2020 मार्च

सा हि त्या क्ष र 

सांगलीचे वसंत केशव पाटील उर्फ वके सर हे हिंदी अनुवादक आणि ज्येष्ठ कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. मित्रवर्य अभिजीत पाटील यांच्या ‘ अबीर गुलाल ‘ या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहभाग नोंदवताना  वकेंची ओळख झाली. त्या आधी त्यांना वाचून होतोच. नुकतेच ते ७५ त पदार्पण करत आहे त्याचे औचित्य साधून आभिजीतची प्रतिक्रिया आणि सरांच्या परिचय देत आहे…
 – संपादक

 वकेंच्या ७५ च्या निमित्ताने त्याच्या वरील लेख अनेकांनी  लिहिले बहुतांशी लेखात वकेंच्या साहित्या बद्दल त्याच्या अनुवादा बद्दल वकेंचे कौतुक केले आहे ,
परंतु त्याच्या वागण्या बोलण्यातून कधीकधी कृतीतून चर्चेतून त्याच्या बद्दलच्या समज गैरसमजाची चर्चा कमीजास्त प्रमाणात अधिक झाली विक्षिप्त पणा हा गुण मोठ्या लेखकांना शोभून दिसतो, ते तसे का याचा शोध घेतांना त्यांनी तसेच रहावे तरच ते “ते” असतात त्याच्यातल्या त्याला बाजूला केलं तर काय उरते म्हणून लिहिली कविता *अवघड आहे*
अवघड आहे या माणसावर
कविता लिहिणे,
कथा म्हणाल तर
कुठून करणार सुरूवात ?
कादंबरीत बसेल म्हणता हा माणूस ? …
अवघड आहे !
दिसतो तुम्हाला आम्हाला तसा आहे का ?
आहे तो नेमका तसा का ?
कठीण आहे शोधणे…

पण जाणून घेणे म्हणजे
पाण्यात पाय सोडून बसावे तासन् तास
त्याच्या बदलत्या
प्रवाहा सोबत त्याच्या लयीचा अंदाज घेत,

पण तळ सापडेल तर शपथ !
शोधू नका तळ,
तो मात्र एका खोल अंशावर घट्ट आहे स्वतःला धरून
एखादा लाव्हा उगमस्थाना सारखा…

म्हणून त्याची कहाणी होते पुढे
कोण जाणे पुढे
दंत्तकथाही होतील…
आपण मात्र एखाद्या बुलंद
राजवाड्याच्या दरवाजातून
ये – जा करत या माणसांचा स्नेह जपायचा,
आणि त्या भव्य प्रवेशव्दारा वर आपली अक्षरे लिहायची
काही राहतील काही पुसून जातील,
कारण वसंत केशव पाटील
हीच अक्षरं इतकी मोठी आहेत की
आपली अक्षरं फक्त आपल्यालाच दिसतील ,
तुम्हाला काय वाटतं ?…

– अभिजीत पाटील सांगली
वके सरांचा परिचय

वसंत केशव पाटील,जन्मदिनांक : २० मार्च १९४६ 
२८ वर्षे सेवा… निवृत्त प्राध्यापक. सध्या निवास : सांगली मोबा. ९७६७७५१२३०. 
     *प्रकाशित पुस्तके*
📙 दशद्वार ते सोपान 📙 कंदीलाचा उजेड 
📙 दिपराग📙अखेरचे झोपडे 📙 त्याने जंगल जिंकले
📙 छप्पर 📙 कर्मवीर भाऊराव पाटील 
📙यशवंतराव : विचार आणि वारसा 
📚… यासह अनुवादीत नि स्वत:ची एकुण २० पुस्तके प्रसिद्ध. अनेक पुस्तकांच्या दोन-तीन आवृत्ती प्रकाशित… 
    *पुरस्कार व सन्मान*
🏆साहित्य अकादमी पुरस्कार अनुवादासाठी १९९६
🏆महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०००
🏆वसंतदादा पाटील साहित्यरत्न पुरस्कार १९९०
🏆तांबटकाका साहित्य गौरव पुरस्कार २०००
🏆कऱ्हाड गौरव पुरस्कार १९९७
🏆जेमिनी अकादमी पानीपत(पंजाब)डाॅ. दुबे पुरस्कार २००१
🏆सहस्राब्दी विश्व हिंदी सेवा पुरस्कार २००१
🏆एशियन – अमेरिकन ‘हूज हू’ मध्ये समावेश २००१
…. यांसह अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय मानसन्मान, पुरस्कार,साहित्य संमेलनाध्यक्ष पदे…

‘वसंत केशव पाटील’ यांनी कथा, कविता, गझल, ललित व समीक्षा या साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. याशिवाय हिंदी, उर्दू, तेलगू व पंजाबी भाषेतील साहित्यकृतींचा मराठीत अनुवाद केला आहे. लेखन कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१५ मध्ये सांगलीत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला होता. तेलगू मधील केशव रेड्डी, पंजाबीतील गुरुदयाळ सिंह, हिंदीतील हरिवंशराय बच्चन यांच्या सह अनेक लेखकांच्या साहित्य कृतींचे मराठी अनुवाद केले आहेत. जवळजवळ २० पुस्तके व.के. सरांच्या नावावर आहेत. त्यापैकी ‘अखेरचे झोपडे’ ही अनुवादित कादंबरी व ‘छप्पर’ हा कथासंग्रह विशेष गाजला.

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment