निडो तानियाम्स आणि नॉर्थ इस्ट : दगडू लोमटे
निडो तानियाम्स याची हत्याआणि नॉर्थ इस्ट :काही अनुभव …
गेल्या २०१३ या वर्षात मार्च व एप्रिल या महिन्यात मी आणि माझे ३२ सहकारी अनिल हेब्बर याच्या नेतृत्व खाली नॉर्थ इस्टच्या दोऱ्यात होतो. अरुणाचल ते शांतीनिकेतन अशी ही “भारत जोडो मैत्री यात्रा” होती. या यात्रेचा मूख्य उद्येश हा याभागातील परस्थिती आणि त्यावर काय करता येईल का? असा विचार करत ही यात्रा काढली होती. म्हणून त्यात्या राज्यातील नागरिकांशी विशेषतः तरुणांशी बोलते झालो. अनेक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांना भेटी दिल्या अनेकांशी बोललो. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागाल्यान्ड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम अश्या राज्यात आणि पश्चिम बंगालच्या दार्जीलिंग या भागात आम्ही गेलो. या राज्यात विशेष करून बंगाल सोडून बहुतांशी आदिवासी आहेत. पूर्वी म्हणजे २० वर्षाआधी विकास नव्हता आता होत आहे. शिक्षण नव्हते आता वेग घेत आहे. हिंदीला विरोध होता कारण त्यांना भीती होती हिंदीमुळे त्यांची आदिवासी संस्कृती मिटेल. पण तरुण शिकत गेले आणि नवा अध्याय नॉर्थ इस्ट मध्ये सुरु झाला. शिकलेली मुले-मुली नंतर पुढच्या शिक्षणा साठी बाहेर पडली. मग ते दिल्ली, मुंबई. कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, हैद्राबाद, पुणे अश्या मोठा शहरांकडे निघाली. नॉर्थ इस्ट हा चीन, भूतान, बांगला देश आणि ब्रम्हदेश म्हणजे म्यानमारला लागुन असल्याने व पहाडी किंवा उंच डोंगराळ भाग असल्याने त्यांच्या राहणीमानात, खाण्यापिण्यात अनेक विविध प्रकार आहेत. चालीरीती आहेत. कपडे वापरण्या पासून ते घरांच्या आकाराबाबत अनेक विविधता आहे. एकट्या अरुणाचल प्रदेश्यात १२९ आदिवासी जमाती आणि तेवढ्याच भाषा आहेत. त्या भाषा आदिवासींना आपापसात कळतही नाहीत. अश्या परस्थितीत तेलोक इंग्रजी-हिंदी शिकत आहेत बऱ्यापैकी त्यांना हिंदी येते. नागाल्यांड व अन्य राज्यातही हीच परस्थिती आहे. त्यांचे दिसणे हा मोठा प्रश्न आहे. ते चीनच्या अनुवंशिकतेने नाकाने चपटे आहेत. चीन जवळ असल्याने व भौगोलिक परस्थितीमुळे त्यांना चीन किंवा म्यानमार, भूतान किंवा बांग्लादेशचा कपडा, साहित्य किंवा अनेक बाबी वापराव्या लागतात कारण ते दळणवळणच्या दृष्ठीने सोयीचे आणि स्वस्ताचे आहे. त्यामुळे त्यांचा ओढा नैसर्गिकपणे तिकडे असतो. पण ते चीनचे नाहीत किंवा त्यांना चीन विषयी आपुकली नाही. किंवा ते अडाणी होतेतोपर्यंत त्यांना देश, सीमा किंवा राज्य या संकल्पना माहित नव्हत्या. त्यामुळे त्यांचे वागणे बोलणे हे असेच साधे होते. आत्ता शिकून पुढे भविष्य घडविण्यासाठी ते इतर ठिकाणी शिकायला जातात तेंव्हा त्यांच्याकडे सर्व भारतीय लोक चीनचा किंवा नेपाळचा म्हणून पाहतो. तसा समज होण्यासारखी समानता त्यांच्यात आहे. पण ते नेपाळी किंवा चीनचे नाहीत हे खरे आहे. पण आपण शिकलेले लोक किती अडाणी आहोत की चपटा तोंडाचा, केस चायनीज सारखे असलेला म्हणजे हा चीनचा असा शिक्का आपण त्याचावर मारतो. त्याचा दूषपरिणाम असा झाला की सर्व नॉर्थ इस्टचे लोक आपण भारताचे नाही आहोत, भारतातील लोक आपल्याल्याला परके समजतात. चायनीज, नेपाळी यांच्यात आपली गणना करतात जेणे करून ते दुखावले जातात. ते स्वतःला भारतात असुरक्षित समजतात, आणि तशी वास्तवतापण आहे.
साधारणपणे दार्जीलिंग मधली लोकं हे स्वेटर बनवून विकायला संपूर्ण भारतात येतात. पण त्यांना आपण सरसकट ‘नेपाळी’ म्हणतो. जो गुरखा बंगाल मधला दार्जीलिंगचा आहे त्याला आपण नेपाळी म्हणतो. नॉर्थ इस्ट मधून शिकण्यासाठी किंवा रोजगाराच्या निमिताने आलेल्या ह्या लोकांना आपण ‘चायनीज’ किंवा नेपाळी म्हणून हिणवतो. त्यांना नकटे, चपटे, भुरे म्हणून हिणवतो त्यांना हे खूप दु:खदायी वाटते. आणि ते स्वाभाविक आहे.
आम्हाला या गेल्या वर्षीच्या ऐकून३ २ दिवसांच्या प्रवासात भारतातून मिळत असलेल्या वागणुकीच्या संताप व्यक्त करणारे प्रश्न विचारले गेले. आणि त्यावर आम्ही खरच उत्तरे देवू शकलो नाही. त्यासाठी काय करायला हवे. तर या लोकांची आपापसात मैत्री करणे व हे लोक भारताचेच आहेत हे सांगणारे व त्यांच्याविषयी गैरसमज काढून टाकणारे कार्यक्रम गावोगावी करावेत असे वाटते. आणि तसे करण्याची गरज पण आहे. नॉर्थ इस्ट मधून शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडलेले विद्यार्थी व आपण सर्व नागरिक यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा असे कार्यक्रम करणे. हे कार्यक्रम नागरिक, शासकीय पातळीवर होणे आवश्यक आहे. तरच नॉर्थ इस्ट आपण वाचवू शकतो. अति तीव्र भावना वागणुकीच्या बाबतीत त्यांच्या आहेत. अनेक संकटाना यालोकांना सामोरी जावे लागते.
या सगळ्या बाबींचा परिपाक म्हणजे अरुणाचल प्रदेशातील आमदार निडो पवित्रा यांच्या मुलाचा म्हणजे निडो तानियाम्स याचा दिल्लीत झालेला खून. हा खून झाला तो त्याच्या दिसण्यावरून आणि केसरचनेवरून. त्याला चायनीज म्हटले गेले, हसले गेले, त्याच्या त्या रूपावरून त्याला चीडविले गेले जेणे करून तो संतापला आणि त्याने लजपत नगर मधल्या ज्या दुकानदारांनी त्याला हा त्रास दिला त्या दुकानाच्या काचा त्याने नाविलाजाने आणि संतापून फोडल्या आणि त्याला मग त्या दुकानदाराने इतके मारले की त्याच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. ही इतकी साधी बाबा नव्हती. दिल्लीत हजारो विद्यार्थी नॉर्थ इस्ट मधून शिकायला येतात. त्यांच्यात असुरक्षितता नेहमी असतेच. पण नव्याने हा प्रश्न उग्र रूप घेवून आपल्या समोर आहे. नॉर्थ इस्ट हा भारताचा भाग आहे. तिथली लोकं ही आपली बांधव आहेत. हे जोपर्यंत आपण स्वीकारणार नाहीत तो पर्यंत हे असेच प्रकार होणार आहेत. नॉर्थ इस्ट इतका सुंदर, सभ्य, विविध संस्कृतीने, भाषेने नटलेला प्रदेश आहे. तो आपलासा करण्यासाठी आपण कांहीतरी केले पाहिजे. आपआपल्या गावात शिकण्यासाठी, रोजगारासाठी आलेल्या सर्वच प्रदेशातील लोकांना सुरक्षित वाटावे म्हणून त्यांच्याशी मैत्री करा, त्याना दिलासा द्या. जेणे करून या लोकांबरोबर आपले संबंध सुरळीत, सलोख्याचे राहतील टिकतील. भारत एकात्म राहण्यासाठी आपण त्यांना समजून घेणे जरुरी आहे. तरच निडो तानियाम्स सारख्या वाईट घटना पुन्हा होणार नाहीत.
– दगडू लोमटे, अंबाजोगाई.
९८२३००९५१२