2021 फेब्रुवारी

मुंबई, बंबई, बॉम्बे : LBGT चे संदर्भ

सा हि त्या क्ष र 

‘ मुंबई मुंबई बॉम्बे ‘ हा  डॉ.बाबासाहेब यांचा सुमारे १३३ पृष्ठांचा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्यात सुमारे ११४कविता आहेत. अरुण कोलटकर,नामदेव ढसाळ थेट अरुण म्हात्रे पर्यंत अनेकांनी मुंबई आपापल्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते सारे कवी मुंबई येथे राहणारे होते .बाळासाहेब लबडे यांच्या निमित्ताने मुंबईकडे पाहणाऱ्या  परंतु मुंबई येथे वास्तव्य नसणाऱ्या  कवितेचे आकलन आलेले आहे. शिवाय प्रथमत : च  आलेले आहे .म्हणूनच हा कवितासंग्रह महत्त्वाचा आहे .
  मुंबई एक महानगर आहे म्हणूनच महानगराची वैशिष्ट्य अर्थातच मुंबईलाही लागू होतात उदाहरणार्थ व्यामिश्रता ,जटिलता ,आर्थिक विषमता, चंगळवाद, बेकारी, श्रमिक,झोपडपट्ट्या, व्यावसायिक संबंध व  स्पर्धा ,विभक्त कुटुंब, गर्दी, भाईगिरी, लोकसंख्येची घनता , प्रदूषण गटारी, वेगवेगळ्या बोली इत्यादी.
   वारंवार पडणारे दुष्काळ आणि बेरोजगारी यांना कंटाळून शहराकडे स्थलांतरित होण्याचे प्रमाण सर्वदूर
शहरंसुजली किती महानगरात रूपांतरित होतात. महानगर म्हटले की एकीकडे सुबत्ता पोस्ट इमारती बंगले नागरी सुविधा आल्यात तर दुसरीकडे दारिद्र्य, बकालपण आणि एक आगळे  अधोविश्व आलेच.
विश्वाची व्याप्ती अर्थातच मोठी आहे. स्लम एरिया, गटारी, फुटपाथ, पडीक जागा, इमारती, पुलाखालच्या जागा ,मुताऱ्या ,सार्वजनिक संडास, गलिच्छपणा आणि त्यासह तिथे राहणारी कुटुंबे आणि त्यांच्यातील आपापसातली चकित करणारे आंतरसंबंध,अनेक प्रकारचे लोक, त्यांचे नातेवाईक ,व्यवसाय वगैरे सर्व बाबी त्यात येतात.
लोकलमध्ये किंवा ट्रॅफिक सिग्नल पासिंग भीक मागणारे, पैसे मागणारे तृतीयपंथी आपल्याला दिसतात .तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा निकोप नाही. तेही या अधोविश्वाचा भाग करतात आणि ट्रान्सजेंडर हेही या समाजाचा भाग असतात. या सर्वांना एकत्रितपणे ‘एलजीबीटी ‘असे संबोधले जाते लेस्बियन म्हणजे समलिंगी संबंध ठेवणाऱ्या  स्त्रिया. होमोसेक्स हे ज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपापसात समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, बायो  म्हणजे स्त्रिया व पुरुषांशी संबंध ठेवतात असे लोक , ट्रान्सजेंडर्स म्हणजे असे लोक जे विरुद्धलिंगी लोकांचे कपडे घालतात आणि आपले चुकीच्या  लोकांशी संबंध  आहेत असे वाटणारे लोक होत.
  एलजीबीटी समूहाबद्दल च्या कविता डॉक्टर लबडे यांच्या संग्रहात आहेत. अशा कवितांची संख्या एकूण आठ भरते. कोड लैंग्वेज (पृ. १२) महालक्ष्मी ( पृ. १८) एम.जी.गार्डन : एक अपूर्ण वर्तुळ ( पृ. ४६)निर्मलनगर :एक अंधारातील चळवळ (पृ. ५१)भाईंदर व्हिडिओ सेंटर (पृ. ६८)हिरानंदानी च्या चौथ्या मजल्यावर ( पृ.७७)रूमबॉयसाठी दोन अटी ( पृ.७८) राघव चिल्ला  गली में (पृ.८४) कॉल करा (पृ.८८) नॉर्मल लोग (पृ.११३) अशा या कविता आहेत.
   रेल्वे स्टेशन प्लॅटफार्म हेच घर समजणारे काही लोक ‘कोड लँग्वेज’ या कवितेत येतात .त्यांच्या आपापसातल्या संबंधांवर भाष्य करताना डॉक्टर लबडे म्हणतात की

काळे डगले हसले भोगात कोणी फसले
नागड्यांच्या फलाटांचे अभंग सारे नासले

कोड लैंग्वेज याचा अर्थ गूढ किंवा सांकेतिक भाषा.
‘हुक्का पिण्यासाठी अंधेरीला जाऊ ‘ किंवा ‘कोळी अम्मा चिरीमिरी ‘ , ‘झिंगऱ्या सिगारेटवाला ‘, ‘ चकना डांसबार ‘ इ. संकेतांना काही एक विशिष्ट अर्थ आहे.
  एलजीबीटी च्या जगात ‘ गिगेलो ‘ या संज्ञेलाही एक विशिष्ट अर्थ आहे. ‘गिगेलो ‘ म्हणजे पुरुष वेश्या.कॉल गर्ल्स किंवा धंदेवाईक बायकांप्रमाणे हे पुरुष नटून – थटून, सजून उभी असतात. त्यांचे पिकअप पॉइंटस् ठरलेले असतात.तिथे त्यांचे गिऱ्हाईक अर्थात स्त्री ग्राहक येतात.या  व्यवसायातही करिअर आहे. सुजीतची आई म्हणत राहते, ‘आमचा सुजित ऑफिसला जातो. ‘ परंतु वास्तविक तो महालक्ष्मीच्या पिकअप पॉइंटला गिऱ्हाइकांची वाट पाहत , ‘गिगेलो ‘ म्हणून उभा म्हणून असतो

किती श्रद्धेने बाया
घेत राहतात
दर्शन महालक्ष्मीचे
सुजीत उभा असतो,
सजून धजून
हातात बॅग घेऊन वाट पाहात
एखादी गाडी थांबेल
जी घेऊन जाईल आपल्याला..

यातून मुंबई नावाच्या मायानगरीचे एक आगळे रुप दिसून येते.’ रात्रभर कालची श्रीमंत बाई पोराला चावत होती ‘ हे वास्तव आपल्याला धक्कादायक, स्तिमित करणाऱ्या जगात घेऊन जातो मध्यमवर्गीय जाणिवा, संकेत यांना धक्का देणारी ही गोष्ट डॉ. लबडे या कवितेत मांडतात.
मुंबई येथील एम.जी. गार्डन हा एक विशिष्ट स्पॉट आहे. निम्म्या भागात क्रॉसड्रेसी (म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीचे कपडे घालणारे लोक) त्यांना तृतीयपंथीयांच्या जगात ‘साटला ‘ म्हणतात ;ते लोक फिरत असतात. शरीरात अडकलेले भिन्नलिंगी व्यक्तिमत्व म्हणजे एक प्रकारच्या अपूर्णता.ह्या अपूर्णतेमुळे न्यूनगंडाने पछाडलेले लोक या गार्डनमध्ये आपल्या सुखाचा शोध घेतात. उरलेल्या अर्ध्या भागात नॉर्मल म्हणवल्या जाणाऱ्या लोकांच्या बायका या बायकांच्या रुपातले पुरुष कसे दिसतात ते उत्सुकतेने पाहतात मानवी जगण्याची ही दुसरी आणि गुड बाजू डॉक्टर लबडे खुबीने मांडतात.
भाईंदरच्या अरुंद बोळीत सांगणारे व्हिडिओ सेंटर त्याच्या स्क्रीनवर ब्ल्यू फिल्म चालू आणि प्रेक्षकांनी शेजारी बसलेले तृतीयपंथी, एक वडापाव सौदीमध्ये वाटून खाणाऱ्या कोट्या एकमेकींना आग्रह करत राहतात.समोरच्या स्क्रीनवर पाहून तसेच कृती करणारे प्रेक्षक आणि कोत्या यांचे चित्रण ‘भाईंदर व्हिडिओ सेंटर ‘ या कवितेतून डॉ.लबडे यांनी केलेले आहे या को त्यांना छक्का संबोधले आवडत नाही अशावेळी त्या हमरीतुमरीवर येतात ही हमरीतुमरीवर देण्याची पद्धतही वेगळी आहे. सगळे हिजडे पोट आणि टिऱ्या बडवायला सुरुवात करतात. त्यांचा आवेश पाहून मर्द लोकही काढता पाय घेतात .
फाईव्हस्टार हॉटेलमधल्या रुम साठी सर्विस देणार्‍या रूमबॉयचे जगही आगळेवेगळे आहे.  चमडीचा धंदा चालणाऱ्या त्या हॉटेलमध्ये पोटासाठी राबणारे हे रूम बॉय आनंदाने काम करत राहतात, हॉटेल मालकाच्या दोन अटी मान्य करतात. पहिली अट म्हणजे गिऱ्हाईक सांगेल तसे करायचे आणि दुसरी अट म्हणजे टॉयलेट साफ करायचे.वरवर वाटते तितके सोपे नाही. एखाद्या श्रीमंत बाई सोबत झोपणे आणि एखाद्या समलिंगी व्यक्तीला खूश करणे, अशा दोन्ही प्रकारे हा रुम बॉय वापरला जातो. त्याचे मन ,भावना, विचार यांचा अर्थातच चोळामोळा होतो, हे सांगणारी अत्यंत धक्कादायक अशी कविता या संग्रहामध्ये आहे.
‘ सर्चिंग सर्चिंग हल्लागुल्ला ‘ अशी ऱ्हिदम असलेली कविता यात आहे.याही कवितेमध्ये  तृतीयपंथीयांचे विश्व आपणाला दिसते. तृतीयपंथी व्यक्ती जेव्हा ‘त्या ‘ समाजाचा घटक होते तेव्हा तिला गुरु करावा लागतो. मग विधिवत दीक्षा घ्यावी लागते, निर्वाणा करवून घ्यावा लागतो. मग  त्याला देह व्यापारामध्ये पहिली सुहागरात मनवावी लागते .सोनी सारखा पार्श्वभागाचा पहिल्यांदा वापर झाला की  ‘बट्टी होई अलबेली ‘ हा वाक्प्रचार वापरला जातो या कवितेत तृतीयपंथीयांची बोली आलेली आहे त्यातील काही शब्द पुढील प्रमाणे आहेत –
साटला – मुलींचे ड्रेस घालणे
चपाती – निर्वाणा केलेल्या पुढचा सपाट भाग
कुकरची शिट्टी – पहिल्या रात्रीचे साफल्य
बट्टी – पार्श्वभाग
धोरुन – निजून
कोमथा – मुखमैथुन
मरसा- विधवा झालेला तृतीयपंथी
डॉ.लबडे यांनी या विश्वाचा किती खोलवर अभ्यास केला आहे ते यावरुन दिसून येते.
‘ राघव चिल्ला गल्ली में ‘ ही कविता पूर्ण कोती बोलीत आहे. रेड लाईट एरियाची भाषा या कवितेत दिसते.

पक्या, रंग्या, दिन्या झाडू | पार्टी कितना मारेला I
चिकण्या बोतल पाडू | मालेमाल भी होरेला I

शंकऱ्या थोडा बीमार I गोली गोलीच खारेला
मस्त टाकाच भिडेला | ऐटम गिफ्ट देरेला |

विसक्या तेरा नसीब | लडका बोल लडकी I
जो बी आय मारने का I दूर करेंगा कडकी I

‘ लडका बोल लडकी ‘ या ओळीतून दोन्ही प्रकारचा माल उपलब्ध असल्याचे सूचन होते. मुताऱ्यामध्ये, रेल्वेच्या डब्यात, ‘ फुल सॅटिफॅक्शन ‘च्या नावाखाली काही मोबाईल नंबर दिलेले असतात .हे नंबर आपल्याला साद घालतात . लैंगिक भुका भागवण्यासाठी माणसं तिकडे जात असावीत. यामध्ये तृतीयपंथी, बायो, गे, लेस्बियन या सर्व गटातील लोकांचा समावेश असावा.म्हणून तर हे नंबर एसटी स्टँड,, लोकल , मुतारीअशा सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले आढळतात.
टाळ्या वाजवून भीक मागणारे हिजडे हा नेहमीचा अनुभव आहे. दोन-चार टाळ्या . नखरा बिखरा, कमरेत लचकून अचकट विचकट बोलणं  हे त्यांचे  वैशिष्ट्य. भडक मेकअप करून ‘ भोनीका टाईम है जादा मचमच नै हा ‘ असा धमकीवजा इशारा सर्वसामान्य लोकांच्या मनात दहशत पैदा करतो.
‘ पैसे नाही दिले तर हे लोक खूप मारतात ‘शेजारचा कोणीतरी पुटपुटतो. एखादा मिलिटरीवालाही दहा रुपये देऊन सटकू पाहतो. पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला दुवा देणारा हिजडा तोंडातल्या तोंडात पुटपुटतो हे पाहून शेजारची बाई पटकन बोलून जाते,’नॉर्मल लोगों से तो मुझे येच लोग अच्छे लगते है’ अशा प्रकारे डॉ. लबडे यांच्या कवितेत LGBT  लोकांचे संदर्भ येतात. एकंदर मुंबईसारख्या महानगराची लय, नस पकडण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.  नामदेव ढसाळांच्या ‘गोलपिठा ‘ मध्ये ‘ हिजडे झगे वर करून नाचताहेत ‘ किंवा ‘रंडकी पुनव’ असे  तृतीयपंथीयांच्या जगातले संदर्भ येतात.त्यानंतर कैक वर्षांनी ते थेट डॉ. लबडे यांच्या कवितेत येतात,त्यापलीकडचे विश्वही येते ही गोष्ट निश्चितच दखलपात्र आहे.

****

– डॉ. संजय बोरुडे,
२१ अ, अमन, एकता कॉलनी,
गोविंदपुरा, अहमदनगर, ४१४००१
मोबा.९४०५०००२८०

****

साहित्याक्षर प्रकाशनाकडून येत असलेला नवा कवितासंग्रह.जागतिकीकरणात मानवी अस्तित्व आणि संघर्ष या बद्दल नवी प्रमेये मांडणारा कवितासंग्रह. चळवळीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा संग्रह..

विदर्भातील सशक्त कवीचा कवितासंग्रह

आ रं भ बिं दू  – अजय खडसे

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment