले नाही, ती याच बळाच्या जोरावर!’
‘ मी आठवीत होते. परीक्षेत मला संस्कृत विषयात उत्तम मार्क मिळाले . मी संस्कृतच नाहीतर सर्व विषयात इतरांच्या पुढे होते . पण माझं संस्कृत मध्ये चांगले गुण मिळवणं आमच्या पंडितांना रुचलं नाही . ते मला म्हणाले की, संस्कृत ही आर्यांची भाषा आहे .त्यात तुला चांगले मार्क कसे मिळू शकतात?’
‘ पंडितांच्या या प्रश्नानं मी खरंतर आश्चर्यचकित झाले. पण विचार केला की मी कोणत्या विषयात चांगले गुण मिळवावे हे ठरवणारे हे पंडित कोण? इतर विषयातही मी पुढे आहे तर मग संस्कृत मध्ये पुढे गेलं तर काय होतं? मी नऊ वर्षांची होते तेव्हापासून ठरवलं होतं की ,मी गणितात शिक्षक होणार. कारण आदिवासी समाजात गणित आणि विज्ञानाची शिक्षक कमी .बिगर आदिवासी शिक्षक आदिवासी मुलांना गणित आणि विज्ञानात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांचं खच्चीकरण अधिक करतात . हे मी ऐकलं होतं, पाहिलं होतं आणि पुढे जाऊन ते अनुभवलंदेखील.’
‘ मी दहावीची परीक्षा पास झाले. गणितात मला सर्वात जास्त गुण मिळाले होते. पण माझे गणिताचे शिक्षक म्हणाले की ,”तू गणित हा विषय घेऊ नकोस तुला तो पेलवणार नाही .’ हे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली . मी काय शिकावं कोणता विषय घ्यावा हे ठरवणारे हे कोण ? मी तर गणितच घेणार !मी ठरवलं होतं तेच केलं . ‘
‘ पुढच्या शिक्षणासाठी आम्ही बंगलोरला गेलो. तिथे गणितात बी .एस्सी, एम. एस्सी .केलं . पुढे एम . फिल .पी एच डी साठी मी दिल्लीच्या जे .एन. यु . विद्यापीठात जाण्याचं ठरवलं पण दुर्देवानं तिथे एम .फिल , पी . एच . डी . साठी हा विषय नव्हता .तिथे कम्प्युटर सायन्स हा विषय होता .एम.एएस्सी करताना कॉम्प्युटर सायन्सच्या अनेक संकल्पनांशी माझा परिचय झाला होता. गणित हा विषय मला सोडवत नव्हता .पण वडील म्हणाले, “आपल्या समाजात कम्प्युटर सायन्स या विषयाचे शिक्षक फारच कमी आहेत तो हाच विषय घे!”
‘. मी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. पी.एच.डी.ची दोन वर्ष केली आणि भोपाळला असिस्टंट प्रोफेसरसाठी खुल्या गटातून अर्ज केला. नंतर मदुराई येथील कामराज विद्यालयात नोकरी केली आणि मग जे . एन . यु . विद्यापीठात कॉम्प्युटर आणि सिस्टीम सायन्स हा विषय शिकवायला आले ‘
आज झारखंड मधील ‘सिधो कान्हो मूर्मू ‘ या विद्यापीठाची कुलगुरू म्हणून माझी निवड झाली आहे . माझ्या या निवडीचे काही अर्थ आहेत . ते मला आवर्जून सांगावेसे वाटतात .एक तर मी आदिवासी, शिकणारी म्हणून दुसऱ्या पिढीतली. पण शिक्षणातली सर्व आव्हानं, स्पर्धा स्वतःच्या बळावर पार करत इतर समाजाच्या बरोबरीने आले. मी तर कोणा पेक्षा वेगळी नाही हे मी यातून सिद्ध केलं.
या माझ्या निवडीमुळे इतर आदिवासी मुलामुलींना मिळणारी प्रेरणा मला फार महत्त्वाची वाटते.
दुरध्वनीवरून मुलाखत आणि शब्दांकन
_ माधुरी पेठकर
सौजन्य – लोकमत
सखी- दि . १६ जून २०२०